कॉली स्मिथ म्हणजे ओ ‘ नील ” कॉली ” स्मिथ याचा जन्म ५ मे १९३३ रोजी किंग्स्टन , जमेका येथे झाला. तो वेस्ट इंडिज कडून क्रिकेट खेळला . ताईच तो जमेका कडूनही खेळला . तो हार्ड हिटर तर होताच परंतु स्पिन गोलंदाजी करत असे. त्याची कसोटी क्रिकेटची कारकीर्द जेमतेम चार वर्षाची होती . अर्थात तो इतरांना माहित असण्याची शक्यता असेलही किंवा नसेलही कारण तो अचानक क्रिकेटमधून एका घटनेमुळे नाहीसा झाला.
कॉली स्मिथ याने त्याच्या तिसऱ्या फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यामध्ये जमेका कडून खेळताना १९५४-५५ साली टूरवर आलेल्या ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध त्याने १६९ धावा केल्या. त्याने त्याचा पहिला कसोटी सामना खेळला तो २६ मार्च १९५५ रोजी ऑस्ट्रलिया विरुद्ध म्हणजे त्याच वर्षी खेळला . पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये त्याने १०४ धावा केल्या परंतु त्याला पुढल्या कसोटी सामन्यामध्ये वगळले गेले त्यानंतर तो चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यामध्ये खेळला . त्या सिरीजमध्ये त्याने २५.७५ च्या सरासरीने २०६ धावा केल्या आणि ५ विकेट्स घेतल्या. त्यानंतर १९५५-५६ साली तो न्यूझीलंडच्या टूरवर खेळण्यास गेला जेव्हा त्याने पहिल्या कसोटी सामन्यामध्ये ६४ धावा केल्या आणि एव्हर्टन विक्स बरोबर १६२ धावांची १०० मिनिटामध्ये भागीदारी तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये केली. परंतु पुढल्या तीन कसोटी सामन्यामध्ये त्याची फलंदाजी जास्त चांगली झाली नाही. तो सिरीज संपली तेव्हा त्या सिरीजमध्ये त्याने ७८ धावा केल्या आणि १५.५३ च्या सरासरीने , आपल्या ऑफ ब्रेक गोलंदाजीने १३ विकेट्स घेतल्या. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये मध्ये त्याने एका इनिंगमध्ये ७५ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या.
१९५७ मध्ये इंग्लंड विरुद्ध त्याने पहिल्या कसोटीमध्ये १६१ धावा केल्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये १६८ धावा केल्या. त्याला विझडेनने क्रिकेटियर ऑफ द इअर म्हणून सन्मानित केले होते. त्यानंतर १९५७-५८ मध्ये वेस्ट इंडिजमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना ४७.१६ च्या सरासरीने त्याने २८३ धावा केल्या आणि ३९ च्या सरासरीने १३ विकेट्स घेतल्या. १९५८-५९ मध्ये भारताच्या दौऱ्यावर वेस्ट इंडिज आलेली असताना त्याने ३५.८७ च्या सरासरीने २८७ धावा केल्या आणि ९ विकेट्स घेतल्या. दिल्ली मध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामान्यामध्ये त्याने १०० धावा केल्या दोन्ही इनिंगमध्ये १८५ धावा देऊन ८ विकेट्सही घेतल्या, त्याच वर्षी झालेल्या पाकिस्तान विरुद्ध झालेल्या ३ कसोटी सामन्यामध्ये तो कमी यशस्वी झाला, त्याने फक्त ८१ धावा केल्या आणि त्याला २० च्या सरासरीने ३ विकेट्स मिळाल्या.
१९५८ आणि १९५९ मध्ये कॉली स्मिथ बुमले क्रिकेट क्लब लँकेशायर लीग साठी खेळत असताना १९५९ साली त्याने नाबाद ३०६ धावांचा रेकॉर्ड केला.
कॉली स्मिथ याने शेवटचा कसोटी सामना खेळाला तो ३१ मार्च १९५९ रोजी पाकिस्तान विरुद्ध. त्याने २६ कसोटी सामन्यामध्ये १३३१ धावा केल्या त्यामध्ये त्याने ४ शतके आणि ६ अर्धशतके केली. त्याची त्याची कसोटी सामन्यामधील सर्वोच्च धावसंख्या होती १६८ धावा तसेच त्याने ४८ विकेट्सही घेतल्या. एका इनिंगमध्ये त्याने ९० धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. तर त्याने ७० फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ४०३१ धावा केल्या त्यामध्ये त्याने १० शतके आणि २० अर्धशतके केली. फर्स्ट क्लास सामन्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १६९ धावा तसेच त्याने १२१ विकेट्सही घेतल्या. एका इनिंगमध्ये त्याने ६३ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या.
७ सप्टेंबर १९५९ रोजी सकाळी ४ वाजून ४५ मिनिटे असताना त्यांच्या वेस्ट इंडिजमधील क्रिकेट सहकार्यांबरोबर इंग्लंडमध्ये कारने जात होते एक चॅरिटी सामन्यासाठी ते लंडनहून निघाले. त्यावेळी सर गॅरी सोबर्स कार चालवत होते आणि बरोबर दुसरा वेस्ट इंडिजचा त्यांचा खेळाडू मित्र टॉम ड्वेडने होता. आधीच ट्रॅफिकमुळे उशीर झाला होता अचानक त्यांची कार एक पशु घेऊन जाणाऱ्या ट्रकवर आदळली, हा अपघात स्टॅनफोर्ड जवळ झाला. कॉली स्मिथ मागच्या सीटवर झोपला होता. अचानक तो पुढे फेकला गेला , काही जखम झाली नाही हे ते त्याने सोबर्सला सांगितले तो म्हणाला , ‘काळजी करू नकोस मी ठीक आहे.’ परंतु त्याच्या मणक्याला जोरदार दुखापत झाली हे त्याला कळले नाही आणि तो कोमामध्ये गेला तो शुद्धीवर आलाच नाही .
९ सप्टेंबर १९५९ रोजी म्हणजे अपघातानंतर २ दिवसांनी त्याचे निधन झाले. त्याचे निधन झाले तेव्हा त्याचे वय होते २६ वर्षाचे. त्याच्या निधनानंतर केन चॅप्लिन याने ‘द हॅप्पी वॉरिअर’ या नावाचे त्याचे आत्मचरित्र लिहिले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply