मोठ-मोठ्याने आरडत ओरडत, स्वत:शीच बोलत होता
विचार जरी गतिमान होते, विषय तोच तो घोळत होता…..१,
तऱ्हेवाईक बघूनी वागणे, खुळा त्याला समजत होते
वेडेपणाचा प्रकार समजूनी, दुर्लक्ष्य त्याजकडे करीत होते…२,
वृक्षाखाली बसूनी एकटा, डोळे मिटूनी शांत दिसला
त्याच विषयाचा विचार मनी, चक्र गतीने घोळू लागला…३,
बाह्यांगाची बघूनी शांतता, ज्ञानी त्यास समजू लागले
मतप्रदर्शनी तर्क आधार, चुकीचे घेणारे ते ठरले…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply