हास्य अभिनेता नूर मोहम्मद चार्ली यांचा जन्म १ जुलै १९११ रोजी झाला.
पोरबंदर च्या जवळ एका गावात जन्मलेले नूर मोहम्मद यांना लहान पणा पासून चित्रपटाचे आकर्षण होते. त्या मुळे मेमन परिवारात जन्मलेले नूर मोहम्मद मुंबईला येऊन एक दिवस आर्देशीर ईरानी यांच्या इंपीरियल कंपनी पोह्चले. तेथील माणसाने विचारले काय काम करू शकता उत्तर मिळाले काहीपण पण चित्रपटात काम करायचे आहे. त्या मुळे त्या ४० रुपये महिन्यावर नोकरी मिळाली, हो गोष्ट १९२५ सालची आहे, त्या काळी चित्रपटात काम करायला माणसे मिळत नसत. नूर मोहम्मद यांनी नूर नऊ ते दहा मूक चित्रपटात कामे केली. १९३३ मध्ये त्यांनी ‘इंडियन चार्ली’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाला चांगले यश मिळाले तेव्हा नूर मोहम्मद यांनी आपल्या नावा बरोबर चार्ली हे नाव जोडले त्यांनी त्या काळी चार्ली चैप्लिनच्या सारकी हिटलर कट छोटी मिशी ठेवली होती. नूर मोहम्मद चार्ली यांनी इंपीरियल, सागर, रंजीत अशा चित्रपट कंपनीत कामे केली.
जेव्हा दूसरे कलाकार या कंपनीत पगारावर काम करत असत तेव्हा नूर मोहम्मद चार्ली हे आपल्या अटीवर काम करत असत. स्टूडियो सिस्टम जेव्हा बंद होऊ लागली तेव्हा नूर मोहम्मद चार्ली हे ४० च्या दशकात पृथ्वीराज कपूर व दुर्गा खोटे यांच्या सारखे फ्री लान्सीग करू लागले होते एवढी त्यांना मागणी होती. एक काळ असा होता की नूर मोहम्मद चार्ली यांच्या नावावर चित्रपट चालत असे.
जरी ते हास्य अभिनेता होते, त्यांना हीरो एवढी फी मिळत असे. ‘ढंढोरा’नावाच्या चित्रपटाला नूर मोहम्मद चार्ली यांनी लेखन, निर्देशन, अभिनय, गायन केले.यातील ‘पलट तेरा ध्यान किधर है…’ त्याकाळी खूप लोकप्रिय झाले होते.
१९४५ साली आलेल्या ‘गजल’ या चित्रपटात त्यांनी हिरोची भूमिका केली होती. यात त्यांच्या बरोबर चिटणीस होत्या.
फाळणी नंतर १९४८ साली ते पाकिस्तानला गेले. तेथे त्यांनी काही पंजाबी, सिंधी, उर्दू चित्रपट केले पण त्यांना पाकिस्तानात भारता प्रमाणे लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे ते परत भारत आले त्या नंतर त्यांनी १९६३ मध्ये ‘अकेली मत जइयो’ व अजून एक दोन चित्रपट मिळाले, येथे पण त्यांना यश मिळाले नाही कारण तो पर्यत जॉनी वाकर व मेहमूद यांच्या सारखे हास्य कलाकार प्रस्थापीत झाले होते. त्यांना ६ मुले व ६ मुली होत्या.
नूर मोहम्मद चार्ली यांचे ३० जून १९८३ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply