कॉमेडी अभिनेते राजपाल यादव यांचा जन्म १६ मार्च १९७१ रोजी उत्तर प्रदेशमधील शाहजहांपूर येथे झाला.
बॉलिवूडमध्ये जेव्हा जेव्हा कॉमेडी लोकांचे नाव घेतले जाते तेव्हा राजपाल यादव यांचा चेहरा सर्वात आधी समोर येतो. कॉमेडी स्टार म्हणून राजपाल यादवने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. प्रत्येकजण राजपाल यादव यांच्या अभिनयाचे फॅन आहेत. जरी त्याची उंची खूप कमी असली, तरी त्याची प्रतिभा तितकीच मोठी आहे. राजपाल यादव यांनी १९९९ मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. २०१८ मध्ये शादी तेरी बजाएंगे हम बँडमध्ये ते शेवटचे दिसले होते. १९९९ साली आलेल्या ‘मस्त’ या चित्रपटात राजपाल यादव दिसले होते.
राजपाल यादव यांचे स्वप्न होते की आपणास चित्रपटांमध्ये मोठी भूमिका मिळेल आणि तो खूप मोठा स्टार बनेल. पण नशिबाने त्याला साथ दिली नाही आणि चित्रपटांत त्याला मोठ्या नाही परंतु लहान भूमिका भेटू लागल्या होत्या. राजपाल यादव यांनी बर्यालच चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी सर्वाधिक कॉमेडी भूमिका त्यांना मिळालेल्या आहेत.
राजपाल यादव यांची पत्नी पत्नी त्याच्यापेक्षा ९ वर्षांनी लहान आहे. राजपाल यादव यांच्या पत्नीचे नाव राधा आहे. २००२ मध्ये जेव्हा ते ‘द हिरो’ च्या शूटिंगसाठी कॅनडाला गेले. तेव्हा त्याच्या एका मित्राने तिच्याशी राजपाल ला भेटवले. यानंतर दोघेही कॉफी शॉपमध्ये बसले दोघांनीही बराच वेळ एकत्र घालवला आणि एकमेकांचे मन जाणून घेतले.
कॅनडामध्ये, राजपाल यादव राधाला १० दिवस भेटले आणि या दिवसांत ते राधाच्या प्रेमात पडले. तिने १० जून २००३ रोजी राजपाल यादवशी लग्न केले. राजपाल यादव यांना २०१८ मध्ये तीन महिन्यांचा तुरुंगवास सोसावा लागला. चेक बाऊंस प्रकरणी त्यांना तुरूंगात जावे लागले होते चेक बाऊंस प्रकरणी राजपाल यादवला दिल्ली हायकोर्टाने तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
राजपाल यादव यांनी ‘अता पता लापता’ या चित्रपटातून दिग्दर्शकीय पदार्पण केले होते. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये राजपाल यादव स्वत: तसेच दारासिंग, असरानी आणि विक्रम गोखले यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटासाठी राजपालने कर्ज घेतले होते. कर्ज फेडण्यासाठी त्याने दिलेले चेक बाऊन्स झाल्यामुळे त्याची कंपनी आणि पत्नीला सात प्रकरणांत दोषी ठरवले होते.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply