शास्त्रीय आणि सुगम संगीत गायक विनोद शेंडगे यांचा जन्म २९ मे ला झाला.
विनोद शेंडगे गायक, संगीतकार आणि पंढरपूरच्या अनाहत रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक. विनोद हे पंढरपूर येथील संत साहित्याचे अभ्यासक वै.ह.भ.प.सुधाकर शेंडगे हे यांचे चिरंजीव होत. पंढरपुरच्या संगीत विश्वातील एक अग्रेसर नाव म्हणून विनोंद शेंडगे यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या २५ वर्षापासून सांगितीक कलेच्या जोरावर येथील प्रत्येक कार्यक्रम शेंडगे यांच्या सूराने जवळ केला आहे. मुंबई पुण्यासारख्या मायानगरीनंतर अद्ययावत अशा अनाहत रेकॉडिंग स्टुडिओच्या माध्यमातुन शेंडगे यांनी आपल्या कलेचा वरचष्मा यापुर्वीच सिध्द केला आहे.
‘गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने।।’ या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या वचनांनुसार गायनाचे प्रशिक्षण न घेता मनाच्या आवडीनं वयाच्या आठव्या वर्षापासून विनोद शेंडगे गाणं गाऊ लागले. हळूहळू अनुभवातून त्यांना राग आणि स्वरांचं ज्ञान होऊ लागले. त्यानंतर त्यांनी गुरूकडून गायनाचे धडे घेतले. मूळचे पंढरपूरमधील असूनही मुंबईतील तुळशीरामबुवा दीक्षित, प्रमोदबुवा दीक्षित, मारुतीबुवा बागडे, खाशाबा कोकाटे या गायनसम्राटांच्या भजन गायकीचे संस्कार शेंडगे यांच्यावर झालेले आहेत. वयाच्या बावीसाव्या वर्षी बडोद्यामध्ये नारायणराव पटवर्धनांकडे जाऊन पाच वर्षे त्यांनी गुरुकुल पद्धतीनं गायनाचं शिक्षण घेतलं. आध्यात्म आणि भारतीय वेदांताचा अभ्यास करण्याची आवड असल्याने दोन वर्षे आळंदीमध्ये राहून भारतीय विद्याभवनची ‘किर्तन कोविद’ ही पदवी घेऊन किर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची कलाही त्यांनी आत्मसात केली. त्यानंतर बीकॉम करण्यासाठी पुन्हा पंढरपूरमध्ये आले. त्यावेळी डॉ. विकास कशाळकर यांच्या सान्निध्यात राहून शिकताना शब्दब्रम्ह आणि नादब्रम्ह हेच आपल्या जीवनाचे ध्येय असल्याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या ‘रयतेचा राजा राजा शिवछत्रपती’ या नाटकाला पार्श्वसंगीत दिले आहे. पंढरपूरात प्रत्येक गणेशोत्सव मंडळ लाईक डेकोरेशन बनवतं. गणेशोत्सव मंडळाची चार स्कीट्स अशी एकूण दहा मंडळ आहेत. दरवर्षी ते ४०-४५ स्कीट्सचं बॅग्राऊंड परंपरा म्युझिक आणि रेकॉर्डींग करतात. त्यामुळं त्यांना पार्श्वसंगीताचा अनुभव आहे. गाण्यांबाबत बोलायचं तर ते शास्त्रीय गाणी शिकले आहेत. राम कदम, चंद्रशेखर गाडगीळ, यशवंत देव, जयवंत कुलकर्णी, श्रीनिवास खळे यांसारख्या दिग्गजांकडून ते शिकले आहेत.शेंडगे यांचा ‘जय जय पांडुरंग हरी’ हा टी-सिरीजचा अल्बम गाजला आहे. चंद्रशेखर गाडगीळांच्या ‘मूडस ऑफ चंद्रशेखर’मध्येही शेंडगे यांनी गाणी गायली आहेत,
‘तू माझा सांगाती’ या मालिकेत त्यांनी अभंग गायन केले त्या नंतर आता मात्र शेंडगे यांची भूमिका गायकांवरून थेट संगीत दिग्दर्शकावर येऊन ठेपली आहे. ‘साई बाबा-श्रद्धा आणि सबुरी’ या मालिकेचे “साईराम म्हणा तुम्ही साई श्याम म्हणा… ” हे मालिकेचं शीर्षक .लोकप्रिय गायक ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकाऱ्यांनी गायले असून त्याला संगीत विनोद शेंडगे यांनी दिले आहे. तसेच या मालिकेच्या पार्श्वसंगीतही विनोंद शेंडगे यांनी दिले आहे. या गीतांच्या संगीतामध्ये वारकरी सांप्रदायिक भजनी ठेक्यासह सुफी संगीताचा वापर केला आहे.
तसेच या मालिकेसाठी त्यांनी ‘पागल कहलाना…’ हे गाणं केलं आहे. याशिवाय कबीरमहाराजांचे दोहे केलेत. हे दोहे संगीतमय रूपात समोर येतील. भारतीय वाद्यं लीडला घेऊन, पार्श्वसंगीतासाठी डफ, चंडा, पखवाज यांचा अधिक वापर केला आहे. याशिवाय सितार, व्हायोलीन, बासरी यांचाही उपयोग केला आहे. कोरसच्या माध्यमातून नोटेशन रूपानं संगीत देण्याचा प्रयोग करत आहे. काही व्यक्तिरेखांसाठी पाश्चात्य संगीताच्या हिदमच्या जोरावर म्युझिक करायचा विचार आहे.
या मालिकेच्या पार्श्वसंगीता बाबत ते म्हणतात ते म्हणतात मूळात मी वारकरी संप्रदायाचे असलो तरी साई स्वाध्याय मंडळाच्या माध्यमातून साधारणपणे २० वर्षापूर्वी मी दादा भागवतांच्या साईभक्ती संप्रदायात आलो. तेव्हापासून मला सूफी संगीताचे ज्ञान आहे. साई भवती परंपरेमध्ये आरती साधना हा अतिशय महत्वाचा संगीतप्रकार आहे. दत्त,नाथ आणि सूफी संप्रदायाचं एकत्रीकरण आरतीसाधनामध्ये असल्याचं माझ्या लक्षात आलं. त्याचा उपयोग मला ‘साईबाबा’ मालिकेला संगीत देताना होत आहे. कारण नाथ संप्रदाय हाच वारकरी संप्रदाय आहे. सूफी आणि भक्तीसंगीत हे एकच आहे. वारकरी फडामधील संगीताचा पायाही शास्त्रीय संगीतावरच आधारित आहे. तोच बेस सूफीमध्येही आहे. त्यामुळे वारकरी असूनही साईभक्तीशी आपल्या संगीताचा मेळ घालणं सोपं गेलं.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply