जन्म. ८ एप्रिल उमरखेडी मुंबई येथे.
सुप्रिया यांनी कधी विनोदीशैलीने तर कधी खलनायिका रंगवून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या सुप्रिया पाठारे यांचा जन्म एका साधारण मराठी कुटुंबात झाला. सुप्रिया पाठारे यांच्या कुटुंबात अभिनय करण्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. शालेय दिवसापासून त्या थिएटरमध्ये अतिशय सक्रिय होत्या. आणि शाळेत असतानाच त्यांनी नाटकांत काम करण्यास सुरुवात केली.सुप्रिया पाठारे यांनी आपले गुरू वामन केंद्रेच्या मदतीने आपल्या अभिनय कौशल्याची छबी मांडली.
मराठी नाटक डार्लिंग, डार्लिंगसह करिअरची सुरुवात केली. डार्लिंग, डार्लिंग सुप्रिया यांचे पहिले व्यावसायिक नाटक होते. सुप्रिया पाठारे यांनी आपल्या गुरू वामन केंद्रेच्या मदतीने आपल्या अभिनय कौशल्याची छबी मंडली.
सुप्रिया यांनी अनेक नाटकांचे प्रदर्शन केले आणि अभिनय क्षेत्रातील मान्यवरांमध्ये एक ठसा उमटविला. ‘कुलवधू’ या गाजलेल्या मालिकेतून सुप्रिया पाठारे यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री झाली. या मालिकेत त्या खलनायिकेच्या रुपात दिसल्या होत्या त्यानंतर जागो मोहन प्यारे या मालिकेतही त्यांची मुख्य भूमिका होती.
सुप्रिया पाठारे यांनी कॉमेडी रिअलिटी शो फु बाई फूच्या अभिनयाने कॉमेडियन म्हणून आपली प्रतिभा दाखवली आहे.
सुप्रिया पाठारे आणि अभिनेत्री अर्चना नेवरेकर या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. अर्चना नेवरेकर या बऱ्याच दिवसांपासून इंडस्ट्रीतून दूर आहेत. अर्चना नेवरेकर फाउंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पण कार्यक्रमद्वारे पुरस्कार आयोजित केले जातात. शिवाय निर्मिती क्षेत्रात देखील त्यांनी पाऊल टाकले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply