![Snow ball](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2023/04/Snow-ball-526x381.jpg)
![](https://www.marathisrushti.com/articles/wp-content/uploads/sites/3/2023/04/Snow-ball-200x300.jpg)
नंतर शांतपणे विचार केला तेव्हा मनात आलं , लहानपण किती छान असतं ना ? ना कसली चिंता ना कसली फिकीर. ना कसली काळजी . तेव्हा आपण काहीच विचार करत नाही कि , ” काय खावं ? काय नाही खावं ? मनात आलं की बिंदास मस्तपैकी बर्फाचा गोळा घ्यायचा आणि खायचा . पण लहानपणी आमची परिस्थिती फार काही चांगली नव्हती. त्यामुळे कधीतरीच पैसे मिळायचे गोळा खायला . तेव्हा गोळा खूप खावासा वाटायचा पण पैसे नसायचे. आता पैसे आहेत पण गोळा खायची इच्छा नाही . असं वाटतं पुन्हा एकदा लहान व्हावं आणि सर्व विसरून जावं. आणि मस्तपैकी ग्लास मध्ये बर्फाचा गोळा घेऊन खावा. मला बर्फाचा गोळा खाताना तो वितळल्यावर त्यातलं जे पाणी असतं ते प्यायला खूप आवडायचं . किंवा मग शोषून ते पाणी सगळं प्यायचं आणि उरलेला बर्फ टाकून द्यायचा . ![?](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/t52/1/16/1f923.png)
असा मी लहानपणी गोळा खायचे आणि बरेच जण असाच खात असतील. हो ना ??
![?](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/t52/1/16/1f923.png)
![?](https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/t4f/1/16/1f601.png)
खरंच जीवनात देखिल आपण बर्फाच्या गोळ्या प्रमाणे चांगलं ते घेऊन वाईट टाकून दिलं तर किती बरं होईल ना ? म्हणजे मग लहान मुलांप्रमाणे आपणही सुखाने आनंदी जीवन जगू शकू …. !! खरंय ना ??
मंदाकिनी रासकर …. !!
Leave a Reply