नवीन लेखन...

कॉर्डलेस फोन

एका काळी कार्यालयातील अंतर्गत संभाषणासाठी कॉर्डलेस फोनचा मोठा बोलबाला होता. काही कंपन्यांमध्ये अजूनही अंतर्गत संदेशवहनासाठी अशा प्रकारचे कॉर्डलेस फोन वापरले जातात. त्यात टेलिफोन व रेडिओ ट्रान्समीटर किंवा रिसिव्हर तंत्रज्ञानाचे मिश्रण असते..

कॉर्डलेस फोन हा वापरण्यास अगदी सोपा असतो. रिसिव्हरच आपल्याजवळ असल्याने चटकन योग्य तो संदेश दोन व्यक्तींमध्ये पोहोचवता येतो. यात वायरींचे जंजाळ नसते हे त्याचे वैशिष्ट्य.

कॉर्डलेस फोनमध्ये दोन प्रमुख भाग असतात ते म्हणजे बेस युनिट व हँडसेट. बेस युनिट हे एकाच ठिकाणी स्थिर असते तर हँडसेट हा कुठेही नेता येतो. कमी क्षमतेच्या रेडियोद्वारे हँडसेट व बेस युनिट यांच्यात परस्पर संपर्क प्रस्थापित केला जातो. यात बेस युनिट हे आपल्या नेहमीच्या लँडलाईन फोनला जोडलेले असते. बेसकडे कॉल म्हणजे विद्युत संदेश आल्यानंतर त्याचे रूपांतर एफएम रेडिओ सिग्नलमध्ये करून नंतर तो प्रक्षेपित केला जातो व नंतर हा सिग्नल हँडसेटवरील अँटेना पकडतो, त्याचे रूपांतर पुन्हा विद्युत संदेशात करतो व तो स्पीकरकडे पाठवतो, तेथे त्याचे ध्वनीत रूपांतर होऊन आपल्याला आवाज ऐकू येतो.

हँडसेट बघितला तर त्यावर फोन करण्यासाठी डायल असते किंवा पुश बटन्स असतात. मिटता येणारा ॲटेना असतो. त्याच्याद्वारेच बेस युनिटकडून त्याला संदेश मिळत असतात. मोबाइल फोनच्या आधी अत्यंत कमी पैशात वॉक अँड टॉक सुविधा दिली ती कॉर्डलेस फोनने. फक्त हा फोन कमी अंतरापर्यंतच चालतो.

रेडिओ लहरींच्या आधारे यातील संदेशवहन चाललेले असते. आता पीएचएस व डीईसीटी या कॉर्डलेस फोनमध्ये सेलफोन व कॉर्डलेस यांच्यात सीमारेषा राहिलेल्या नाहीत, कारण त्यात डेटा ट्रान्सफर, इंटरनॅशनल रोमिंग अशा अनेक सुविधा दिलेल्या आहेत. मोबाइल फोन ऑपरेटरची सेवा घेऊन हे कॉर्डलेस फोन चालवता येतात. कॉर्डलेस फोनचा हँडसेट हा बॅटरीवर चालतो.

जॅझ संगीतकार टेरी पॉल यांनी १९६५ मध्ये पहिल्यांदा कॉर्डलेस फोन तयार केला होता, पण तरीही या तंत्रज्ञानाचे पितृत्व ओहियोतील संशोधक जॉर्ज स्वीगर्ट यांच्याकडे जाते. त्यांना जून १९६९ मध्ये त्याचे पेटंट मिळाले.

काही कॉर्डलेस फोनमध्ये आता ब्लू टूथ तंत्रज्ञानही वापरण्यात आले आहे. कॉर्डलेस फोन तुलनेने महाग असतात, त्यांच्यात अंतराची मर्यादा असते, आवाज स्पष्ट येत नाही व तुमचा फोन कुणीही टॅप करू शकतो. कारण रेडिओ संदेश पकडणे सोपे असते. यावर उपाय म्हणून डिजिटल कॉर्डलेस फोनही उपलब्ध आहेत त्यात सुरक्षितता आहे तसेच आवाजाची स्पष्टता आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..