नवीन लेखन...

काॅ. ल. शि.कोमसाहेब ; एक उत्तम, यशस्वी, आदर्श प्रशासक

‘पालघर’ जिल्ह्यातील आदिवासींच‘माणुसपण’ हिरावून घेऊन त्यांना पशूवत जीवन जगण्यास भाग पाडणाऱ्या क्रूर, अन्यायकारी प्रस्थापित व्यवस्थेला उद्धस्त करून आदिवासी समाजाच्या जीवनात नवक्रांती घडवून आणण्याचे महान कार्य कॉ. शामराव परुळेकर व कॉ. गोदावरी परुळेकर या दाम्पत्यांनी केले. या नवक्रांतीच्या प्रगतीचा ‘वारसा’ नेटाने पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी वयाची 82 वर्ष पूर्ण झालेले चिरतरुण व्यक्तिमत्व माजी आमदार, खासदार,आदिवासी प्रगती मंडळ, तलासरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉ. ल. शि. कोम साहेब कधीही न थकता आजही अविरतपणे उत्तमरित्या पार पाडत आहेत.

गेल्या एका दशकापासून मी कॉ. कोम साहेबांना ओळखतो. त्यांना आजपर्यंत मी कधीही थकलेले पाहिले नाही. त्यांनी वयाच्या 21 व्या वर्षातील राजकारणातल्या सक्रीय सहभागापासून ते आजपर्यंत अनेक मोठी वेग-वेगळी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक व पक्ष संघटनात्मक पातळीवरची पदे भूषविली आहेत, तरीही आजपर्यंत मला ते कधीही तणावाखाली दिसले नाहीत. या उलट त्यांचा चेहरा नेहमी हसरा व टवटवीत दिसतो. किंबहुना त्यांच्या चेहऱ्यावर मला नेहमी एक वेगळ्या प्रकारचे तेज व उस्ताह पाहावयास मिळतो. कॉ. ल. शि. कोम साहेबांना मी स्वतः आजपर्यंत कधीही कोणावर रागावताना पाहील नाही, किंवा कोणावर रागावले असतील असे मला ऐकीवात नाही. शाळा,महाविद्यालय,पक्ष कार्यालयातील कर्मचारी असोत की सेवक, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी किंवा पक्षातील सदस्य कार्यकर्ते असोत ते सर्वांशी प्रेमाने,आपुलकीने, जिव्हाळ्याने वागतात व शांतपणे बोलतात.याचा अर्थ त्यांना कधीही कोणाचा रागच येत नाही असा होत नसून रागावर त्यांचे संपूर्ण नियंत्रण असते असा होतो. हा ‘संयम’ व ‘शांतपणा’ कॉ. ल. शि. कोम साहेबांनी त्यांना आलेल्या स्वअनुभावातून आत्मसात केलेला आहे.

आजच्या तरुणाईलाही लाजवेल असे कॉ. कोम साहेबांच्या चेहऱ्यावरील तेज, टवटवीतपणा व व्यवस्थापण शास्त्रातील उच्च विद्याविभूषित व्यक्तीलाही हेवा वाटेल असा ‘संयम’, ‘शांतपणा’ ही सर्व गुणधर्म, एका उत्तम, यशस्वी, आदर्श प्रशासकाची लक्षणे मी कॉ. ल. शि. कोम साहेब यांच्यात पाहिली व अनुभवली आहेत. सत्तेची सर्व केंद्र स्वतः कडे एकवटलेली असताना कॉ. कोम साहेब यांच्या वर्तनात मला गर्व किंवा ‘मी’पणाचा किंचितही अंश कधीही पाहावयास मिळाला नाही. असे “सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व” एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबात डहाणू तालुक्यातील ‘आगवन’ सारख्या लहान खेड्यात जन्मास आल असेल यावर विश्वास बसत नाही. आजच्या विविध शाखेतील मोठ-मोठ्या पदव्या संपादित केलेल्या असतानाही जीवनाची लढाई हरले असावेत असा ‘निस्तेज’, ‘निराश’ चेहरा करून बसणाऱ्या तरुणांसाठी कॉ. ल. शि. कोम साहेबांचे कार्य एखाद्या ‘दिपस्तंभासारखे’ आहे.

कॉ. ल. शि. कोम साहेबांच्या पेहराव्यातील ‘फुल भायाचा सफारी ड्रेस’ व ‘साधी चप्पल’ हा त्यांचा नेहमीचा साधेपणा सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो. किंबहुना “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” ही म्हण कॉ. कोम साहेबांना तंतोतंत लागू पडते. हा राहणीमानातील साधेपणा तळागाळातील दु:खी, कष्टी, शोषित, आदिवासी बांधवाशी जवळीक साधण्याचे उत्तम साधन ठरतो. तसेच कॉ. कोम साहेबांना माणसे ओळखण्याची कला अवगत आहे. यामुळे पक्षपातळीवरील संघटनात्मक बांधणीला बळ मिळते, हे त्यानी जानले असावे. परस्थीती अनुरूप राहणीमानातील साधेपणा, स्वभावातील संयम, शांतपणा व माणसे ओळखण्याची कला इ. यातून उत्तम प्रशासकाच्या नेतृत्वाचे संघटन कौशल्य कळते. याचे प्रमाण म्हणजे गेल्या अनेक दशकांपासुन ‘तलासरी’ तालुका, सी.पी.एम.चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.

कॉ. ल. शि. कोम साहेब यांचे विविध क्षेत्रातील कार्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रातील काम फार मोठे आहे. आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय व शैक्षणिक या विविध क्षेत्रातील परिस्थीच्या काळोखात वैभवशाली समाजाची उषास्वप्ने पाहणाऱ्या कॉ. गोदावरी परुळेकर, कॉ. शामराव परुळेकर व कॉ. ल. शि.कोम साहेब इ. ध्येयवाद्यांनी शोषित आदिवासीच्या उत्कर्षासाठी संघर्ष आणि लढया बरोबरच त्यावर प्रदीर्घ चिंतन केले. त्यांच्या त्या जिव्हाळ्याच्या उत्कट चिंतनातून ‘आदिवासी प्रगती मंडळ’तलासरी या शैक्षणिक संस्थेची स्थापना करण्यात आली.‘शिक्षण’ हा कोणत्याही समाजाच्या परिवर्तनाचा पाया असतो हे कॉ. ल. शि. कोम साहेबानी जानले होते.

‘आदिवासी प्रगती मंडळ’, तलासरी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉ. ल. शि. कोम साहेब यांनी तलासरी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाला ‘के. जी.’ ते ‘पी. जी.’ पर्यंतचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे महान कार्य केले आहे. एका वसतीगृहाच्या स्थापने पासुन सुरु झालेल्या संस्थेची आज अनेक प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालये, वरिष्ठ महाविद्यालय व मुला-मुलींची अनेक वसतीगृह आजच्या आदिवासी समाजातील तरुण- तरुणींना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्याचे पवित्र कार्य निरंतरपणे करीत आहेत. तलासरी व डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या प्रगतीचा, शैक्षणिक इतिहास जेव्हा लिहला जाईल तेव्हा कॉ. ल. शि. कोम साहेबांच्या शैक्षणिक कार्याचा उल्लेख केल्या शिवाय तो पूर्ण होणार नाही.

— प्रा.शिवाजी आर.कांबळे
[कवि,लेखक,संमिक्षक,संपादक,गीतकार इ.] (आ.प्र.मं.सं.कनिष्ठ महाविद्यालय तलासरी)
MY Blog : kshivraj83.blogspot.in

Avatar
About प्रा. शिवाजी आर. कांबळे 4 Articles
(कवि, लेखक, समिक्षक, संपादक, गीतकार इ.)
Contact: Website

1 Comment on काॅ. ल. शि.कोमसाहेब ; एक उत्तम, यशस्वी, आदर्श प्रशासक

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..