नवीन लेखन...

कोरोना – एक प्रवास…

नमस्कार मंडळी, मी आज आपल्या समोर कोरोना मुळे अनुभवलेल्या काही गोष्टी मांडणार आहे.

कोरोना रोगामुळे आलेल्या आरोग्य आणीबाणीमुळे जगातील वेगवेगळ्या समाजांमध्ये रोग आणि भीतीही शिरकाव करते आहे. ही भीती अनेकदा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही भयंकर असते आणि हीच भीती माणसाच्या हातून चुका घडवून आणते आणि सोबतच कोण आपले आणि कोण परके हे पण शिकवून देते.

कोरोनाच्या या काळात आजाराची भीती माणुसकी चा पराभव करताना दिसतेय. आपण आपल्याच माणसांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसत नाही, यामागेही कोरोनाची भीती हेच कारण आहे. मी स्वतः असे अनुभवले आहे जेव्हा माझ्या आई ला कोरोना झाला होता तेव्हा बरेच लोकांनी न घाबरता माझा समोर मदतीचा हात उभा केला होता आणि काही मंडळींनी कोरोनाच्या भितीपाई दूर राहण्यात स्वतःचे भले समजले. काही स्नेहिंकडून आधार भेटला तर काही मंडळींकडून परकेपणाची जाणीव.

आज आपण इतरांसाठी हजर आहोत तर ते केवळ SMS द्वारे, संवेदना व्यक्त करणारे इमोजीद्वारे आणि सोशल मीडियावरून देण्यात येणाऱ्या अमाप उपायांच्या स्वरूपात. प्रत्यक्ष शारीरिक मदत करून आधार देणं हे लोक विसरले आहेत ते फक्त या कोरोना महामारीमुळेच. स्मार्टफोन्स, व्हीडिओ किंवा ऑडियो संदेश हीच आजच्या संवादाची, संवेदना ची भाषा झाली आहे.

या भीतीने मानवाला अदृश्य केलं आहे. कोरोना मुळे सख्खे नातलग आजारात एकमेकांना मदत करू की नाही, याच भीतीने आपल्याला त्या जागी नेऊन सोडलं आहे जिथे आपल्याला परस्परांची भीती वाटू लागली आहे.

आपल्याच बांधवांमुळे आपल्याला आजार होईल का ? अशी परिस्थीती कोरोनानी समाजात पसरवली आहे . यावरून स्पष्ट होतं की भीती माणसाला किती अमानुष बनवते. कोरोना आपल्याला स्क्रिझोफेनियासारख्या एका भयावह संसारात ढकलतोय, ज्यात आपण कुणालाही बघितलं की भीती वाटते.

प्रसिद्ध विचारक जॉर्जियो अगम्बेन यांनी कोरोनाविषयी बोलताना सांगितले आहे की – “असे वाटतं जणूकाही आपण एक असा समाज आहोत ज्याच्याकडे स्वतःला जिवंत ठेवण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंच मूल्य नाही. एकमेकांना मदत करणे सोडून त्यांना नकळतपणे दूर केले आहे. वाटतं जणू आपण bare life (केवळ जगणं) यातच विश्वास ठेवू लागलो आहोत, इतर कशातच नाही.”

आपण या भीतीमुळे आपल्या सामान्य जीवनातील सर्व मूल्यं, उदा. मैत्री, सामाजिक संबंध, काम, स्नेह, धार्मिक आणि जवळचे व्यक्ती सर्व काही विसरतो आहोत. बऱ्याच लोकांना कोरोना संकटात जी खरी गरज जवळच्या व्यक्तीनं कडून भेटायला हवी होती ती भेटत न्हवती म्हणून बऱ्याच लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. कोण परके आणि कोण आपले हे या महामारीने समाजाला दाखऊन दिले.

भीतीच्या या छायेत आपण इतर सर्वांनाच कोरोना पसरवणारं संभाव्य शरीर म्हणून बघू लागलोय. आपल्याला केवळ एकच चिंता उरली आहे. ती म्हणजे – मी तर आजारी पडणार नाही ना…! समोरच्याला साधी शिंका जरी आली तरी त्याला कोरोना तर नसेल न ….! त्याचा जवळ जाऊ की नाही ? मदत करू की नाही ? असे अनेक प्रश्न आणि भिती निर्माण झाली आहे लोकांमध्ये.

भीती आणि काळजी यात अंतर आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत आपण सर्वांनी काळजी घेणे, सजग आणि सावधगिरीने राहायला हवं. मात्र, भीतीचं रुपांतर त्या उंदरात व्हायला नको जो तुमच्या शरीरात जाऊन तुमच्यातली माणुसकी कुरतडून टाकेल.

कोरोना मुळे इतका स्वार्थ आणि जगण्याचा मोह निर्माण झाला की त्यामुळे जगण्यासाठी इतरांशी अमानुषपणे वागायलाही लोक मागे-पुढे बघत नाही, असं चित्र आहे. उपभोगाच्या वाढत्या इच्छेने आपल्या आत आपल्या देहाप्रति कधी नव्हे इतकी ओढ, लालसा निर्माण झाली आहे.

आणि हीच लालसा कुठे तरी माणसांनी मिटवायला हवी. शेवटी मला इतकेच सांगायचे आहे की कोरोनाच्या या प्रवासात मला समाजातील लोकांचे चांगलेच अनुभव आलेत. म्हणून आपण आपल्या माणसा बद्दल प्रेम, आपुलकी आणि कोणाच्याही परिस्थितीमध्ये मदत करण्याची प्रबळ इच्छा ह्या अशा सगळ्या गोष्टी अमलात आणणे आपल्याला आवश्यक आहे असे मला वाटते.

निनाद चंद्रकांत देशपांडे
९२२६१३००१
अमरावती

Avatar
About निनाद चंद्रकांत देशपांडे 9 Articles
माझ्या बद्दल माझे लेख च आपल्याला सांगतील....
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..