संसारातील ऐहिक सुखे, धडपडीने मिळवीत असे
प्रयत्नातील आनंद खरा, भोगण्यांत तो दिसत नसे…१,
उबग येई ह्याच सुखाची, जीवन खर्चीले ज्या करितां
त्या सुखांत समाधान नव्हते, जाणवले तेच मिळतां…२,
प्रभू मिलनाचा आनंद तो, चिरंतर ते समाधान देयी
ईश्वरी मार्ग खडतर असूनी, क्लिष्टता येते मनाचे ठायीं..३,
तसेच चाला उबग सोसूनी, कठीण अशा त्या मार्गावरती
यश येईल कष्टाचे परि, संपूर्ण समर्पण जेव्हां होती….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply