काही दिवसांपूर्वीच आपल्या देशात पेट्रोल दरवाढीच्या उच्चांकाने जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन विरोधी पक्षाने एक दिवसाचा लाक्षणिक भारत बंद पुकारला होता आणि त्याला जनतेकडून उत्सपुर्त प्रतिसादही मिळाला होता. डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकाच्या गॅस किमतीतही संभाव्य वाढ होणार आहे असे सबंधित सरकारी खात्यातून सांगण्यात येत होते. पण आता पेट्रोलचे भाव थोडे कमी झ्ल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे एवढेच. असो.
गरज ही शोधाची जननी आहे असे म्हंटले जाते आणि ते खरं आहे असे आत्तापर्यंतच्या संशोधाने सिद्ध केले आहे. नेवाडा (लास-व्हेगास) प्रांतातील संशोधक श्री. मनो मिश्रा, सुसांत मोहापात्रा आणि नरसिंहराव कोंडामूडी यांच्या एकत्रित संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की कॉफी बनविल्या नंतर राहिलेल्या गाळापासून स्वस्त, भरपूर आणि प्रदूषणमुक्त बायो-डिझेल बनविणे शक्य झाले आहे. भविष्यात हे बायो-डिझेल मोटारी आणि ट्रक यासाठी वापरणे शक्य होईल. सध्या बायोडिझेल वापरण्यात मुख्य अडचण ही आहे की ते खूप महाग, कमी प्रतीच आणि त्याचे उत्पादन कमी असल्याने मागणी आणि पुरवठ्यात तफावत निमार्ण होते आणि त्याच्या वापरण्यावर बंधने येतात. कॉफी बनविल्या नंतर उरणाऱ्या कोफिच्या गाळात ११ ते २० टक्के तेल असते. जसे पाम, सोयाबीन आणि रेपसिड्स मध्ये असते तसं.
जगातील कॉफी उत्पादक प्रती वर्षाला १६ बिलियन पौंड कॉफीचे उत्पादन घेतात. शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की पारंपारिक पद्धतीने बनविली जाणारी कॉफी, अेक्क्षप्रेस्सो कॉफी आणि इतर प्रकारच्या कॉफी करून राहणाऱ्या कॉफीच्या गाळापासून बायो-डिझेलचे उत्पादन घेता येऊ शकते जे जगात निमार्ण होणाऱ्या बायो-डिझेलच्या उत्पादन ३४० मिलियन ग्यॅलनच्या क्षमतेने भर टाकू शकते. हे पडताळण्यासाठी शास्त्रज्ञानी देशातील मल्टी-न्यॅशनल कॉफीहाउसच्या विविध दूकाने/होटेल्स मधून वापरलेली कॉफी पावडर (राहिलेला गाळ) गोळा केला आणि त्यापासून त्यातील तेल वेगळे केले. त्यानंतर त्यांनी त्या तेलावर अत्यल्प खर्चिक प्रक्रिया करून तेलाचे रुपांतर १०० टक्के बायो-डिझेल मध्ये केले.
यातून तयार होणाऱ्या इंधनाला कॉफीचा वास येतो. या कॉफीगाळाच्या तेलातून मिळालेले बायो-डिझेल चांगले, शुद्ध असते कारण त्यात उच्च प्रतीचे अन्टी-ऑक्सिडंट असते असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बायो-डिझेल बनवून राहिलेल्या गाळातून इथेनॉल ही बनविता येते किंवा त्याचा कम्पोष्ट म्हणून ही वापरता करता येतो.
बायो-डिझेलला चांगली मागणी आहे. असा अंदाज आहे की २०१२च्या मध्यात बायो-डिझेलचे वार्षिक उत्पादन ३ बिलियन ग्यॅलन पेक्षा जास्त होईल. सोयाबीन तेल, पाम तेल, शेंगदाण्याचे तेल, आणि इतर वनस्पती तेले आणि जनावरांची चरबी या पासूनही इंधन बनविता येईल. तसेच हॉटेलमध्ये तळण्यासाठी वापरले गेलेल्या तेलापासूनही इंधन बनविणे शक्य आहे. बायो-डिझेल हे रोजच्या वापरण्यात येणाऱ्या डिझेलमध्येही मिसळता येते. बायो-डिझेल स्वतंत्र इंधन म्हणूनही वापरात आणता येते की जे पर्यायी इंधन म्हणून सुद्धा वापरता येईल.
जगदीश पटवर्धन
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply