नॉर्मन ‘ बुडी ‘ ओल्डफिल्ड यांचा जन्म 5 मे 1911 रोजी इंग्लडमशील चेसशायर येथे झाला. खरे तर त्यांचे नाव अनेकांना काय पुष्कळांना माहीतही नसेल त्यांनी फक्त एक कसोटी सामना खेळला तो 19 ऑगस्ट 1939 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध. त्यानंतर दुसरे महायुद्ध सुरु झाले. परंतु त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळण्यास 1935 साली सुरु केले. ते फर्स्ट क्लास क्रिकेट 1955 पर्यंत खेळत होते. कुठल्याही कसोटी क्रिकेटमध्ये पाच ते सात वर्षानंतर कम बँक करणे हे जवळजवळ अशक्यच असते कारण त्याचा फॉर्म, कसोटी क्रिकेट खेळण्याचा फॉर्म महत्वाचा असतो. दुसरी समाधी मिळाली नाही की सगळॆच संपते. ह्या पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात अनेक कसोटी क्रिकेटपटूंची करिअर संपली आणि उध्वस्थ झाली. खरे तर 1946 मध्ये त्यांनी लँकेशायर सोडायला नको होती असे अनेकांचे मत होते कारण त्यानंतर ते नॉर्थअन्स क्लबमधून खेळू लागले. त्याआधी ते जुलै 1937मध्ये त्यांनी आणि इडी पायनटर पाच तासामध्ये 322 धावा केल्या तर बुडी ओल्डफिल्ड यांनी 92 धावा केल्या त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 271 धावांची भागीदारी 115 मिनिटामध्ये केली. एक वर्षांनंतर त्या दोघांनी परत तिसऱ्या विकेटसाठी 306 धावांची भागीदारी केली त्यामध्ये बुडी ओल्डफिल्ड यांनी 135 तर इडी पायनटर यांनी 291 धावा काढल्या , हा रेकॉर्ड 1990 पर्यंत अबाधित होता त्यानंतर आथरटन आणि फेअरब्रदर यांनी 364 धावांची भागीदारी ओव्हलवर केली.
त्यानंतर नॉर्थअन्स क्लब कडून खेळताना त्यांनी स्कॉटलंडविरुद्ध खेळताना त्यांनी 361धावांची भागीदारी विव्ह ब्रॉडरीक बरोबर पहिल्या विकेटसाठी केली. ह्या क्लबकडून खेळताना त्यांनी 38 शतके केली. 1946 च्या डिस्प्युट नंतर त्यांना ओल्ड ट्रॅफर्ड वर खेळण्यास नकार दिला. जेव्हा नॉर्थअन्स तेथे खेळले तेव्हा त्यांनी 4 तासात शतक केले. त्यानंतर त्यांनी दोन शतके केली. ते 1968 च्या पाच सीझनमध्ये कोच म्हणून देखील होते.
बुडी ओल्डफिल्ड यांनी 1938-39 मध्ये न्यूझीलंडला दोन लहान टूर केल्या तर 1949-50 मध्ये भारताच्या टूरवर डॆहील ते आले होते. त्यांनी भारतात आल्यावर तीन अनऑफिशिअल कसोटी सामन्यात भारतीय संघाविरुद्ध उत्तमपणे खेळले.
त्यांनी 11 सीझनमध्ये प्रत्येकी 1000 धावा केल्या तर 1949 मध्ये एकदा 2000 धावा केल्या.
त्यांनी एक कसोटी सामन्यात दोन इनिंगमध्ये 80 आणि 19 धावा केल्या त्या 49.50 या सरासरीने. त्यांनी 332 फर्स्ट क्लास कसोटी सामन्यात 17,811 धावा 37.89 धावा केल्या. त्यांनी फर्स्ट क्लास सामन्यात 38 शतके आणि 100 अर्धशतके केली. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 168 धावा केल्या तसेच 2 विकेट्स घेतल्या आणि 96 झेल पकडले.
नॉर्थअन्स क्लब कडून ते 1948 ते 1954 खेळले. त्यांनी लॅकेशायर कडून 151 फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळले तसेच त्यांनी 35.72 सरासरीने 7,002 धावा केल्या त्यामध्ये 12 शतके होते. परंतु नॉर्थअम्पशायर कडून खेळताना जास्त यशस्वी झाले. त्यांनी 159 सामन्यात 38.51 च्या सरासरीने 9,321 धावा केल्या. 1954 नंतर ते फर्स्ट क्लास क्रिकेटमधून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते अंपायर झाले. ते 1954 ते 1965 पर्यंत त्यांनी अंपायर म्हणून काम केले. त्यांच्प्रमाणे त्यांनी 1960 आणि 1962 मध्ये दोन कसोटी सामन्यात कसोटी सामन्याचे अंपायर म्हणून काम पाहिले. 1962 मध्ये ते जेव्हा लँकेशार चे कोच झाले तेव्हा ते परत ओल्ड ट्रॅफर्डला आले.
अशा बुडी ओल्डफिल्ड या क्रिकेटपटूंचे 19 एप्रिल 1996 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी इंग्लंडमधील लॅंकेशायर येथे निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply