नवीन लेखन...

क्रिकेटपटू दिलीप सरदेसाई

दिलीप नारायण सरदेसाई यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी गोवा येथे झाला. १९५६ मध्ये मुंबईमध्ये येईपर्यंत त्यांची क्रिकेट कारकीर्द सुरु झालेली नव्हती . त्यावेळी गोमंतकामध्ये तसे क्रिकेट कमीच होते . लहानपणी ते टेबल टेनिस खेळात असत ते शाळेच्या सामन्यांमधून टेबल टेनिस खेळले . परंतु मुंबईला आल्यानंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तिथे ठरवले की आपण क्रिकेट खेळायचे . त्यांना खरे क्रिकेटसाठी खरे प्रोत्साहन दिले ते भारतीय संघाकडून नाव कमावलेल्या त्यांच्या चुलत भावाच्या म्हणजे सोपान सरदेसाई याला मिळालेल्या यशामुळे.

दिलीप सरदेसाई खऱ्या अर्थाने सुदैवी होते कारण मुंबईचे भूतपूर्व रणजी खेळाडू एम . एस. नाईक दिलीप सरदेसाई यांच्या खेळावर खूप खूश होते. त्यांनी दिलीप सरदेसाई यांना मार्गदर्शन द्यायला सुरवात केली. नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप सरदेसाई विविध प्रकारचे फटके मारण्याची तयारी करत होते त्याचप्रमाणे आपल्या फलंदाजीवरचे लक्ष विचलित न होण्याची देखील काळजी घेत होते. म्हणून त्यांनी जास्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले नाही. तर फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित केले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी कडून खेळण्यास सुरवात केली. १९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ‘ हिट विकेट ‘ करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.
दिलीप सरदेसाई यांनी विदेशी मैदानावर म्हणजे १८ ते २३ फेब्रुवारी १९७१ साली किंग्स्टन मैदानावर वेस्टइंडिनजवरुद्ध पहिल्या इनिंग २१२ धावा केल्या. आणि त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला तो म्हणजे परदेशी भूमीवर पहिले द्विशतक केले.अर्थात तो सामना अनिर्णित राहिला. ह्याच दौऱ्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ११२ धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाने पहिल्या वेळी वेस्ट इंडिजच्या संघाला हरवले. ह्या दौऱ्यामधील पहिला , तिसरा आणि पाचवा सामना अनिर्णित राहिले. ह्या दौऱ्यामधील चौथ्या सामन्यांमध्ये त्यांनी १५० धावा केल्या, ते होल्डरकडून बाद झाले होते . ही कसोटी मालिका भारतीय संघाने १-० ने जिंकली. ह्या दौऱ्यामध्ये दिलीप सरदेसाई यांनी ऐकून ६४२ धावा केल्या. ह्या दौऱ्यामध्ये सुनील गावस्कर यांनी ७७४ धावा केल्या तर सर गारफिल्ड सोबर्स यांनी ५९७ धावा केल्या होत्या.

दिलीप सरदेसाई यांनी मुंबई मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२ ते १५ मार्च १९६५ मध्ये नाबाद २०० धावा केल्या. डावखुरे दिलीप सरदेसाई गोलंदाज पण होते परंतु त्यांचे लक्ष फलंदाजीकडे असल्यामुळे ते गोलंदाजीमध्ये जास्त प्रभाव पाडू शकले नाही. दिलीप सरदेसाई ज्या जमान्यामध्ये आतंरराष्ट्रीय सामने कमी होत असत. खेळाडू जास्त फर्स्ट क्लास सामने खेळत असत. जेव्हा त्यांनी भारतीय संघाने पहिला वहिला इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरचा सामना जिंकला तो क्षण दिलीप सरदेसाई यांना महत्वाचा वाटला होता. त्या ओव्हलच्या मैदानावर महत्वाच्या कसोटी सामन्यांमध्ये दिलीप सरदेसाई यांनी ५४ आणि ४० अत्यंत मोलाच्या धावा केल्या. भारताला त्या विजयासाठी या धावांची खूप मदत झाली. पहिल्या इनिंग मध्ये सरदेसाई यांच्या ५४ तर सर्वात जास्त फारुख इंजिनिअर यांनी ५९ धावा काढल्या होत्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये सरदेसाई यांनी ४० धावा काढल्या होत्या. तर अजित वाडेकर यांनी ४५ धावा काढल्या होत्या.

दिल्ली इथे २० ते २५ डिसेंबर १९७२ रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात दिलीप सरदेसाई खेळले .सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की , ‘ दिलीप सरदेसाई यांनी जलद गोलंदाजीवर कसे खेळावे हे दाखवून दिले.’

दिलीप सरदेसाई यांना चेंडूवर नजर बसण्यासाठी जरा वेळ दिला की क्षेत्ररक्षकांची दमछाक होत असे , गोलंदाजांचा धीर सुटत असे. ते दमून जात. दिलीप सरदेसाई यांचे कटचे फटके, ग्लान्सचे फटके , ड्राईव्हचे फटके आणि हूकचे फटके मारत असत त्याचप्रमाणे खेळताना अनेक फटके त्यांच्या भात्यात असत.

३० सामन्यांमध्ये २००१ धावा केल्या त्यावेळी त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २१२, त्यामध्ये त्यांनी ५ शतके आणि ९ अर्धशतके केली. त्यातली दोन द्विशतके होती. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १७९ सामन्यांमध्ये १०, २३० धावा केल्या त्यामध्ये त्यांची २५ शतके आणि ५६ अर्धशतके होती.

दिलीप सरदेसाई यांचा खेळ मला पाहता आला नाही परंतु त्यांना भेटण्याचा योग बऱ्याच वेळा आला , ते आजारी असताना बॉम्बे हॉस्पिटल मध्ये आमच्या डॉक्टरांकडे येत असत तेव्हा त्यांच्याशी थोडेसे बोलणे होत असे .

परदेशी भूमीवर पाहिले द्विशतक करणाऱ्या दिलीप सरदेसाई यांचे २ जुलै २००७ रोजी मुंबईमध्ये निधन झाले .

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..