कोथिंबीर ही एक अतिशय सौंदर्यपूर्वक सुगंधी आणि अगदी नाजूक अशी वनस्पती आहे. १४व्या शतकात हा प्रकार ब्रिटिशांनी भातात आणला. आता मात्र असे सुगंधी सुवासिक बारीकसे रोपटे बघून संबंध जगात सर्वत्र पसरला आहे. कोथिंबीरीची फळे अगदी सोनेरी रंगाची असतात व याला आपण धणे असे संबोधतो. भारतातील सर्व प्रांतात धणे ही वनस्पती गरम मसाला म्हणूनही वापरली जाते. लहान मुले ते मोठी माणसे विशेषतः सर्दीकरीता जो काढा हा प्रकार करतो त्यात धणेबरोबर काळी मनुका, सुंठ, धणे, गवती चहा वगैरे गोष्टी उकळून ते प्यावयास देतात.
कोथिंबीरचा उपयोग फक्त स्वयंपाक घरातील सजावट करण्यात उपयोगी असतो. त्याचा सौम्य सुगंध व शोभा या पलीकडे थोडेफार वापरतात.
१०० ग्रॅम कोथिंबीरमध्ये खालील प्रमाणात गुणधर्म असतात.
परदेशात कोथिंबीरचा वापर एक परफ्युममध्येही करतात. तसेच धणे याचा उपयोग एक गरम मसाला म्हणून वापरतात. मात्र कोथिंबीर खाण्याने मूत्रदोष नाहीसा होतो तसेच कोलेस्ट्रेरॉलवर त्याचा उपयोग असावा. कोथिंबीर ताजी असल्यास त्याचा उपयोग ताकातही करतात. कोथिंबीरच्या वड्या तसेच विदर्भात पुडाच्या वड्या अतिशय मोठ्या प्रमाणावर करतात व यात कोथिंबीरचा भरणा अवश्य करावा.
– मदन देशपांडे
Leave a Reply