पहिली ते आठवीपर्यंत ढकलगाडी आता थांबण्याची सुचिन्हे दिसत आहेत. परीक्षा पुन्हा सुरू करण्याच्या सातत्याने पुढे येणाऱ्या मागणी मुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. या समितीत तावडे यांच्यासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तमिळनाडू या राज्यातील प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल बुधवारी मंत्रालयाला सादर केला. सध्याच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुरू करण्यात यावी. या परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला एक महिना उजळणीसाठी देऊन त्याची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. पुन:परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात प्रवेश द्यावा. मात्र पुन:परीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच्याच इयत्तेत ठेवण्यात यावे, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या बाबतीत पुढाकार घेतला आहे . या बाबतीत शिक्षण मंत्री विनोद तावडे योग्य दिशेनी जात आहेत . गुणवत्तेला पर्याय असूच शकत नाही हे लक्षात आले हे बरेच झाले. अगदी लहान पणा पासून मुलांना तसेच शिक्षकांना आणि पालकांना परीक्षे बाबत बेदरकार बनवणा-या या धोरणाला तातडीने बदलले पाहिजे अशी मागणी अनेक शिक्षक करत होते .
तावडे योग्य दिशेनी जात आहेत. अभिनंदन !!!!!!
— चिंतामणी कारखानीस
Leave a Reply