वंदन वंदन त्या विभूतीला..
मानवतेच्या महामानवाला..।। धृ ।।
जो जाणतो अर्थ मानवतेचा..
मानव! एकच धर्म मानवी..
सर्वाठायी एकची आत्मा..
वंदन वंदन त्या विभूतीला..।।..१
विवेकीनिधर्मी,चारित्र्यागृही..
स्पृश्यास्पृश्यतेचा, विरोधक..
जगती, मानवतेचाच पुजारी..
वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..२
प्रज्ञावंती, नितीज्ञ तो सहिष्णू..
मानवी संस्कृतीचा अध्यापक..
बुद्ध! आगळाच परिवर्तनाचा..
वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..३
भारतीय संविधानाचा उद्गाता..
जगतवंद्य! हा श्रेष्ठमहामानव..
अमर, देशभक्त भारतभूमीचा..
वंदन, वंदन त्या विभूतीला..।।..४
भीमराव! सर्वांचाच कैवारी..
ज्ञान, विज्ञानाचा असे पाईक..
आदर्श पुत्र, हा भारतभूमीचा..
वंदन, वंदन, त्या विभूतीला..।।..५
रचना:-वि.ग.सातपुते.(भावकवी)
Leave a Reply