पंडित शौनक अभिषेकी यांचा जन्म २८ एप्रिलला झाला.
पंडित शौनक अभिषेकी है भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात आज आदराने घेतले जाणारे नाव आहे. भारतीय संगीताचा प्रचार आणि प्रसार जगभर करत असलेल्या कलाकारांमध्ये ‘शौनक अभिषेकी’ आघाडीवर आहेत. ‘स्वराभिषेकी” पद्मश्री पं.जितेंद्र अभिषेकी यांचे सुपुत्र आणि शिष्य असलेल्या शौनक यांचे गायनाचे प्राथमिक शिक्षण पं.जितेंद्र अभिषेकी यांच्या कडे व पुढे त्यांनी जयपूर घराण्याच्या श्रीमती कमल ताई तांबे यांच्याकडे शिक्षण घेतले. लता मंगेशकर या त्यांच्या चुलत आत्या होत.
शौनक यांच्या गायकीमध्ये आग्रा व जयपूर घराण्यांच्या गायकीचे मनोहारी मिश्रण ऐकावयास मिळते. गायनाची तंत्रशुद्धता आणि भावनाप्रधानता है पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या गायकीचे विशेष गुण शौनक अभिषेकी यांनी आत्मसात केले आहेत. अभिजात शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, भावसंगीत आणि अभंग अशा उपशास्त्रीय संगीत प्रकारांवरही त्यांचा अधिकार आहे.
भारतातील सर्व संगीत महोत्सवासह भारताबाहेर यूरोप, अमेरिका, इग्लंड, ऑस्ट्रेलिया, द दक्षिण अफ्रीका, रशिया, चीन आदी देशांमध्ये आपली कला सादर करुन रसिकांची वाहवाही मिळवली आहे. भारतीय आणि पाश्चिमात्य संगीताचे फ्युजन करण्याचे अनेक प्रयोग इतर भार परदेशी कलाकारांच्या साथीने ‘Vibgyor’,’ताल यात्रा’, ‘साउंड ऑफ इंडिया ‘माईल्स फ्रॉम इंडिया’ अशा कार्यक्रमातून सादर करून त्यांनी संगीत क्षेत्रातील ही वेगळी वाट सुद्धा समर्थपणे हाती आहे जी रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. या शिवाय अनेक टीव्ही चॅनेल्सवरील संगीत स्पर्धामध्ये विशेष निर्णायकाच्या भूमिकेत शौनक अभिषेकी दिसले आहेत.
शौनक अभिषेकी यांना पुणे की आशा पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, एबीपी माझा गौरव पुरस्कार, एन सी पी ए एक्सलन्स अवार्ड, सरस्वती बाई राणे पुरस्कार, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, सिम्बायोसिस युनिव्हसिटी कल्चरल अवॉर्ड, पंडित राम मराठे पुरस्कार, वैष्णव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply