अरे नखशिखांत भ्रष्टाचारात बरबटलेल्या निर्लज्ज राजकारण्यांनो,
नका उगाच आमच्यासाठी इतकं भांडण्याचं नाटक करू.
आम्ही मंदिराच्या लायनीत उभे होतो तेंव्हा तुम्ही आम्हाला उन्हां-तान्हांत थांबवून देवदर्शनाला जात होतात….
आम्ही जेव्हा मतदानाला रांगेत होतो तेंव्हाही तुम्ही बोटांचा V करून आम्हाला ओलांडून जात होतात…
कधी रेशनच्या लायनीत तुमचे हुजरे तुमचा जयजयकार करत आम्हाला डावलून पुढे जायचे नि आम्ही तसेच तासन् तास तिष्ठत उभे राहायचो लायनीत..
कधी रेल्वे तिकिटासाठी….
कधी बोर्डिंग पास साठी….
कधी बादली भर पाण्यासाठी…
कधी पोरांच्या दाखल्यासाठी…
कधी शेतमालाच्या पैश्यांसाठी…
कधी हक्काच्या वेठबिगारीसाठी..
कधी पेन्शन साठी तर कधी गॅस सिलेंडर साठी…
आम्ही नेहमीच लायनीत होतो बेशरम भ्रष्टाचार्यांनो…
नाईलाजाने उभे होतो…
हतबल होऊन उभे होतो…
दुःखी होऊन उभे होतो…
कष्टात उभे होतो….
पण इतक्या वर्षांत कधीच आम्ही तुम्हाला दिसलोही नाही आणि कधी आमच्या त्रासाचा तुम्हाला कळवळा ही आला नाही.
आज मात्र आम्ही आनंदाने लायनीत उभे आहोत…
आमच्याबरोबर आमचा देशही बदलायला उभा आहे…
तर आता तुम्हाला इतका त्रास का होतोय??
नका आमची काळजी करू इतकी…स्वतःच्या कमरेखालचं एक-एक करत सुटत चाललयं, ते आधी सांभाळा
आम्ही सामान्य कष्टकरी माणसं आहोत. आम्हाला चलनातील बदलाचा कुठलाही त्रास होत नसून, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी आमची काळजी करू नये आणि समजा झालीच काही अडचण तर ती आमच्या पातळीवर सोडवण्यास आम्ही भारतीय बंधु-भगिनी समर्थ आहोत
जय हिंद
Leave a Reply