नवीन लेखन...

अमेरिकेतील कंट्री म्युझिक – भाग ३

Country Music in America - Part 3

१९५० च्या सुमारास, टेनेसी राज्यातले नॅशव्हील हे गाव म्हणजे कंट्री म्युझिकची मांदियाळी म्हणून नावारूपाला येत होतं. नॅशव्हील मधल्या रेकॉर्डिंग

कंपन्या, नवीन कलाकारांना संधी देऊन त्यांना प्रकाशात आणत होत्या. देशभरातून धडपडणारे उदयोन्मुख कलाकार, नॅशव्हीलची वाट चोखाळत होते.

याच नॅशव्हीलने, या दशकात कंट्री म्युझिकचे दोन महान कलाकार पैदा केले – एल्वीस प्रिस्ले आणि जॉनी कॅश! एल्वीसने आपल्या संगीतमय

कारकिर्दीची सुरुवात कंट्री म्युझिकने केली आणि कालांतराने नव्याने उदयाला येणार्‍या रॉक अ‍ॅंड रोल या संगीत प्रकारात स्वत:चे अजोड स्थान निर्माण

केले.

१९६० च्या दशकात, ब्रिटीश ग्रूप “बीटल्स”च्या लाटेने सार्‍या जगाबरोबर अमेरिकेला देखील भिजवून टाकलं. त्याचा एक परिणाम म्हणजे, काही

संगीतप्रेमी, या लाटेत खास अमेरिकन रॉक ऍंड रोल संगीत विसरलं जाऊ नये म्हणून, हट्टाने रॉक ऍंड रोलच्या वाटेला लागले. कंट्री म्युझिक आणि

रॉक ऍंड रोल हे तसे
सर्वस्वी भिन्न संगीत प्रकार. परंतु त्यांच्या मिलनातून जे मिश्रसंगीत जन्मलं ते म्हणजे कंट्री रॉक.

१९८० च्या दशकापासून हळूहळू कंट्री म्युझिक हे संगीताच्या मुख्य प्रवाहाचा एक भाग म्हणून मानलं जाऊ लागलं. कंट्री म्युझिकची वाट चोखाळणार्‍या

कलाकारांची गाणी संगीताच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होऊन, लोकप्रियतेमधे पहिल्या शंभर नंबरात स्थान मिळवू लागली. कंट्री म्युझिकच्या वाढत्या

लोकप्रियतेचं हे प्रतिक होतं.

१९९० च्या दशकात उदयाला आलेल्या गार्थ ब्रुक्स या कंट्री म्युझिकच्या कलाकाराने, गाण्यांच्या रेकॉर्डसच्या विक्रीचे आणि गाण्यांच्या कार्यक्रमांना

होणार्‍या गर्दीचे सारे विक्रम मोडीत काढले. गेली दीड दशक तो कंट्री म्युझिकचा निर्विवाद बादशहा आहे. आजपर्यंत १२.८ कोटी (128 million)

आल्बम विकून त्याने अमेरिकन संगीतात नवनवे विक्रम केले आहेत. त्याच्याच बरोबरीने ऍलन जॅक्सन, जॉर्ज स्ट्रेट, रीबा मॅकेंटायर, डॉली पॅट्रन वगैरे

कलाकारांच्या कामगिरीमुळे आज रेडिओवरच्या संगीतात कंट्री म्युझिकने अव्वल नंबरचा मान मिळवला आहे. दर आठवड्याला ते साधारणपणे ८ कोटी

(77.3 million) किंवा अमेरिकेतील सुमारे ४०% लोकांपर्यंत पोहोचतं.

— डॉ. संजीव चौबळ

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..