नवीन लेखन...

चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक

जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.

पांडुरंग सातू नाईक यांचा जन्म १३ डिसेंबर १८९९ रोजी गोव्यातील म्हार्दोळ या गावी झाला.

पांडुरंग सातू नाईक यांचे शिक्षण मराठी तिसऱ्या इयत्तेपर्यंत. १९१५ साली ते मुंबईला गेले. तेथे दादासाहेब फाळके यांच्या चित्रपटसंस्थेत प्रवेश करून छायाचित्रणातील अगदी प्राथमिक धडे फाळके यांच्या हाताखाली घेतले. पुढे सहायक छायाचित्रकार म्हणून त्यांनी कोहिनूर फिल्म कंपनी, लक्ष्मी प्रॉडक्शन्स व रणजित फिल्म कंपनी इ. संस्थांमार्फत कामे केली.

१९३४ मध्ये छायाचित्रणाचे अद्ययावत शिक्षण घेण्यासाठी ते जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड या देशांत गेले होते. परदेशातून आल्यावर इंपीरिअल फिल्म कंपनीत त्यांनी प्रवेश केला. तेथे असतानाच १९३४ सालच्या इंदिरा एम्. ए. या बोलपटाच्या वेळी फळ्या बांधून तेथून प्रकाशयोजना करण्याचा अत्यंत यशस्वी प्रयोग त्यांनी केला होता. तो आजही अनेकांकडून अनुसरण्यात येतो.

१९३६ साली मास्टर विनायक व बाबूराव पेंढारकर यांच्या भागीत हंस पिक्चर्सची स्थापना करून त्यांनी छाया (१९३६), धर्मवीर, प्रेमवीर (१९३७), ब्रह्मचारी, ज्वाला (१९३८), ब्रँडीची बाटली, देवता, सुखाचा शोध (१९३९), अर्धांगी (१९४०) या गाजलेल्या चित्रपटांचे उत्कृष्ट छायाचित्रण केले; तर १९४० मध्ये आचार्य अत्रे, बाबूराव पेंढारकर, विनायक व राजगुरू यांच्या नवयुग फिल्म कंपनीचा लग्न पहावं करून (१९४०) हा चित्रपट पांडुरंग नाईक यांनी चित्रित केला होता.

१९४१ सालच्या अमृत या कोकणच्या पार्श्वभूमीवरील चित्रपटात वि. स. खांडेकर यांचे शब्दसौंदर्य नाईकांच्या छायालेखनानेच साकार झाले होते.

१९४२ साली बाबूराव पेंढारकर व पांडुरंग नाईक यांनी न्यू हंस या चित्रपटसंस्थेची स्थापना केली. या संस्थेने पहिला पाळणा, भक्त दामाजी (१९४२) व पैसा बोलतो आहे (१९४३) हे चित्रपट सादर केले. त्यांचे छायालेखन नाईकांनीच केले होते.

पुढे त्यांनी १९४४ साली प्रभात फिल्म कंपनीत प्रवेश करून रामशास्त्री (१९४४) व लाखारानी(१९४५) या चित्रपटांचे छायालेखन केले, तसेच गोयलच्या चिराग कहाँ रोशनी कहाँ या हिंदी चित्रपटाचे छायालेखनही त्यांचेच होते. हाच त्यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत चित्रित केलेला शेवटचा चित्रपट होता, तर गोयलचाच दूर की आवाज हा त्यांनी चित्रित केलेला पहिला रंगीत चित्रपट होता.

आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता हे त्यांच्या छायालेखनाचे वैशिष्ट्ये होते.

पांडुरंग सातू नाईक यांचे २१ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले.

— संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..