
सध्या सोशल मिडियावर अमीर खानची मुलगी आयरा का इरा खान व मराठी नवरदेव नुपूर शिखरे च्या लग्नाचीच चर्चा आहे .
आता हे सगळं बघताना त्या सगळ्यांचे अवतार बघून मला फक्त..हम भी पागल तुम भी पागल ..!!!हे गाणं आठवतं आहे..
अमीर खानच्या दोन्ही घटस्फोटित बायका ..त्यांची मुलं सगळे मिळून येड्यांची जत्रा भरल्यागत फिरत आहेत त्यात ती आयरा नवरी आधीच तोकड्या कपड्यात च्युईंगगम चघळत रस्त्यावर फिरत आहे .
तो नवरदेव म्हणे धावत धावत तेही अर्ध्या कपड्यात लग्न विधीला पोहचला .. स्वतःला उगाच अतीशहाणा समजणारा तो अमीर खानही मुलीचा प्लाझो घालून लग्नात फिरतोय ?? तर ती किरण राव नववारी पोतं !!अंगावर लपेटून म्हणे मराठी वेशभूषा करून आलीय .
आता मराठी जावयी आहे म्हटल्यावर हा मराठी ड्रामा आलाच पण तो कोणासाठी ??
लग्न मुलीचं.. आईवडील कोण ..??
ते एक नाहीत …मग हा फार्स कशासाठी ??
कुठं कोपऱ्यात लग्न करून मोकळे व्हायचे तर नाही ..
पैशाला हवा नको का लागायला ??
मग हे तमाशे …
काय म्हणावं.. माझ्या मते बॉलिवूडवाल्यांनी लग्न या संस्कार विधीचा अक्षरशः खेळ मांडला आहे .
ते आधी लिव्ह इन मध्ये राहतात मग धुमधडाक्यात लग्न करतात .नंतर काही दिवसांनी…….
जाऊ द्या !ते लगेच सांगत नाही .
बरं लग्न कसं तर अगदी थाटामाटात हळदी मेहंदी बारात वगैरे नंतर रिसेप्शन …जंगी तयारी पोशाख दागिने पाहुणे फोटो सेशन सगळं कसं चकाचक !…पण सगळं अगदी त्यांच्या सवयीप्रमाणे नौटंकी स्टाईल .
माझ्या मते खरं तर या हिरो हिरोईन ला लग्न वगैरे करण्याची गरज नसतेच . ते लग्नाआधी अनेकांशी घरोबा करून बसलेले असतात यांच्या गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड ची लिस्ट खूप मोठी असते . पण शेवटी !!! मग आपणही लग्न करून बघावं!! असं त्यांना वाटतं.
.. आणि इतका पैसा कमवायचा तरी कशासाठी ??चलो फन करते है.. या विचाराने ते लग्न नावाचा इव्हेंट घोषित करतात . हौसेखातर .. अगदी प्रेग्नंट हिरोईन च्या लग्नाचे इव्हेंट करून हे नक्की कोणाला फसवतात? एकमेकांना की अजून कोणाला? त्यांचं त्यांनाच माहीत . खरंतर या सिनेमा कलाकारांचे जगणं म्हणजे तसंही बिनधास्त निर्लज्ज पणा असतो .
पण या लग्न बंधनाचा प्रयोग ते करून बघतात . आणि हा तमाशा ते लोकांना दाखवतात . लोकही चवीनं ते बघतात टी वी न्यूज सोशल मिडिया नेटवर्क ला तर चोवीस तास मसाला बातम्या पाहिजे असतात आणि बघणारा ग्राहक चवीनं ते बघतो मग काय हा बिन पैशाचा तमाशा सुरू.. गेल्या वर्षभरात बारा महिने बारा सेलिब्रिटींची लग्न इव्हेंट आपण बघितले त्यात क्रिकेट पटूंचे ही लग्न आले .सगळे साधारण सारखेच …वधूचा भारी पांढरा लहंगा ! वराचा तसाच शेरवानी.!!
..करोडोंचे दागिने आणि नकली हास्य …जंगी मेजवानी, स्टार्स ची हजेरी.. एक हिरोईन तर स्वतःच्या लग्नात मधूनच सिगारेट पिण्यासाठी बाजूला जायची म्हणे !! ..वा लग्न संस्काराची चेष्टा..!! मग लग्नातच सर्वांसमक्ष चुंबन हे पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन !! ..मग पूजा शादी के फेरे.. ते भारत संस्कृती प्रेम दर्शन .. दिखावा .. माझ्या मते हे सगळं फक्त फोटो व्हिडिओ साठी लग्न समारंभ दिखावा केला जातो .
तसंही लग्न टिकलेच पाहिजे !!? असा या बड्या स्टार्सचा हट्ट नसतो . लग्न ही गाजराची पुंगी वाजली तर ठिक नाहीतर ती खाऊन मोकळं व्हायचं! आणि लगेच डायवोर्स घेऊन पुढच्या लग्नाच्या तयारीला लागायचं! हा त्यांचा फंडा आहे. डायव्होर्स साठी ची सेटलमेंट देवघेवची भलीमोठी रक्कम ही बहुधा जास्त झालेल्या पैशाची विल्हेवाट लावण्यासाठीच असते .
मग तू खुश मी खूश .. तू मोकळा मी मोकळी…अशा प्रकारे लग्न काही वर्षांत मार्गी लागतात..असे लग्न तर आता मराठी कलाकार ही करत आहेत . मराठी पाऊल पडते पुढे.. बरं हे बॉलीवूड हिरो हिरोईन डबल लग्नही धुमधडाक्यात करतात . पुन्हा इव्हेंट.. व त्या लग्नाला पहिल्या लग्नाचे मुलं आवर्जून उपस्थित राहतात .?! किती ते आदर्श ???
हे आईबाप आणि मुले … सगळे मिळून हा फार्स करतात पुन्हा पुन्हा आणि आम्ही सिनेप्रेमी चवीनं हा आचरटपणा बघतो. आता या सिनेमा कलाकारांचे मुलंही स्टार किड्स खूप व्यवहारिक असतात .. आईवडील घर प्रेम वगैरे हे सगळं फक्त दिखावा आहे .. खरं काय तर फक्त पैसा ऐशोआराम आहे … तुम्ही लग्न कितीही करा !!आमच्या साठी पैसा ठेवा बस!! आम्हाला बाकी काही नको … यांना शिक्षणाची गरज नाही .. जीवनात कुठलाही संघर्ष नाही..सगळं आयते मिळतेच .. फॉरेनच्या वाऱ्या,ऐशोआराम,तयार कामाच्या संधी! आणि झालं तर नशा व्यसनांची सोय!!
आणि बापका बडा नाम !! .. जिंदगी में और क्या चाहिए ?व्हेरी प्रॅक्टीकल पिपल …!!!
बरं ही सेलिब्रिटींची मुलंही लगेच वयात येतात तेही लवकरच गुण उधळतात शिवाय दिमाखात मिरवतात !!कारण पैसा आणि प्रसिद्धी … आता या सेलिब्रिटींकडून तरूणाई काय आदर्श घेते ? अगदी मध्यमवर्गीय तरूणाईचाही आता हाच अजेंडा आहे की कसेही वागा …कसाही पैसा कमवा उधळा ..मौजमजा करा ..हेच तर जगणं आहे …. ज्यांच्या आईवडिलांनी पैसे कमावले आहेत ते सगळे खर्च करून आनंद घ्यायचा …काही यशस्वी तरूण स्वतः करिअर शिक्षण घेऊन भक्कम पैसे कमावतात आणि तेही असेच फॅशन हॉटेल उच्च आधुनिक राहणीमान.. मुलींनी तोकड्या कपड्यात वावरणं .. क्लब पार्ट्या हीच आजची संस्कृती झाली आहे आज मुलामुलींनी मुक्त मोकळं फिरणं .. लैंगिक मुक्त आचरण .. अश्लीलता, सहज व्यसन करणं आयुष्य जगणं म्हणजे धिंगाणा घालणं हा अनेक तरूणांचा आता फंडा आहे .
व या सर्व प्रकाराची पाळंमुळं या सिनेमा वाल्यांनी इथं रूजवली आहेत … बरं यांचे वेडिंग इव्हेंट बघून सामान्य लोकही जमेल तितका पैसा उधळून असे वेडिंग इव्हेंटस करतात .. सहज सुबत्ता आता दिसत आहे . त्यामुळे हे सगळं जमतं.
पण मुद्दा हा की लग्न हा इव्हेंट नसून वधूवराच्या आयुष्याभराचा हा सहजीवनाचा संस्कार आहे . पण प्रत्यक्षात या संस्काराचे चे गांभीर्य आता तरूण पिढीला नाहीच .ते निडर बेपर्वाई ने वागत आहेत . पडद्यावरचा सिनेमा आता रस्त्यावर दिसतो आहे आणि यात कोणालाही काही चूक वाटत नाही हे जास्त चूक आहे . आपण उगाच भारतीय संस्कृती च्या गप्पा मारतो पण प्रत्यक्षात सोयीप्रमाणे आपण संस्कृतीला विसरून अनेकदा पुढे निघतो हा दुटप्पीपणा ही या आधुनिक काळाची काळी बाजू आहे.तकलादू पणा आहे .या मजेत जगणाऱ्या पिढीला पाश्चात्य व हिंदी उच्छृंखल सिनेमा संस्कृती चे आकर्षण आहे,त्याने खूप दिशाभूल होत आहे . मुळात ही झिंग आहे जी आज तरूणाई वर चढली आहे .
खरं तर आजचा तरुण हुशार बुद्धिमान कुशल आहे , पण तो खूप अस्थिर अस्वस्थ जीवन जगत आहे . शैक्षणिक तसेच करिअरच्या स्पर्धा , वाढती लोकसंख्या, सामाजिक राजकीय विषमता,धर्म अध्यात्माचा वाढलेला घोळ, जातीभेद , प्रांतीय भेद , शिवाय रोजगार उपलब्ध नाही , उंचावलेले रहाणीमान , समाजातील घसरलेली नितीमत्ता,वाढलेल्या गरजा , फक्त पैसा महत्वाचा हा विचार, अनेक स्वैर आकर्षणे ,सोशल मिडिया नेटवर्क मोबाईल यातून खुणावणारे विचित्र जग, व्यसने लैंगिक समस्या,विविध शोषण , समाजातील वाढती गुन्हेगारी , आधुनिक काळातील या आधुनिक समस्यांशी झुंजताना आज तरूण हैराण होतो आहे.यातून अनेक तरूण निराश होऊन जगत आहे . लग्न परिवार कुटुंब व्यवस्था ही माणसाला स्थैर्य देण्यासाठी आपल्या संस्कृतीने जपलेली परंपरा आहे .पण इथेही तरूण मुलंमुली गोंधळात आहेत . जोडीदाराच्या वाढत्या अपेक्षा आणि नैतिकतेच्या डळमळीत चौकटी यात ही कुटुंब संस्था टिकवणे अवघड आहे असं चित्र दिसत आहे . आज शिक्षण पैसा समृद्धी आहे पण तरूणाई विफल आहे अशा वेळी प्रत्येकाने सहज आनंदी जगण्यासाठी आपआपल्या गरजा व जबाबदारीची..व कर्तव्याची सांगड आपण कशी घालावी ??हे अधिकाराने तरूणांना शिकवणारे ज्येष्ठ कोणी नाही ..ही खरी शोकांतिका आहे .!! त्यात हे सिनेमावाले पिसाळललेले जनावर सारखं सिनेमे काढून पडद्यावर घाण करतात आणि प्रत्यक्षात असं आचरट आचरण करून समाज आणि देशाच्या तरूणाईला मुलांना दिशाहीन करतात .हा अक्षम्य गुन्हा आहे .यावर शिक्षा एकच यकॉट बॉलिवूड …
Stop this nonsense…
डॉ मीना सोसे
लोणार
Leave a Reply