एम्पायर डे म्हणूनही ओळखला जाणारा कॉमनवेल्थ डे भारत आणि ब्रिटनच्या इतर वसाहतींमध्ये ब्रिटीश साम्राज्याच्या स्थापनेचा दिन दरवर्षी मार्च महिन्यात दुसर्याय सोमवारी साजरा केला जातो. तथापि, भारतात कॉमनवेल्थ दिन २४ मे रोजी साजरा केला जातो.
२२ जानेवारी १९०१ रोजी निधन झालेल्या राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर एम्पायर डे साजरा करण्यात आला. पहिला एम्पायर डे २४ मे १९०२ रोजी साजरा करण्यात आला, तो राणीचा वाढदिवस होता. वार्षिक कार्यक्रम म्हणून अधिकृतपणे मान्यता मिळण्यापूर्वीच ब्रिटीश साम्राज्यातील बर्यााच शाळा हा उत्सव साजरा करीत होत्या. पूर्वी ब्रिटिश राजवटीखाली असलेल्या देशांना ‘राष्ट्रकुल’ होय. ब्रिटिशांचे ज्या ज्या देशांत राज्य होते, त्याला ते ‘कॉमनवेल्थ’ असे म्हणत असत.
आपल्या राजवटीखाली असलेल्या देशांना ‘स्वयंशिस्त’ लागावी, या हेतूने ब्रिटिशांनी सगळ्या देशांची एकत्रित स्पर्धा सुरू केली आणि त्यालाच कॉमनवेल्थ गेम्स अथवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असे नाव दिले.१९३० पासून या स्पर्धेला प्रारंभ झाला आणि दर चार वर्षांनी ही स्पर्धा होते.१९४२ आणि १९४६ साली दुसऱ्या महायुद्धामुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली होती.१९३० ते १९५० या कालावधीत राष्ट्रकुलला ‘ब्रिटिश राजवट क्रीडा स्पर्धा’ म्हणूनही ओळखले जात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply