जिथे वेचला प्राजक्त
तिथे गोवऱ्या नशिबी आल्या
कोमल निशिगंधाच्या पाकळया
नजरेसमोर चोरीला गेल्या
कुठे मागावी दाद फिर्याद
सुगंधच फितूर झाला
बघता बघता चोराच्या
श्वासात तो सामावला
शुन्य नजर,मती गुंग, बधिर मी
स्वतः ला हरवून बसलो
स्वतः च पेटवलेल्या चितेत
धुमसत जळु लागलो
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
कविता ठीक पण निराशाजनक.