व्हॉटसऍप आणि इतर माध्यमातून लोकप्रिय झालेले हे पोस्ट शेअर करत आहोत. मुळ लेखकाचे नाव माहित नाही. मात्र सर्वात शेवटी Forward करणार्याने प्राची जयवंत यांचे नाव दिले आहे.
आम्ही अस्सल सिकेपी..चोखंदळ अन चवींचे
निरनिराळे खाद्यपदार्थ..खासियत आमचे..
काय वर्णावा तो रविवारचा सरंजामी थाट
नाश्त्याला ब्रेड अन आॅमलेटचा घमघमाट
दुपारच्या जेवणात..मटणाची तर्री रस्सेदार
बिर्याणी जोडीला..खमंग सुगंध मसालेदार
पापलेट किंवा सुरमई फ्राय अशी खरपूस मस्त
कोलंबीचे कालवणही मग लगेच होते फस्त..
लज्जतदार चिकन असे लबाबदार झणझणीत
वरुन लिंबू पिळून करावे..चटकदार चमचमीत..
खिम्याचे कटलेट्स ही तर सर्वांनाच पर्वणी
माध्यान्हीला “हटके” अशी तोंडीलावणी
सोडे हे तर कुठेही भाजीत वाढवित असे स्वाद
मसाले वांगे,मेथी,कालवण अथवा सोडेभात
वालाचे बिरडे करावे छान परतूनी..सवताळूनी
ओले खोबरे अन कोथिंबीर घालावी वरतूनी..
कायस्थ पुरणपोळी असे मधुर व मऊशार
मटणाला “व्हेज”पर्याय म्हणून वड्यांचे सांबार
आळूच्या वड्या,वाटली डाळ यांची औरच बात
पंचामृत अन पुलावाचाही मग जमून येतो बेत..
सर्व पदार्थांचा राजा..शाही खाज्याचा कानवला
खमंग खुसखुशीत ..क्षणांत तोंडात विरघळला..
(Forwarded. Original Credit – प्राची जयवंत )
Leave a Reply