अर्थशास्त्र आणि जर्नालिझम मध्ये एम.ए केलेले व पाटण्यात करीत असलेली प्राध्यापकी सोडुन मुंबईला संगीताला वाहून घेण्यासाठी चित्रगुप्त यांचे पुर्ण नाव चित्रगुप्त श्रीवास्तव. त्यांचा जन्म१६ नोव्हेंबर १९१७ रोजी झाला.
काही काळ एस. एन. त्रिपाठी यांचे सहाय्यक म्हणून काम केले. मा.चित्रगुप्त यांनी आपली सांगितिक वाटचाल ब्रम्हचारी या नावानं सुरु केली होती. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द भाभी ह्य़ा चित्रपटापासून सुरू झाली. एव्हीएम ह्य़ा साऊथच्या बॅनरखाली त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत देऊन लता, रफी, आशा, तलत, मुकेश व मन्नाडे इ. गायकांकडून सुरेल गाणी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला सगळेच ‘बी’ ग्रेड सिनेमा मिळाले. एकाही मोठय़ा हीरोचा चित्रपट त्यांना मिळाला नाही.
अस्सल हिंदुस्थानी संगीताची बैठक असलेलं चित्रगुप्त यांचं संगीत लोकप्रिय झालं खरं, पण ते ‘ए’ ग्रेडचे संगीतकार बाकी कधीच होऊ शकले नाहीत. संगीत चांगले असूनसुद्धा त्यांना पाहिजे तेवढा सन्मान मिळाला नाही. परंतु एकटय़ा चित्रगुप्तांनी ‘बी’ ग्रेड सिनेमांना तारून नेले. ‘बी’ ग्रेड सिनेमाचे निर्माते चित्रगुप्त यांच्या गाण्यावर अतिशय खूश होते. कारण अशा चित्रपटांमध्ये चांगली गाणी असल्यामुळे ते चित्रपट यशस्वी होत असत. अगदी भारत भूषण, चंद्रशेखर, अजित, सुनील दत्त, राजेंद्रकुमार हे त्यांच्या चित्रपटाचे नायक होते. तर नायिका कुमकुम, फरियाल, शकिला, श्यामा, माला सिन्हा, नंदा, मीनाकुमारी ह्य़ा होत्या.
खऱ्या अर्थाने १९५७-१९६७ हे दशक चित्रपट संगीताच्या दृष्टीने भरभराटीचे होते. चित्रपट जरी चालले नसले तरी चित्रपटातील गाणी ही सतत रेडिओवर वाजत असत व लोकप्रिय होत असत. ८२८ गाणी दिली. त्यातील लता मंगेशकर (२४८), महंमद रफी (२६०), आशा भोसले (२३२) यांच्याकडून गाऊन घेतली. त्यांनी एकूण ६९ चित्रपटाना संगीत दिले. चित्रगुप्त यांनी प्रेमधवन, मजरुह सुलतानपुरी, साहिर, राजेंद्र कृष्ण व आनंद बक्षी इ. गीतकारांकडून अतिशय सुंदर गाणी लिहून घेतली. चित्रपटांना संगीत देताना शास्त्रीय संगीतापासुन पाश्चीमात्य संगीता पर्यन्त सगळ्याचा वापर केला. भारतीय वाद्यांचा प्रभावी वापर ही त्या काळातल्या सगळ्याच संगीतकारांची खासियत चित्रगुप्त यांच्या रचनांमध्येही दिसून येत असे. ठेक्याची गाणी हे संगीतकार चित्रगुप्त यांच्या संगीताचं एक प्रमुख वैशिष्ट्य.
रोमँटीक युगलगीते ही खासीयत होती. महमंद रफी व लता मंगेशकर यांच्या आवाजाचा टोन चित्रगुप्तांनी बरोबर वापरला व ह्य़ा कलाकारांची गाणी त्यामुळे अतिशय सुरेल वाटली. तलत मेहमुदसारख्या गायकाकडुन आशाजींच्या बरोबर गायलेले “दो दिल धडक रहे है और आवाज एक है” असो वा मुकेश आणि लतादिदींनी गायलेले “देखो मौसम क्या बहार है” अथवा “तुमने हसी ही हसी में क्यू दिल चुराया जवाब दो” हे लतादिदीनी महेंद्र कपुर सोबत गायले गीत असो या युगलगीतात रोमँटीझम दिसतो. मालकंस रागातल्या ‘अखियन संग अखियां लागे आज’ या रचनेत चित्रगुप्त संगीतकार म्हणून जान ओतली होती. ‘पतंग’ मधलं ‘रंग दिल की धडकन भी लाती तो होगी’ असंच मजा आणून गेले. ‘एक रात’ मधलं मारुबिहाग रागावर आधारित ‘पायलवाली देखना’ चित्रगुप्त यांच्या अशा एका पेक्षा एक रचनांनी रसिकांना वेडे केले होते.
हिंदीत काम करीत असतानाच त्यांनी भोजपुरी सिनेमांनासुद्धा संगीत दिले. तीथे त्यांचा रूबाब राजासारखा होता. त्याच प्रमाणे काही पंजाबी आणि गुजराथी सिनेमांबरोबर A.V.M.ने तमीळमधे डब केलेल्या चित्रपटांनासुध्दा संगीत दिले. चित्रगुप्त यांची मुले आनंद-मिलिंद हे सुद्धा नावाजलेले संगीतकार आहेत. चित्रगुप्त यांचे १४ जानेवारी १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply