बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे वेळ दुपारची चर्नीरोड स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर १
ती तशीच कोपऱ्यात पडली होती एका स्टॉलच्या बाजूला गोणपाटावर तिची अवस्था बघवत नव्हती ..मला द्या वगैरे आली नाही पण मनात विचार आला ,इतकी जर्जर , जगते कशाला..खरे तर या अवस्थेत मरण येतेच येते.एक अत्यंत विकृत असा विचार मनात आला.
हा विचार करत मी प्लॅटफॉर्मवरून पुढे जात होतो ,इतक्यांत ती भिकारीण फरफटत घसपटत प्लॅटफॉर्मच्या कडेला आली ,कशी फरफटत आली हे मलाही कळले नाही, दिसले नाही पाठमोरा होतो मी .मागून जोरजोरात कर्कश्य गाडीचा हॉर्न वाजत राहिला ,गर्दी जमली ,ती म्हातारी त्या प्लॅटफॉर्मच्या कडेवरून खाली पडली.
गर्दी जमली , माझ्या अंगाचा थरकाप उडाला डोळ्यासमोर तिचे छिन्नविछिन्न चित्र उभे राहिले.
प्लॅटफॉर्म वरील माणसांनी आरडाओरडा करत तिला वर खेचले.
आणि तिच्या जागेवर ठेवले.
हो ती इतके होऊनही जिवंत होती.
मी जवळ गेलो ,
लोक तिला पाणी पाजत होते शिव्या देत होते..
म्हणत होते मरायला पुढे गेली कशाला म्हातारे.
जवळचा स्टॉल वाला तिला चहा घेऊन आला होता.
मी मात्र सभ्य पांढरी कॉलरवाला
कोणता विचार करून बसलो होतो.
त्या दिवशी माझी मलाच लाज वाटली.
सतीश चाफेकर
Leave a Reply