दै सकाळ वाचकांच्या पत्रव्यवहारात १९९२ साली ऑगस्ट महिन्यात आहारातील कँलरीज, प्रोटीन्स यावर बरीच चर्चा झाली. ३/९/१९९२ रोजी या मालिकेतील शेवटचे जे पत्र प्रसिद्ध झाले ते पुढे देत आहे.
सरिता भावे यांच्या लेखावर आहार विषयीच्या मुलाखतीवर (सकाळ – ९ ऑगस्ट) मान्यवर लोकविज्ञान संघटना, आरोग्य समितीतील मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळींची मत प्रणाली वाचण्यात आली. (सकाळ – १४ ऑगस्ट). व्यावहारिक पण वास्तवतेला अनुसरून मी एक मुद्दा सूचित करत आहे.
मुळशी तालुक्यातील ग्रामीण भागाशी माझा नित्य संबंध येत असतो. तेथील लोकजीवनाचे मी चिंतन करत असतो. आयुष्यभर एकाच आहार – कडवेवालाचे वरण, नाचणीची भाकरी आणि भात. तोंडी लावण्यास मीठ मिरचीची पूड (सॉस, जेली, पुडिंग ही गोंडस नावे त्यांना माहित नाहीत) पावसाळ्यात आपोआप उगवणाऱ्या वनस्पती म्हणजे रान अळू कार्तावली आणि असेच काहीतरी. बहुसंख्य जनता दारिद्र्य रेषेखालील आहे, त्यामुळे अन्नाची आहारीप्रत आवाक्याबाहेर. दुध दही यांचीही वानवाच. असा हा ग्रामीण भाग. पुण्यापासून फक्त ३०-३५ किमी अंतरावरील. अश्या या साध्या आहारावर पोसलेले त्यांचे देह इतके कटक असतात की शहरी चौरस आहारावर पोसलेल्यापेक्षा श्रमिक धारणा कितीतरी पटीने अधिक असते. भरपूर कष्ट करायचे आणि अती कष्टाने भूक लागली की मग अन्नाशी समरस होऊन चवीने त्यांचे सेवन करायचे. सेवन करतेवेळी मन शरिर आणि अन्न यांचे असे काही एकीकरण होते त्यात सर्व प्रोटीन्स, व्हीटँमिन आणि चौरस आहाराचे गुणधर्म एकवटले जातात. अन्न खातेवेळी अन्नाशी आपले मनोमिलन व्हावयास हवे. श्रमलेल्या शरीराने निष्ठेने ते ग्रहण केले पाहिजे. आणि असे जे अन्न त्यात आपले शरीर आपोआप सर्व रस उत्पन्न करून त्याचा विनियोग योग्य त्या कँलरीज साठी सिद्ध होते. चौरस आहाराचे महत्व कमी असे माझे म्हणणे नाही. पण आहार ग्रहण करतेवेळी मनाची प्रसन्नता, एकरूपता आणि श्रांत शरीर याची गरज तेवढीच महत्वाची आहे. या लोकजीवानांचे आहार-विहारांचे आपण चिंतन करून व्यवहारात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
वसंत मगर
पुणे
ह्या पत्रावर विचार केल्यावर याप्रमाणे मी गेली २५ वर्षे जेवताना बरेचवेळा मन अन्नाबरोबर एक करून (म्हणजे जेवताना इतर विचार न करणे, फक्त घास चावाण्यावर लक्ष केंद्रित करणे) जेवतो मला याचा खूप फायदा झाला व होत आहे.
वैद्य सुविनयजी दामले यांच्या सांगण्या प्रमाणे प्रादेशिक धान्य आणि भाज्या व महत्वाची म्हणजे मनाची एकाग्रता आहारात असणे आवश्यक आहे असे माझे ठाम मत झाले.
आपण प्रत्यक्षात काय करतो????
आपणही प्रयोग करून पहा. परंतु हा प्रयोग एकदाचा करून रिझल्ट मिळेलच असे नाही. थोडे सातत्य असणे आवश्यक आहे.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
आरोग्यदुत या WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने..
Leave a Reply