४ मार्च १९७५ ह्या दिवशी छोटी सी बात हा चित्रपट प्रदर्शित झाला.
‘छोटी सी बात’ या चित्रपटातील हे गाणं माझ्या मनातलं गाणं आहे. बी. आर. चोपडा यांनी हा चित्रपट निर्मित केला आहे. तसंच प्रख्यात दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
अमोल पालेकर, विद्या सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट अमोल पालेकर यांच्या चित्रपट कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. चित्रपटाचा नायक हा लहानपणापासून आपल्या आई-वडिलांच्या छायेत वाढलेला असतो. त्यांच्या निधनानंतर आत्मविश्वास हरवलेल्या नायकास रोजच्या जीवनक्रियेत, कामावर आणि प्रेमात अपयशाला सामोरं जावं लागतं. तशातच तो कर्नल जुलिऐस नगेद्रनाथ विल्फ्रेड सिंग (अशोक कुमार) यांची भेट घेतो. प्रशिक्षण घेतो आणि आपला हरवलेला आत्मविश्वास परत मिळवतो.
दररोज बस स्टॉप वर भेटणारा, वारंवार आपल्याशी बोलू पाहणारा तसंच रोज घरापर्यंत मागे-मागे येणारा नायक अचानक दिसेनासा होतो. तेव्हा नायिकेच्या मनातील होणारी तळमळ या गाण्यात कळून येते. योगेश यांनी शब्द रचना केलेल्या गाण्याला आपल्या सुमधुर संगीताने सजवलं आहे. या गाण्याचे संगीतकार आहेत सलील चौधरी, अजय घोलप
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply