डेरेक लान्स मरे याचा जन्म २० मे १९४३ रोजी पोर्ट ऑफ स्पेन त्रिनिनाद येथे झाला. तो वेस्ट इंडिज कडून खेळाचं परंतु त्रिनिनाद आणि टोबॅको तसेच नॉटिंगहॅमशायर, वोर्वींर्शाकशायर कडूनही खेळला . त्याचे शिक्षण क्वीन्स रॉयल कॉलेजमधून झाले. तो शाळेमध्ये असताना त्रिनिनाद आणि टोबॅकोच्या नॅशनल टीमचा पहिला खेळाडू होता. पुढे त्याने नॉटिंगहॅम युनिवर्सिटी आणि झिझस कॉलेज, केम्ब्रिज येथे शिक्षण घेतले. १९६७ मध्ये तो केम्ब्रिज ब्लू कडून खेळला तसेच तो केम्ब्रिज युनिव्हर्सिटी क्रिकेट क्लबचा कप्तान होता.
तो नेहमी इंडिजच्या संघामध्ये यष्टीरक्षक म्हणून खेळला . ६ जून १९६३ रोजी विसाव्या वर्षी तो पहिला कसोटी सामना खेळला तो इंग्लंडविरुद्ध . त्यावेळी त्यांच्या टीमचा कप्तान होता फ्रॅंक वॉरेल. १९६३ च्या सिरीजमध्ये त्याने २४ खेळाडू यष्टीरक्षकम्हणून खेळत असताना बाद केले. हा त्यावेळी एक रेकॉर्डच होता. परंतु दुर्देवाने त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आणि एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये एकही शतक काढलेले नाही. परंतु फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मात्र त्याने नाबाद १६६ धावा काढलेल्या आहेत, हे महत्वाचे. डेरेक मरे याचे १९७५ च्या वर्ल्ड कप मधील योगदान कुणीच विसरू शकणार नाही . १९७५ मध्ये जेफ थॉमसन आणि डेनिस लिलीला जे फटके त्याने मारले होते ते आजही सुदैवाने इंटरनेटवर बघता येतात.
डेरेक मरे हा उजव्या हाताने खेळत असे आणि तो खेळण्यासाठी मधल्या फळीत खेळण्यास येत असे . तो खेळण्यास आला की समोरच्या फलंदाजाला अत्यंत योग्यपणे , प्रभावीपणे ‘ स्टॅन्ड ‘ देत असे. १९७५ मध्ये भारतीय संघाविरुद्ध खेळताना त्याने कसोटी सामन्यांमध्ये नाबाद ९१ धावा केल्या होत्या. त्यावेळी डेरेक मरे याने क्लाइव्ह लॉईड बरोबर २५० धावांची भागीदारी केली होती. त्यावेळी क्लाइव्ह लॉईड याने नाबाद २४२ धावा केल्या होत्या.
डेरेक मरे कसोटी क्रिकेट खेळत असतानाच १९७८ ते १९८९ पर्यंत ‘ फॉरीन सर्व्हिस ऑफ त्रिनिनाद आणि टोबॅको ‘ चे डिप्लोमॅट म्हणून काम करत होते.
डेरेक मरे याने त्यांचा शेवटचा कसोटी क्रिकेटचा सामना ५ सप्टेंबर १९७३ रोजी इंग्लंडविरुद्ध खेळला . जवळ जवळ १७ वर्षे तो वेस्ट इंडिंजसाठी क्रिकेट खेळत होता आणि एक यष्टीरक्षक म्हणून हा कालखंड निश्चित मोठा आहे . डेरेक मरे याने ६२ कसोटी सामन्यामध्ये १९९३ धावा केल्या त्यामध्ये त्याची ११ अर्धशतके होती आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या होती ९१ धावा . त्याने यष्टिरक्षण करताना १८१ झेल घेतले आणि ८ जणांना स्टंपिंग करून बाद केले म्हणजे १८९ जणांना बाद केले. डेरेक मरे याने २६ एकदिवसीय सामन्यामध्ये २९४ धावा केल्या त्यामध्ये त्याने सर्वात जास्ती नाबाद ६१ धावा काढल्या. यष्टिरक्षण करताना त्याने ३७ झेल पकडले आणि १ स्टंप आउट केला म्हणजे ३८ जणांना बाद केले. डेरेक मरे याने ३६७ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये १३,२९२ धावा काढल्या त्यामध्ये त्याने १० शतके आणि ७२ अर्धशतके केली. त्याची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद १६६ धावा. तसेच त्याने गोलंदाजी करून ५ जणांना बादही केले होते. डेरेक मरे याने यष्टिरक्षण करताना ७४० झेल घेतले आणि १०८ जणांना स्टंपिंग करून बाद केले म्हणजे ८४८ जणांना बाद केले होते. डेरेक मरे ह्याने १९८०-८१ पर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले.
त्याला ‘ बिग ग्लोज ‘ असे म्हणत कारण अँडी रॉबर्ट्स सारख्या जलद गोलंदाजांचे चेंडू अडवणे आहे काही सोपे काम नव्हते. खरे तर तो जॅकी हेन्ड्रिक्स आणि जेफ दुजा या दोन यष्टीरक्षणामधील वेस्ट इंडिज क्रिकेटमधील दुवा होता असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. दुर्देवाने हल्ली यष्टिरक्षकाकडून देखील जास्त धावांची अपेक्षा असते परंतु सतत विकेटमागे उभे राहून येणार प्रत्येक चेंडू अडवणे सोपे काम नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.
डेरेक मरे याने अनेक उच्च पदे भूषवली तसेच त्याने तीन एकदिवसीय सामन्यांचे १९९२ मध्ये मॅच रेफ्री म्हणूनही काम बघीतले. सध्या तो ‘ त्रिनिनाद अँड टोबॅको ‘ आणि टोबॅको ट्रान्सफरन्सीचा चेअरमन म्हणून काम बघत आहे.
— सतीश चाफेकर
Leave a Reply