नवीन लेखन...

अमेरिका खंड शोधणारा ख्रिस्तोफर कोलंबस

अमेरिका खंड शोधणारा ख्रिस्तोफर कोलंबसचा जन्म ३१ ऑक्टोबर १४५० व ऑक्टोबर १४५१ च्या दरम्यान झाला.

ख्रिस्तोफर कोलंबस हे इटलीचे नागरिक होता. स्पेनच्या राजेशाही आश्रयाखाली ख्रिस्तोफर कोलंबस हे चारदा ॲटलांटिक महासागर ओलांडून जाऊन आला व त्यामुळे युरोपला अमेरिकी खंडांची ओळख होऊ शकली. त्या जलयात्रा व हिस्पोलिनिओला बेटावर कायमची वसाहत स्थापण्याचे त्याचे प्रयत्ने ह्यांनी स्पेनच्या नव्या जगाच्या आगामी वसाहत मोहिमांचा पाया घातला गेला.

ख्रिस्तोफर कोलंबस विशेष शिक्षण न घेता सागरी चाच्यांच्या टोळीत काम करीत होता. पुढे चाचेगिरी सोडून कोलंबस व्यापारी जहाजांवर खलाशाचे काम करू लागला. या काळात त्याने प्रसिद्ध जगप्रवासी मार्को पोलो याचे पौर्वात्य देशांच्या प्रवासवर्णनाचे पुस्तक वाचले होते आणि भारताविषयी त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले होते. भारतात सागरी मार्गाने जाण्यासाठी कोलंबसने आपले काही अडाखे बांधले होते. पृथ्वी वाटोळी असल्याने इटलीहून पश्चिमेकडून सागरी मार्गाने गेल्यास भारतात पोहोचता येईल असा त्याचा अंदाज होता. त्या काळात खुश्कीने भारतात जाण्याच्या मार्गातले कॉन्स्टन्टिनोपल तुर्कानी घेऊन युरोपीयन व्यापाऱ्यांना भारताकडे जाण्याचा मार्ग बंद केला होता. त्यामुळे पौर्वात्य देशांकडे जाण्याचा सागरी मार्ग शोधण्याचा प्रयत्न अनेक दर्यावर्दी करीत होते. कोलंबसच्या सासऱ्यांची पोर्तुगालच्या राजाशी चांगली जवळीक होती. कोलंबसने पश्चिमेकडून सागरी मार्गाने भारतात पोहोचण्याची आपली योजना पोर्तुगालच्या राजासमोर मांडली; परंतु राजाने ती फेटाळून लावली. मात्र ही योजना १४९१ साली स्पेनची राणी इसाबेला हिने स्वीकारली. राणीने त्याला तीन मोठी जहाजे आणि ९० खलाशी देऊन ऑगस्ट १४९२ मध्ये या मोहिमेवर पाठविले.

दोन महिन्यांनी ऑक्टोबरात, कोलंबस एका बेटावर पोहोचला आणि त्या बेटाला त्याने ‘सॅन सॅल्व्हादोर’ हे नाव दिले. त्यानंतरच्या बेटावर कोलंबसने लाकडी किल्ला उभारून वसाहत स्थापन केली. या वसाहतीला त्याने नाव दिले ‘हिस्पानिओला’. कोलंबसाच्या या पहिल्या मोहिमेनंतर राणीने आणखी तीन मोहिमांवर कोलंबसला पाठविले. या तीन मोहिमांमध्ये त्याने डॉमिनिका, सेंट कीट्स, जमेका, त्रिनिनाद, व्हेनेझुएला, पनामा वगरे बेटे शोधून काढली.

कोलंबसने आपल्या चार मोहिमांमधून शोधून काढलेली भूमी हा काही भारतीय प्रदेश नाही हे पहिल्या मोहिमेतच त्याच्या लक्षात आले. पुढे या खंडाचे नाव अमेरिका असे झाले.

ख्रिस्तोफर कोलंबसचे निधन २० मे १५०६ रोजी झाले.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..