जगदीप म्हणजे सैयद इश्तियाक अहमद जाफरी यांचा जन्म 29 मार्च, 1939 दतिया, मध्य प्रदेश मध्ये झाला . त्यांचे वडील लाहोरला होते. फाळणीनंतर सर्व काही गेले त्यानंतर ते मुंबईला आले . पैसे जवळ नव्हते , त्यांच्या आईने उपजिवेकेसाठी अनाथ आश्रमामध्ये स्वयंपाक करायला सुरवात केली. जगदीप यांनी त्यांनी शिकण्यासाठी शाळेत घातले . जेणेकरून मुलगा पुढे शिकेल. ती कष्ट करत होती. परंतु जगदीप यांना वाटत होते आपली आई मला शिकवण्यासाठी कष्ट करत आहे तर त्याचवेळी अनेक मुले बाहेर काम करून पैसे कमवत असत. अशा अभ्यासाचा उपयोग काय. म्हणून त्यांनी इतर मुलांप्रमाणे काम करण्याचे ठरवले परंतु त्यांच्या आईला ते मान्य नव्हते. ते म्हणाले इतर मुले काम करून आपल्या आईला हातभार लावतात मी पण काम करणार . आईच्या डोळ्यात अश्रू आले ती म्हणाली बघ तुला करायचे ते कर आता. त्यानंतर ते टिन च्या कारखान्यात काम करू लागले , पतंग बनवण्याचे काम करू लागले. त्यांची आई पण त्यांना मदत करत होती. जे जे काम मिळत गेले ते ते काम ते करत गेले.
अचानक एक दिवशी रस्त्यावर एक माणूस भेटला आणि म्हणाला फिल्म मध्ये काम करशील ? जगदीप म्हणाले फिल्ममध्ये काम म्हणजे काय कारण त्यांनी कधीच चित्रपट बघीतला नव्हता. त्यावेळी जगदीप यांचे वय ९ वर्षाचे होते. ते म्हणाले पैसे किती मिळतील , तो माणूस म्हणाला ३ रुपये. त्यावेळी तीन रुपये म्हणजे खूप होते. जगदीप त्यांना म्हणाले चला मी येतो , तेव्हा तो माणसू म्हणाला मी उद्या तुला घ्यायला येतो. दुसऱ्या दिवशी तो माणूस आला. जगदीप आणि त्यांची आई दोघेही गेले कारण आईला चिंता होती मुलगा हरवणार तर नाही ना ? त्या चित्रपटाचे नाव होते ‘अफसाना ‘ , बी. आर. चोप्रा यांचा चित्रपट होता . शुटींगच्या वेळी स्टेजवर काही मुले अभिनय करत होती तर जगदीप यांचे काम ‘ प्रेक्षकांचे ‘ होते . शुटींग सुरु झाले परंतु त्यामधील एक मुलाच्या तोंडी उर्दू वाक्य होते परंतु त्याला ते बोलता येत नव्हते. जगदीप याना उर्दू येत होते कारण ती त्यांची मातृभाषा होती. स्टेजवरील कोणत्याच मुलाला उर्दू बोलता येत नव्हते तेव्हा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या मुलांना विचारले गेले कुणाला उर्दू येते का ? तेव्हा जगदीप यांनी शेजारच्या मुलाला विचारले जर उर्दूमध्ये बोलले तर काय होईल , तेव्हा तो मुलगा म्हणाला ३ रुपयाचे ६ रुपये होतील . तेव्हा जगदीप यांनी हात वर केला आणि म्हणाले मी बोलू का ? त्यावेळी तेथे यश चोप्रा होते असिस्टंट डायरेक्टर , ते म्हणाले बोलशील का , जगदीप यांनी उर्दूमध्ये बोलून दाखवले . त्यांना मेक अप केला गेला , दाढी मिशा लावल्या गेल्या कारण दरबानचे काम होते ते आणि इथूनच त्यांची चित्रपटामधील कारकीर्द सुरु झाली. त्यानंतर चित्रपटासाठी लहान मुले पुरवणारे जे होते त्यांना माहित झाले की हा बालकलाकार चागले काम करतो त्यामुळे त्यांना अनेक चित्रपटामधून कामे मिळू लगली.
एक दिवस त्यांना एक मोठा चित्रपट मिळाला त्याचे नाव होते ‘ धोबी डॉक्टर ‘ . ह्या चित्रपटामध्ये जगदीप यांनी छोट्या किशोरकुमारचे काम केले होते , जगदीप यांचा त्या चित्रपटामधील रोल मोठा होता आणि त्यांच्याबरोबर छोटी सहकलाकार होती आशा पारेख. जगदीप यांच्या वडिलांचे काम कन्हयालाल करत होते. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक फणी मुजुमदार होते. त्या चित्रपटाचे रशेस सुप्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांनी पाहिले आणि फणी मुजुमदार यांना सागितले हा मुलगा मला चित्रपटासाठी हवा आहे त्याला पाठवा . त्या चित्रपटाचे नाव होते ‘ दो बिघा जमीन ‘ . ह्या चित्रपटाचे जगदीप यांना मिळाले ३०० रुपये , त्या काळी ही रक्कम खूप मोठी होती.
जगदीप यांनी गुरु दत , मेहबूब खान अशा दिग्गज माणसांबरोबर काम केले होते. जगदीप यांनी खूप संघर्ष केला अगदी प्रतिकूल , अनुकूल परिस्थितीमध्ये ते स्वतःला सिद्ध करत राहिले. चित्रपटक्षेत्र असे आहे की तुम्हाला सतत स्वतःचे स्थान टिकवण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. त्यांच्या आईचे जेव्हा निधन झाले तेव्हा ते संपूर्णपणे कोसळले होते. परंतु ते सावरले गेले. कारण त्यांची आई ही त्यांच्यासाठी सर्वस्व होती.
जगदीप यांना भेटलो तेव्हा आम्ही तिघे होतो , त्यांच्याबरोबर जावेद जाफरी होता , स्वाक्षरी घेतल्यावर आमचा फोटो जावेद जाफरी ने काढला. परंतु जावेदच्या स्वाक्षरी घेतली नाही कारण , जगदीप समोर असताना माझ्या डोळ्यासमोर ‘ सुरमा भोपाली ‘ होता. त्यांना खरे सुरमा भोपालीचे काम करायचे नव्हते कारण शोले या चित्रपटाचे चित्रीकरण पुरे झाले होते , सलीम जावेद यांना सुरमा भोपाली ही व्यक्तिरेखा त्या चित्रपटासाठी आणायची होती आणि ती जगदीप यांनीच करावी असा त्यांचा आग्रह होता. जगदीप यांनी सलीम जावेद यांचा आग्रहामुळे त्यांनी केले आणि ते काम अजराजरामर झाले. त्यांनी पुढे ‘ सुरमा भोपाली ‘ हा चित्रपट तयार केला त्यामध्ये अनेक कलाकारांनी काम केले होते.
जगदीप यांनी फुटपाथ , दो बीघा जमीन , आरपार , नौकरी , हम पंछी एक डाल के , दो दिलों की दास्तां , दो भाई अनमोल मोती , खिलौना , वफा , भाई हो तो ऐसा , इन्सानियत , बिदाई , राणी और लाल परी , खान दोस्त , एक ही रास्ता , दुल्हन वही जो पिया मन भाए , स्वर्ग नर्क , जानी दुष्मन , कालिया , खून और पाणी , करिश्मा , प्यार की जीत , शहनशाह अशा सुमारे चारशे चित्रपटांमधून भूमिका केल्या. मला आठवतंय मी जेव्हा जगदीपला भेटलो तेव्हा त्याचा मुलगा जावेद जाफरी होता, जवळ आमचा दोघांचा फोटो काढायला कोणी नव्हते आणि त्यावेळी सेल्फी फोन नव्हते..मग हा जगदीप बरोबरच फोटो जावेद जाफरी याने काढला.
जगदीप याचे 8 जुलै 2020 रोजी निधन झाले
सतीश चाफेकर
Leave a Reply