कोडमंत्र. एक अफलातून मराठी नाटक . हे नाटक पाहून बाहेर पडत असताना भारावून गेलेला नाही असा नाट्य – रसिक नसेल . भले प्रतापराव निंबाळकर ( अजय पूरकर ) ही या नाटकातील व्यक्तिरेखा जे वागते असे चित्रणजे या नाटकात आहे , ते वागणे चूक की बरोबर याविषयी मत – मतांतरे जरूर असतील ; पण हे नाटक अफलातून याविषयी मात्र पूर्णपणे मतैक्य . आणि फक्त मतैक्यच . मुक्ता बरवे आणि अजय पूरकर या दोघांच्याही नाट्य- क्षेत्रातील कारकीर्दीला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवणारी अशी या दोघांची या नाटकातली कामगिरी आहे . या नाटकातील इतर कलाकारांचीही , अगदी चाळीसच्या चाळीस NCC cadet सह , ( आमच्या डोम्बिवलिचे आहेतते ) सगळ्यांचीच कामगिरी इतकी उत्तम आहे की त्याशिवाय हे नाटक इतके उठावदार , इतके परिणामकारक होणारच नाही .
आपण सगळेच इतके आपल्या स्वतःच्या सवयीन्चे गुलाम असतो की एखादी सवय एकदा लागली की लागली . लोक त्याबाबत आपल्याला कितीही बोलली ( चांगलेही आणि वाईटही ) तरी आपण तसेच वागत राहातो . अगदीआपल्या स्वतःच्याही नकळत .
आता हेच पाहा ना ! अलिकडच्या काळात मला एक सवय लागली आहे . . ती म्हणजे कोणतेही नाटक , कोणताही सिनेमा पाहाताना , माझ्याही नकळत माझे मन त्या कथा – वस्तूची , त्यातल्या संवादाची सांगड गुंतवणूकक्षेत्राशी घालू लागते . इतकेच नाही तर ते मी असे फ़ेसबुक वर लिहीत जातो . त्याचीही आता सवयच लागली आहे . सवय कसली , अगदी व्यसनच म्हणा ना ! ! ! ” सवयीतूराणा न भयं न लज्जा ” अशातली गत . . . . मीअसे लिहिलेले वाचण्याची सवय तुम्हांलाही लागली असेल आणि तो ” जुलमाचा राम – राम ” नसेल अशी आशा आहे .
हे आता इथे आठवायच कारण म्हणजे या नाटकाच्या प्रौढ नायकाला आपली कमांड सर्वोच्च पातळीवर असण्याची इतकी सवय झालेली असते की ते स्थान टिकवण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो . अगदी त्याच्यावरिष्ठनी तसे करण्यास औपचारिक , आणि अनौपचारिक रित्याही , मनाई केलेली असूनसुद्धा . या स्थितीचे वर्णन या नाटकाच्या जाहिरातीत फार छान , समर्पक शब्दांत येते . . . . ” कर्तव्य आणि कर्त्यव्याचा अतिरेक यांतलीसीमारेषा पातळ . . . ”
दोन – तीन वेळा हे नाटक पाहूनही ही ओळ काही माझा पिच्छा सोडता सोडत नाहीये . माझाही याबाबतीत अतिरेक होत आहे की काय अशी माझी मलाच शंका यावी इतका पिच्छा .
पण दरवेळी मला असे वाटते की आपणां सगळ्यांचे स्वतःच्या गुंतवणुकीबाबत असे झाले पाहिजे . अगदी पूर्णपणे नाही तरी फार मोठ्या प्रमाणात तरी .
पण ते नाही होत ना तसे ! ! ! झाले तरी ते फारच थोड्या जणांचे होते आणि झाले तरी फार थोड्या प्रमाणात होते . हीच तर खरी शोकांतिका आहे . अशावेळी ” कोडमंत्र ” हे नाटक ज्या मूळ पुस्तकावर आधारीत आहे , त्यापुस्तकाचे नाव ” A Few Good Men ” असॆ आहे याचे नवल वाटेनासे होते . काही ( काहीच हो ) माणसे गुंतवणूक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असतात आणि ती ” चांगलीही ” असतात बरं का ! ! अगदी ” पैशांच्या मागेलागला ” अशी हेटाळणी जरी त्यांच्यामागे केली गेली तरी .
जणू काही इथेही ते काम फक्त ” A Few Good Men ” यांचेच .आपण सगळे गुंतवणुकीच्या बाबतीत अनिच्छ आणि अनिच्चेचा अतिरेक , अद्न्यान आणि अद्द्न्याचा अतिरेक , आळस आणि आळसाचा अतिरेक , अभाव आणिअभावाचा अतिरेक यांच्या सीमारेषा पातळ करण्याच्या फिकिरीत असतो . खरं म्हणजे , याच नाटकातील वाक्य वापरत सांगायचे तर याबाबतीत आपली मनोभूमिका ” १ टक्का जरी चान्स असला तरी त्यासाठी आपण टक्के प्रयत्नकरायला हवे . ” अशी आणि अशीच असायला हवी . फक्त त्यासाठी गुंतवणूक करत राहण्याची सवय अंगी बाणवून घेतलिच पाहिजे . आणि तीही भक्तिने ; सक्तीने नव्हे . पुन्हा याच नाटकातील वाक्य आधाराला घेत सांगायचेझाले तर ” मंत्र श्रद्धेने म्हणायचे असतात ; सक्तीने नव्हे . ” मंत्र म्हणण्यासाठी आधी त्याची माहीती , मग त्यांचा अभ्यास आणि मग त्यांचा सराव असावा लागतो . तेंव्हाच ते मंत्र पावतात . गुंतवणूकीचेही अगदी तसेच असते. अगदी अविचल श्रद्धेची दोन्ही क्षेत्रे आहेत ही . . . . . .
हे असे जमवण सुरवातीला कदाचित कठीण वाटेलही . पण ते जमवण असलेच तर कठीण आहे ; अशक्य नाही . वेगळ्या शब्दांत सांगायचे तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे म्हणजे . नियमितपणे गुंतवणूक करत राहणे हीआपली स्वतची गरज आहे हे आपण मनमोकळं होत मान्य करावे लागते . एकदा ते मान्य केले की या नाटकात सांगितले आहे तसे ” जरूरत की चीज़ें ढूँढ़ने मे वक्त नही लगता ” याचा ( प्रसन्न ) अनुभव येऊ लागतो . हे असॆवागणे हळूहळू अंगवळण पडले की तो आचारधर्म ही बनू शकतो . बनतोही काळाच्या ओघात . आणि असे होत असतानाच परत एकदा ” कोडमंत्र ” नाटकातले वाक्य आधाराला घेत बोलायचं असेल तर ” गरज ही धर्मापेक्षा मोठीअसते ” हे मनोमन उमजू लागते . ( हे नाटक पहिल्यांदा पाहात असताना हे वाक्य जेंव्हा मी ऐकले तेंव्हा निष्कारणच मला दूरचित्रवाहिन्यांवर दाखवल्या जाणाऱ्या एका चहाच्या ब्रॅंड ची जाहिरात आठवली होती . असो . )
नियमितपणे गुंतवणूक करत राहण्याची सवय स्वतःला लावून घेत असताना एकंदरीतच गुंतवणूक क्षेत्रात , त्यातही विशेषतः शेअर – बाजारात गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा आणि कोणत्या गोष्टींवर नाहीयाची माहिती करून घेत राहण्याची ही सवय करून घेत राहावी लागते . कारण बळीचे बकरे शोधण्यात हे क्षेत्र एकदम तरबेज असते . ” जाळे कुठे टाकायचे हे कोळ्याला नेमके माहीत असते ” हे या नाटकातील वाक्य त्यापरिस्थितिचे एकदम चपखल वर्णन आहे .
हे महत्वाचे अनेक कारणांनी आहे . असते . पहिले म्हणजे हा पैशांचा मामला आहे . त्याबाबत आपली सहनशक्ती सर्वार्थाने मर्यादीत असते .
दूसरे म्हणजे चांगल्या सवयी लागायला नेहमीच जास्त वेळ लागतो . वाईट सवयी मात्र लगेचच लागतात . निदान लागू शकतात .कोणत्याही गोष्टीवर ताबडतोब आणि तीही टोकाची प्रतिक्रिया देण्याची शेअर – बाजाराला उपजतसवय असते . ती तेवढी आपण विनासायास अन्गिकारतो . मग त्यातूनच ” सफरचंद कापायला सूरी ऐवजी कुर्हाड ” वापरली जाऊ शकते .
तिसरे म्हणजे गुंतवणूक क्षेत्रातील संधी या नेहमीच माहितीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतात . अशी माहीती विश्वासार्ह्य असणे अत्यावश्यक असते . या बाजारातच असॆ नव्हे तर इतरही अनेक ठिकाणी चूक आणि बरोबर ,सत्य आणि असत्य अशा सगळ्याच बातम्या फिरत असतात . त्यातही खरी बातमी पसरायला जास्त वेळ लागतो . खोटी बातमी मात्र वाऱ्यांच्या वेगाने फिरते . या नाटकात याबाबत छान वर्णन आहे . त्यानुसार ” सत्य पायातचप्पल घालून घराबाहेर पडे पर्यंत असत्य अनवाणी अख्ख गाव फिरून आलेले असते . ” त्यामुळे त्याची शहानिशा करावी लागते .
याबाबत अजूनही एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते आणि ती म्हणजे या नाटकात जरी ” पुरावे नसतात ही सत्याची लाचारी असते ” असॆ जरी म्हणले असले तरी गुंतवणूक क्षेत्रात मात्र सत्याला पुरावे असतात . खरं म्हणजे , फक्तसत्यालाच पुरावे असतात . ते सहजासहजी उपलब्ध असतीलच , असतातच असॆ नाही . पण ते असतात . प्रसार – माध्यमे आणि जग – दुनिया यांनी उठवलेल्या उलट – सुलट चर्चेच्या गदारोळत ते नीट दिसत नाहीत , ऐकूयेत नाहीत काहीवेळा ! ! ! पण ते असतात . ते पाहाणयाची सवय मात्र लावून घ्यावी लागते . ते फारसे सोपे नसते . आपल्या मनाच्या ठाम समजूती , आपले भाबडे विश्वास , आपणच आपलीच घातलेली , करून घेतलेलीसमजूत अशा अनेक गोष्टी त्याच्या आड येत असतात . सत्य आणि भाव – बंध , सत्य आणि नातेबन्ध याची बहुपदरी वीण ओलांडून पुढे जाणे का सोपे असणार आहे ? पण तसे जाणयाला काही पर्याय नाही . ( ” आयुर्विम्यालापर्याय नाही ” हे वाक्य निश्कारनच मनात डोकावून गेले ना ! ) पण गुंतवणूक क्षेत्रातली ” शर्यत जिंकणे आणि हरणे ” त्यावर अवलंबून असते . त्यासाठी नियमित गुंतवणूक हे आपल्या सगळ्यांचे नित्य – कर्तव्य बनलेच पाहिजे. ” कोड – मंत्र ” नाटकातील संवाद घेत सांगायचे झाले तर गुंतवणूक नियमितपणे करत राहण्याच्या ” कर्तव्यात सबब दिली नाही आणि स्वीकारलीही नाही ” असं झाले पाहिजे . यातूनच सत्य स्वीकारण्यास लागणारी ” ताकद ,हिम्मत आणि किंमत ” मिळते . आणि ती मिळाली की ” सत्याला धरून चालन्याची ताकद असणारा आत्महत्या करत नाही ” म्हणजे काय ते प्रत्यक्षात अंमलात आणता येते .
त्यासाठी आपल्या स्वभावानुसार , ऐपतीप्रमाणे आपलीच आपणच एक आचार – विचार संहीता बनवायची गरज , आवश्यकता असते . कारण ती व्यक्तिसापेक्श असते . एखादे औषध खोकल्यावर चालते हे जरी बरोबर असलेतरी त्या औषधांची त्या संबंधित माणसाला अलेर्जी तर नाही ना याचा विचार ते औषध त्या माणसाला देण्या – घेण्याआधी करावाच लागतो . तसेच ते औषध , त्या माणसाला , त्यावेळी देता येणार असले तरी ते किती प्रमाणातद्यायचे हे परिस्थितींनुसार बदलू शकते . औषधांच्या प्रमाणाबाबत जरी काही ठोकताळे असले तरी ते काही प्रमाणात सापेक्ष असतात . त्याबाबत आपण ठरवलेली संहीता म्हणजे कोडमंत्र . ती काही कोणत्या पुस्तकात लिखितस्वरूपात दिलेली नसते . ती अनुभवातून सिद्ध होत राहते . ” Internally official Disciplinary Measure ” म्हणजे कोडमंत्र असंच तर या नाटकात सांगितले आहे . यंत्र ( हत्यार ) , तंत्र ( जबाबदारी ) आणि मंत्र (चुकिला क्षमा नाही ) यातूनच हा आणि असा ” कोडमंत्र ” घडत जातो . घडत राहतो . त्याचा अतिरेक झाला तर ” कोर्टमार्शल ” होते असॆ नाटक आहे .
कोणत्याही ” कोडमंत्र ” च्या अभावातून आपले आर्थिक आयुष्य प्राणांस मुकते .
कोडमंत्र हे मराठी नाटक मूळ गुजराथी नाटकावरून बेतले आहे हे अशावेळी फार सांकेतिक वाटू लागते .
तसेच हे नाटक आणि गुंतवणूक क्षेत्र यांची सांगड घालताना अगदी पहिला विचार जो माझ्या मनात आला ( इथे मात्र तो मी या लेखाच्या शेवटी मांडत आहे . ) तो मात्र अगदी बालिश होता . या नाटकात ४० NCC cadetsआणि दहा कलाकार मिळून एकूण ५० कलाकार आहेत . आपल्या NIFTY या निर्देशान्कातही ५० कंपन्यांच्य शेअर्सच्या बाजार – भावांचा समावेश असतो ; तर या चाळीस आणि दहा यांच्या वजाबाकी इतके म्हणजे ३० कंपन्यांच्याशेअर्सचा आपल्याच Sensex मधे समावेश असतो . हा गन्मतीचा भाग सोडून देत आपली गुंतवणूक कोडमंत्र या नाटकांसारखीच प्रचंड यशस्वी होवो हीच सदिच्छा . शुभेच्छा .
असा साक्षेपी , सापेक्ष कोडमंत्र उघड्या डोळ्यांनी , सदसदविवेकबुद्धी जाग्रुत ठेवत नियमितपणे गुंतवणूक करण्यातून आपल्याच आयुष्याची कामगिरीही वेगळ्याच पातळीवर जाईल . . . . या नाटकातल्या कलाकारांच्याअभिनयासारखी . याविषयी अगदी मतैक्य . आणि मतैक्यच .
कोडमंत्र . कोडमंत्र गुंतवणूकीचा .
चंद्रशेखर टिळक
C – 402 . राज पार्क
मढवि बंगल्या जवळ .
राजाजी पथ .
डोम्बिवलि ( पूर्व ) ४२१२०१
मोबाईल – ९८२०२९२३७६ .
E-Mail – tilakc@nsdl.co.in
९ डिसेंबर २०१६
महोदया,
मी, संजीव गोपाळ भोकरीकर, पुणे. स्वेच्छानिर्वृत्त बँक अधिकारी, व सध्या बँक लेखा परिक्षक सल्लागार.
१५ ऑगस्टला २०१७ ला रात्री ९.३० चा यशंवतराव चव्हाण नाट्यगृहात झालेला नाट्यप्रयोग पाहिला.मी,
मुद्दामच सोशल नेट वर प्रतिक्रिया न देता, ह्या ईमेल व्दारे कळवित आहे.
मूळ नाटक, परदेशी कथेवर आधारलेले व स्वैर रूपांतर केलेले असले, तरी नाटकाची weak link, सुरवातीसच आहे.
कंमांडो प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांची निवडही, अगदी कठेर पातळीवर घेतली जाते, अगदी शारीरीक, मानसिक क्षमता पडताळून पाहिली जाते. मगच त्याहून कठीण असे कमांडो प्रशिक्षण दिले जाते.
असे असताना, नाटकात, \’तो\’ मुलगा ५ कि मि धावताना वा तत्सम कामगिरीत धाप लागून कोसळतो, ही घटना पटू शकत नाही. तसेच, ह्या घटनेमधून वाढणाऱ्या गोष्टींमुळे ३-४ वरिष्ठ सैन्याधिकारी जीव/ मनस्वास्थ्य गमवतात, हे ही न पटणारे. त्यामुळे नाट्य रूपांतर करताना, मूळ गाभा डळमळीत होणार नाही, ह्या कडे लक्ष द्यायला हवे होते. त्यात अनावश्यक शेवट, वकील मुलीचे नाते कर्नल निंबाळकरांबरोबर असणे, त्यांचे सैरभिर होणे इ. गोष्टीही टाळायला हव्या होत्या.नाटकाचे २४३ प्रयोग झाले आहेत, त्यामळे लोकांनाही ते चाललेले / पटलेले आहे, असे पटवून घेण्याचा धोका आहे.
मुळात लष्करातील orders ह्या पाळण्या करीताच असतात, ही गोष्ट जगमान्यच आहे. व \”कोर्ट मार्शल\” ही कोणत्या परिस्थितीत करता येते, याचेही स्पष्ट निकष आहेत. सर्वोच्च न्यायालयही अतिशय दुर्मिळ परिस्थित, अपवादात्मक वेळी, अशा बाबतीत दखल घेते, एरवी ह्या केसेस दाखलही करून घेतल्या जात नाहीत.
असो.नाटकाच्या निर्मात्यांना एक विनंती. अशा परकीय कथांचे स्वैर रूपांतर करण्याऐवजी, एका सत्य घटनेवर आधारीत अशाच पद्धतीने नाटक आणता येईल.
पुण्यातील एका वीर मातेने,सर्व सामर्थ्यवान केंद्र सरकार, रक्षादल, यांच्याविरूद्ध, दिलेली एकाकी पण निश्चयी लढत. ह्या वीर मातेने स्वत:चा मुलगा , हवाई दलाच्या मिग२१ नित्य कसरती करताना झालेल्या अपघातात गमावला. रक्षा मंत्रालयाने, ह्या घटनेला \”मानवी चूक\” ठरविले व मिग२१ ला दोषमुक्त. ह्या घटनेचा क्रोध येऊन, तसेच भविष्यात इतर मुलांचा बळी \”अशा\” घटनांमधुन पडत राहू नये, म्हणून ह्या वीरमातेने, नेटीने कायदेशीर लढत दिली. समोर होते, strong defence lobby, officials, mighty Govt.
पण मूळ हेतू विशुद्ध असल्याने व चिकाटी न सोडल्याने, ही वीरमाता, त्यांच्या लक्षापर्यंत पोचण्यात यशस्वी झाली. व केंद्र सरकार रक्षा मंत्रालयाला , शेवटी न्यायालयात त्यांची चूक मान्य करावी लागली.
कोडमंत्राच्या निर्मात्यांनी, \”ह्या सत्य घटनेवर आधारित असलेले एकादे परिणामकारक नाटक करता येईल का?\”, या बाबतीत जरूर विचार करावा ही विनंती.
ता क. जगात फक्त आपल्या देशात, आपलेच नागरीक असलेले पत्रकार लेखाव्दारे, तसेच तथाकथित पुरोगामी विचाराचे \”विचारवंत\”, विविध चैनेलवर, मानवाधिकाराचे अवडंबर माजवित, आपल्या लष्कराला कायमच, आरोपीच्या पिंजऱ्यात अडकवित असतात, हे पाहून वैषम्य वाटते. यात स्वैर नाटकांची भर नको.
धन्यवाद.
संजीव गोपाळ भोकरीकर., पुणे.