या एक दोन महिन्यातील वेगवेगळ्या मोर्चांच्या वातावरणामुळे हल्ली लोक खूप चौकशी करू लागलेत हो. म्हणजे,तुम्ही कोणत्या जातीचे, तुम्ही सीकेपी सीकेपी म्हणजे नक्की कोण वगैरे. उत्तरादाखल मी सांगतोच की आम्ही चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी. साधारणपणे ठाणे मुंबई बाहेरच्या लोकांना हा प्रश्न पडतो. “अच्छा म्हणजे तुम्ही मच्छी खाणारे ब्राह्मण का ?” हे ऐकून तर मला गंमतच वाटते. अहो मच्छी खाणाऱ्या काही ब्राह्मणांनी आम्हाला कधीच मागे टाकलंय. आम्ही सोमवार गुरुवार तरी पाळतो. पण आमचे हे दाते, कुलकर्णी, रिसबूड,जोशी, देशपांडे या आडनावांचे घट्टमित्र तर सगळेच वार सारखेच म्हणत आम्हा सीकेप्यांनाच कुठे काय ‘बेस्ट’ मिळतं हे सांगतात. म्हणून वाटलं कि या चौकस मंडळींना थोडं आपल्याविषयी सांगावं. खरंतर जातीपातीचे दिवस आपल्या दृष्टीने काही दशकांपूर्वीच संपले असले तरी आपली ओळख देताना काही गोष्टी सांगणे गरजेचं. बघा तुम्हाला पटतंय का… सीकेपी म्हणजे …..
सीकेपी म्हणजे बाजीप्रभूंचा आवेश,
सीकेपी म्हणजे बाळासाहेबांचा आदेश,
सीकेपी म्हणजे गडकऱ्यांचे प्याले,
सीकेपी म्हणजे आमचे खळे काका आणि मोहिले
सीकेपी म्हणजे अवधूतच गाणं,
सीकेपी म्हणजे दिलखुलास जगणं,
सीकेपी म्हणजे नितांत सौंदर्याच लेणं,
सीकेपी म्हणजे बुद्धिमत्तेच खणखणीत नाणं
सीकेपी म्हणजे रविवारच मटण,
सीकेपी म्हणजे बोम्बलाच कालवण,
सीकेपी म्हणजे चीम्बोरीचा घट्ट रस्सा,
सीकेपी म्हणजे चवदार हातांचा रुचकर वारसा
सीकेपी म्हणजे निष्ठा ,
सीकेपी म्हणजे विश्वास,
सीकेपी म्हणजे भरवसा,
सीकेपी म्हणजे प्रगत समाजाचा खराखुरा आरसा
सीकेपी म्हणजे नितिमत्ता,
सीकेपी म्हणजे गुणवत्ता,
सिकेपी म्हणजे विद्वत्ता,
सीकेपी म्हणजे क्रांतिकारी विचारांची सुबत्ता,
सीकेपी म्हणजे धैर्य,
सीकेपी म्हणजे शौर्य ,
सीकेपी म्हणजे संकटांशी दोन हात,
सीकेपी म्हणजे ताठ मानेने जगणाऱ्यांची जात
देशाच्या उभारणीत हिरहिरीने भाग घेणारा,कला क्रीडा मनोरंजन क्षेत्रात आपली अनोखी छाप पाडणारा, सरकारी प्रशासकीय सेवेत सदैव अग्रस्थानी असलेला पुरोगामी विचारांचा सुशिक्षितांचा हा समाज. स्वाभिमान आणि देशाभिमानापेक्षा जगात काहीही मोठं नाही हे जन्मापासूनच मनावर बिंबवलेला हा आमचा समाज. अल्पसंख्यांक असूनही आरक्षणापेक्षा देश रक्षणासाठी लढणारा आमचा हा समाज. आपल्या संभाषण चातुर्याने, बुद्धिवादाने आणि अर्थातच पाककौशल्याने इतर सर्व समाजबांधवांची हृदये काबीज करणारा हा आमचा समाज. खऱ्या अर्थाने नाती जोडून मैत्रीचे बंध दृढ करणारा आणि या देशाच्या इतिहासात अनेक गौरवास्पद पदे भूषविलेल्या दिग्गजांचा हा समाज. सर्वात महत्वाचे म्हणजे… तुमची जात, तुमचा धर्म कोणताही असो, चांगल्या कामासाठी आजही तुमच्यासाठी आणि तुमच्यापाठी भक्कमपणे उभा राहणारा, तुमच्या दुःखात हळहळणारा आणि सुखात समरस होणारा आमचा हा समाज. अजून काय सांगू.
एक लाख नसू कदाचित..पण लाखात एक नक्कीच आहोत!
माझ्या सर्वधर्मीय समाजबांधवांना, मित्र परिवाराला आणि तमाम देशबांधवांना आम्हा सर्व सीकेपी समाजबांधवां तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
समीर गुप्ते, ठाणे.
samhere#sameergupte.blogspot.in#sameer6949@gmail.com
( आवडलं तर फॉरवर्ड करा …माझ्या नावासहित केलं तर मला पण आवडेल)
Very nice and informative post.