मी अजूनही त्या गोष्टीमुळे धक्क्यातच आहे. ते म्हणजे आपली मुलं इंग्लिश मेडीयम ला शिकली याचा गर्व झाला असेल तर आधी त्यांना एकदा आठवडा बाजारात भाजी वस्तू आणायला पाठवा. आता याना जीन च्या पॅण्ट मध्ये बघून बिचारे भाजी विकणारे फसवणार नाहीत. पण याना १९,२९,३९,४९, ५९,६९,७९, ८९,९९, ५६ हे आकडे मराठी तुन विचारा त्यांना सांगता येत नाहीत.
एक तर आपण त्यांना सांगून पाठवलेले असत कि जा बावा बटाटे २ किलो , २ किलो कांदे, त्याचे एवढे होतील. त्यामुळे अंदाज घेत ते खरेदी करतात वरील आकडे त्यांना इंग्लिश मध्ये सांगावे लागतात. आता हे ग्रामीण भागात गावात राहायला लागल्यावर किती प्रॉब्लेम येऊ शकतात. मी बघितलं आहे शेवटच्या वैद्यक शास्त्रात पदवी मिळविणाऱ्या मुलाला ७८ रुपये म्हणजे किती हे मराठीत चांगले बोलता येत असताना, कळत नव्हतं .
आता प्रश्न पडतो भले सर्व ऑनलाईन, paytm झालं असेल पण हि गोष्ट बेसिक आहे ती यायला नको ? आपल्याला भारतात राहायचं असेल तर तीन भाषा यायला हव्या हे प्रामाणिक मत. मग तुमचा अभ्यासक्रम काय वाटेल तो करा. एक त्याची मातृभाषा, हिंदी , इंग्लिश.
आणि मी म्हणते बाकीच्या राज्याचं राहू दे. पण आमच्या महाराष्ट्रातील पोरांना मराठी आकडे १५ वि शिकले तरी कळू नयेत ? आपण त्यांना आता डेबिट क्रेडिट कार्ड दिलीत, gpay बाकीचे पर्याय आहेतच पण निदान मराठीत बोललेले आकडे समजायला तरी हवेत ? मग वाटतं अशिक्षित बरे. ते शिकत शिकत सर्व शिकतात आणि मोबाईल हातात आला कि इंग्लिश आकडे समजतात.
अजून तरी ग्रामीण भागात, पुणे मुंबई शहरात, सर्रास इंग्लिश मध्ये पैसे सांगतात हे मी तरी ऐकलं नाही. अजून एक पिढी गेली कि ते घडू शकत पण मेल्या आमच्या पोरांचं काय ? कारण हे कोरोना बॅचच्या आधी १ ली ते ८ वी पास वाले. त्यात याना कोरोनाचे वरदान मिळालंच. मग काय जे मरे पर्यंत यायला हवं, तुम्ही शिका नाहीतर अनपढ रह। जो पर्यंत जिवंत आहात तो पर्यंत पोटाला काहीतरी द्यावं लागणार. त्यासाठी बाजारात जावं लागणार. आणि या अंकाशी मैत्री करावीच लागणार. नाहीतर कोण कधी फसवेल याचा पत्ता सुटाबुटातील बाबुला कळायचं नाही.
आम्ही इंग्लिश मेडीयम करत चुका केल्या त्या चुकांवर चुका होता आहेत. त्या कधी थांबणार ? .
विषय खूप गंभीर आहे. सर्वानीच गंभीर होऊन काहीतरी चांगला मार्ग काढायला हवा .
सौ निर्मिती नितीन सावंत
(कल्पना उर्मिला गोपाळ जोशी) भक्तीकुंज , रत्नागिरी
Leave a Reply