नवीन लेखन...

टिप्पणी – ४ : सासरीं स्वीकृत सून ?

संदर्भ : एक टी.व्ही. सीरियल

एका प्रसिद्ध टी.व्ही. चॅनलवरील एक सीरियल.( नांवाची ज़रूर आहे कां ?). एका बाजूला कर्मकांडावर विश्वास नसलेलें नास्तिक मुलीकडचें कुटुंब ; आणि दुसर्‍या बाजूला कर्मकांडावर, पत्रिकेवर, संपूर्णपणें श्रद्धा असलेलें मुलाकडचें कुटुंब. हें सीरियलच काय , अशी अन्य अनेक सीरियल्स आहेत, जी अंधश्रद्धा, पुराणमतवादीपणा, जुनाट कालबाह्य परंपरा, अशा अनेक गोष्टी दाखवत असतात, जस्टिफायसुद्धा करत असतात. त्यांच्या सर्वांबद्दल बोलायचें-लिहायचें म्हटलें तर त्याला अंतच नाहीं. पण या विशिष्ट सीरियलबद्दल मात्र एक महत्वाचा, टाळतां न येण्यासारखा, मुद्दा असल्याकारणानें, त्याचा विचार करणें अत्यावश्यक आहे ; कारण त्याचा संबंध, स्त्रीला सासरी काय काय काँप्रोमायझेंस करावे लागतात, याच्याशी आहे.

मुलीच्या लग्नाला कांहीं लोक भातशेतीची उपमा देतात. भात आधी एका शेतात लावलें जातें, अन् नंतर रोप वाढल्यावर, तें रोप तिथून काढून, त्याचं ट्रान्सप्लांटेशन दुसरीकडे करतात. लोक म्हणतात की, त्या रोपानें जोमानें वाढावें म्हणून हें सगळें असतें. पण, त्या रोपाची, किमान सुरुवातीला तरी, काय स्थिती असते, हें कोणाला माहीत आहे काय ? आणि, लाँग-टर्ममध्ये कदाचित ती क्रिया त्या रोपासाठी फायद्याची असेल-नसेल, पण शॉर्ट-टर्ममध्ये ती क्रिया त्या रोपाला ‘ट्राउमा’ (trauma) देते की काय , व किती देते , हें कोणी पाहतें कां ?

मुलगी तिच्या माहेरी प्रेमाच्या वातावरणात वाढते, तिथें तिला तळहातावरल्या फोडासारखे ज़पलें जातें ; आणि लग्न झाल्यावर, तें घर, ती नाती, ती माणसें , या सर्वांना मागे सोडून, ती एक नव्या घरीं नवी माणसें, नवीन नाती, नवीन चालीरीती यांना तोंड द्यायला, पाऊल टाकते. तिला किती काँप्रोमाइझेस करावे लगतात ! तिला योग्यायोग्य काय वाटतें, तिची मतें काय आहेत, तिला कुठची गोष्ट आवडते कुठची नाहीं, कुठची पटते कुठची नाहीं, याचा विचार किती सासरची मंडळी करतात ? ते सुनेला किती मतस्वातंत्र्य देतात ? तिला सासरीं किती वर्तनस्वातंत्र्य मिळतें ? घर आमचें आहे, आमच्या घरात तूं आलेली आहेस, या घराच्या चालीरीती, परंपरा , आम्ही अशाच चालवणार, आणि तुला त्याच स्वीकाराव्या लागतील; काँप्रोमाइझ आम्ही काय म्हणून करायचा , तो तुलाच करावा लागेल . अशी ही ‘दकियानूसी’ , जुनाट विचारसरणी पुष्कळ ठिकाणीं दिसून येते. कोणी २१ वें शतक म्हणा वा कांहींही म्हणा, पण अजूनही कांहींकाहीं घरांमध्येतरी खचित असेंच आहे. अजूनही ! अशा घरांत, स्त्रीस्वातंत्र्याला, (म्हणजे खास करून सुनेच्या), पुरुषच काय, पण सासरच्या स्त्रियाही सुरुंग लावतात ! हाऊ सॅड् !

आतां परत त्या सीरियलकडे वळूं या. आपल्या मुलाचें व सुनेचें नोंदणी पद्धतीनें झालेलें लग्नच मुळी सासरच्या मंडळींना पटत नाहीं. कायद्यानें झालेलें हें लग्न, ‘लग्नच नाहीं’ , असें जर कोणी खरोखरच्या जीवनात म्हणालें तर ? याचा अर्थ असा नाहीं कां, की कायद्यावर विश्वास नाहीं, म्हणजेच संविधानावर विश्वास नाहीं. तुझें झालेलें लग्न आम्हाला मान्य नाहीं, म्हणजेच, तुम्ही (पति-पत्नी) एकत्र रहाता, हा अनाचार आहे. आणि तुला पटत नसलें तरी, आम्ही सांगूं तसेंच तूं कबूल करायला पाहिजे, आम्ही म्हणूं तसेंच तूं वागायला पाहिजें, आम्ही सांगू, त्याच पद्धतीनें तूं (‘पुन्हां’ नव्हे, तर खरोखरचें, प्रथमच ! ) लग्न करायला पाहिजे. नाहींतर तुला आमच्या या घरात रहातां येणार नाहीं, तुला गांवही वाळीत टाकेल . Wow ! हा तर कॉग्निझेबल् गुन्हा ठरूं शकतो. सासरच्या अशा व्यक्तीचें, आणि गांवातील व्यक्तींही तशा वागल्या तर त्यांचेंही, वर्तन डिप्लोरेबल् तर आहेच; पण घरातल्या अशा व्यक्तीच्या वक्तव्याबद्दल, वर्तनाबद्दल, त्या व्यक्तीवर केसही होऊं शकेल अन् कोर्टाकडून तुरुंगवासही मिळूं शकेल; आणि वाळीत टाकण्याचा गुन्हा केल्याबद्दल गांवातील ‘पंचायती’लाही सज़ा भोगायला लागेल ! ‘खप’ पंचायतींच्या वागण्याला कायद्याची संमती नाहींच , आणि सुनेला ‘सासुरवास’ करणार्‍यांना, तिचा शारीरिक अथवा मानसिक छळ करणार्‍यांना कायदा सज़ा देतोच ! ही आजची खरी परिस्थिती आहे, हें आपण विसरतां कामा नये.

अहो, टी.व्ही. सीरियलवाले, चॅनलवाले म्हणणारच की, की आम्ही हें सर्व, सीरियलच्या टी. आर्. पी. साठी दाखवतो आहोत. पण मग, याचा अर्थ असा नव्हे काय की, समाजाला अशा गोष्टी, असें वर्तन अयोग्य वाटत तर नाहींच, पण तें पहायलाही आवडते !! ( तरच टी. आर्. पी. वर असणार ना ! ) तसें जर खरोखरच असेल, तर, ती डेंजरस बाब आहे, चिंता करायला लावणारी गोष्ट आहे.

शेवटीं, कन्क्लूजन काय ? टी.व्हीं. सीरियल काय वाटेल तें दाखवो ; ( आणि पुढेही, काय हवे तें दाखवो) ; पण, तें सीरियल समरसून पाहणार्‍यांनो, सावधान ! तिथें दाखवत आहेत, तसें वागायचा विचारही कोणी मनांत आणूं नये. नाहींतर, ( मुलीचा बाप काय करेल तें करो, पण, ) संविधान व कायदा त्यांना बडगा दाखवल्याशिवाय, धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाहींत.

समाजातल्या व्यक्तींनी शहाणें असावें, शहाणें व्हावें ; नाहींतर, रामदासांच्या ‘तो / (ती) एक पढतमूर्ख’ ’ मध्ये एका लक्षणाची भर घालावी लागेल

– सुभाष स. नाईक Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..