छुन्नुक छुन्नुक,
पैंजण वाजती,
थिरक थिरक,
पावले नाचती,
प्रेक्षक आपुले,
भान विसरती,
नृत्याच्या तालावरी,—-
रेषेला मिळे,
रेषा आणखी,
कसब आपुले,
चित्रकार दाखवी,
प्रतिमा काढे,
कशी हुबेहूब,
बोटांची जादुगिरी,—-
कंठातून मंजुळ,
सुस्वर निघती,
मधुर गायने,
मंत्रमुग्ध होती,
तालबद्ध गाणे,
गायिका गाई,—-
सहजसुंदर अभिनयाची,
श्रेष्ठ अदाकारी,
पाहून सर्वांचे,
डोळे पाणावती,
नाट्यकला आगळी,—-
अन्न सुग्रास,
सुगरण पकवी,
चोचले जिभेचे,
ती पुरवी ,
ढेकर तृप्तीची ,
देत उठती,
पाककला वेगळी,—-
सुंदर मेंदी,
हातावरी रेखती,
गोरेपान हात,
शोभिवंत दिसती,
किमया कलाकारीची,—-!!!!
©️ हिमगौरी कर्वे
Leave a Reply