पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा मध्यावर कॉलरा डोके वर काढतो. गेल्या शतकात ७ वेळा पृथ्वीवर कॉलराने थैमान घातले. प्रत्येक खेपेला हे जिवाणू वेगवेगळ्या स्वरूपात आले. व्हिब्रियो कॉलरा नावाने ओळखले जाणारे हे जिवाणू एखाद्या स्वल्पविरामाप्रमाणे दिसतात. शेपट्यामुळे हे चपळ होतात.
ऑक्सिजनविरहित वातावरणात वाढणारे व्हिब्रियो कॉलरा २० अंश सें.पेक्षा अधिक तापमान असणाऱ्या मचूळ पाण्यात म्हणजे नदीमुखाशी व किनाऱ्यालगतच्या खाजणात जास्त आढळतात. कॉलराचे हे जिवाणू बरीच वर्षे या साथीचे कारण होते. १९७० पासून हे जिवाणू आफ्रिकेत ठाण मांडून बसले. १९९२ साली ‘कॉलरा ०१३९ बांगला’ या स्वरूपात दक्षिण भारत व बांगलादेशात यांचा प्रादुर्भाव झाला.
कॉलराच्या जिवाणूंची लागण दूषित पाण्यामुळे होते व माणसाच्या विष्ठेतून पसरतात. यांचा प्रसार हवेतील तापमान व बाष्प वाढल्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस होतो. माणसात यांचा संसर्ग वेगळ्या पद्धतीने होतो. जठरातील आम्लामुळे हे जिवाणू मरतात म्हणून प्रचंड घोळक्याने अन्नाबरोबर ते शरीरात शिरतात. मधल्या भागातील जिवाणू जठराच्या आम्लाच्या माऱ्यातून सुटून पुढे लहान आतड्यात शिरतात आणि अतिशय परिणामकारक व जहाल वीष तयार करतात. या विषाचा परिणाम होऊन आतड्याच्या पेशींतून क्लोराइड आयन आतड्याच्या पोकळीत येतात. त्याबरोबर तर्षणामुळे (ऑसमॉसिस) पाणीही येते.
ऋणभारित क्लोराइडपाठोपाठ घनभारित सोडियम आयनही आतड्यात येतात. अशा तऱ्हेने आतड्यात पाणी व सोडियम क्लोराइड खूप प्रमाणात येऊन शौचावाटे बाहेर पडते. रुग्ण शुष्क होतो व त्यास अतिशय गळल्यासारखे वाटते. रक्तदाब कमी होतो. शेवटी शुष्कतेने व सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाइटस् अतिप्रमाणात कमी झाल्यामुळे मृत्यू ओढवतो. वेळेवर उपचार केल्यास रुग्ण वाचू शकतो. तोंडावाटे व शिरेवाटे सलाइनचा मारा करायचा, तोंडावाटे नारळाचे पाणी भरपूर देणे यावर एरिथ्रोमायसीनसारखी प्रतिजैविके कुतूहल? परिणामकारक आहेत. रुग्णाच्या मलमूत्राचे निर्जंतुकीकरण अपरिहार्य आहे. शुश्रूषा करणाऱ्यांनी ‘वापरा व फेका’ हातमोजे घालावेत. सर्वत्र पाण्यात ठेवावेत. ‘ओ’ रक्तगट स्वच्छता ठेवावी. कपडे उकळत असणाऱ्यांना कॉलरा पटकन होतो. ‘एबी’ रक्तगट असणाऱ्यांना कमी प्रमाणात होतो. मे-जूनमध्ये साथीचा संभव असल्यामुळे कॉलरा व विषमज्वराची लस टोचावी. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत. खाण्याचे सर्व पदार्थ झाकून ठेवावेत. गाळून उकळलेले पाणी प्यावे. यात्रा, उरूस या ठिकाणी जाताना लसीकरण आवश्यक आहे.
– डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply