जेफ्री रॉबर्ट थॉमसन यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५० रोजी झाला. थॉमसन यांनी त्यांच्या वडिलांकडून प्रभावी गोलंदाजी शिकले . डिसेंबर १९७५ मध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना त्यांनी तशी १६०.४५ किमी अचूक गोलंदाजी केली. ह्याचा अभ्यास टॉम पेनरोज आणि ब्रायन ब्लॅक्सबी यांनी केला. त्याबरोबर डेनेस लिली , अँडी रॉबर्ट्स आणि मायकेल होल्डिंग यांचाही अभ्यास केला गेला. ह्याचे वर्णन डेनेस लिलीने त्याच्या ‘ द आर्ट ऑफ फास्ट बोलिंग ‘ या पुस्तकामध्ये केले आहे. म्हणजे थॉमसन यांचा चेंडू हातातून सुटल्यावर ०.४३८ सेकंदात फलंदाजांच्या बॅटवर आदळत असे किंवा त्याच्यापर्यंत पोहचत असे. रिची बेनॉने सांगितले की फ्रॅंक टायसन नंतर पाहिलेला फास्टेस्ट बॉतर . रॉडनी मार्श याने सांगितले की थॉमसन जेव्हा चेंडू वरच्या बाजूने टाकत असे तेव्हा त्याचा वेग तशी १८० कि मी असे. इयान चॅपेल आणि अँश्ले मॅलेट हे मार्शच्या मताशी सहमत होते. कारण यष्टीरक्षक असताना थॉमसन आणि लिली चे चेंडू विकेटमागे झेलायचे म्हणजे खायचे काम नव्हते कारण ग्लोज असले तरी खेळ संपल्यावर मार्शचे हात चांगलेच शेकून निघालेले. सुनील गावस्कर यांनी देखील सांगितले की २० वर्षांमध्ये त्यांनी पाहिलेला फास्टेस्ट गोलंदाज जेफ थॉम्ससनच होता. विव्ह रिचर्ड्स किंवा मार्टिन क्रो यांचेदेखील हेच मत होते.
जेफ थॉमसन यांनी पहिला कसोटी सामना २९ डिसेंबर १९७२ रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळला . तो त्या सिरींजमधील दुसरा कसोटी सामना होता अर्थात त्याची निवड ही अचानक झाली बॉब मेस्सीची रिप्लेसमेंट म्हणून अर्थात तो एक त्यांच्या निवड समितीचा प्रयोग म्हणावा लागेल कारण त्याच्यासमोर वेस्ट इंडिजची टूर होती. परंतु थॉमसनला ११० धावा देऊन एकही विकेट त्यांना मिळाली नाही. कारण नंतर लक्षात आले पायाच्या हाडाला जखम झालेली आहे. त्यामुळे त्याला वेस्ट इंडिजच्या टूरला जात आले नाही. परंतु पुढे १९७३-७४ मध्ये त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील क्वीन्सलँडविरुद्धच्या सामन्यामध्ये एका सामन्यामध्ये ९ विकेट्स काढल्या. त्यावेळी क्वीन्सलँडचा कप्तान ग्रेग चॅपल हा होता.
१९७४-७५ मध्ये थॉमसन यांची निवड १९७४-७५ च्या अँशेस साठी झाली. त्यावेळी एका चॅनेलच्या मुलाखतीमध्ये त्याच्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. तो म्हणाला होता ,’ मला फलंदाजांना बाद करण्यापेखा ‘ हिट ‘ करणारे आवडते , मला क्रिकेटच्या पिचवर रक्त्त पडलेले बघायला आवडते .’ त्या सामन्याच्या दुसऱ्या इनिंगला त्याने ४६ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या तर पर्थवर त्याने अनेक फलंदाजांना जखमी केले आणि दुसऱ्या इनिंगमध्ये ९३ धावांमध्ये ५ विकेट्स घेतल्या. तो सामना ऑस्ट्रेलिया जिंकली .
१९७५ च्या इंग्लंडच्या टूरवर असताना पहिल्या कसोटी सामन्यामध्ये त्याने ६७ चेंडूंमध्ये ४९ धावा केल्या आणि ३८ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. त्या विकेट्स आता बघताना त्याच्या गोलंदाजीचे व्हेरिएशन देखील आजही बघायला मिळते. १९७५-७६ च्या वेस्ट इंडिजच्या टूरमध्ये त्याने ६ कसोटी सामन्यामध्ये २९ विकेट्स घेतल्या . ह्या टूरच्या वेळी आधीच्या टूरपेक्षा थॉमसन यांची गोलंदाजी सुधारलेली होती.
जेफ थॉमसन ने टाकलेले भन्नाट चेंडू टाकताना आजही पाहताना कधी धक्का देतात तर कधी भेदकपणाचे दर्शन घडवतात . १९८१ मध्ये त्याने जहीर अब्बासला जो स्पेल टाकला होता आणि त्याला जहीरने चोख प्रत्युत्तर दिले होते तर थॉमसनचे काही चेंडू जबरदस्त होते .
पुढे शोएब अख्तर १६१.३ , शेन टेट १६१.१ , ब्रेट ली १६१.० आणि थॉमसन १६०.५ अशी आकडेवारी जाहीर झाली. थॉमसनने डोमेस्टिक लेव्हलला एका सामन्यामध्ये १८ धाव देऊन ६ विकेट्स घेतल्या. त्यावेळी जेफ थॉमसन आणि डेनेस लिली ही जोडी अक्षरशः क्रिकेट विश्वामध्ये दबदबा निर्माण करून होती.
जेफ थॉमसनने ५१ कसोटी सामन्यांमध्ये ६७९ धावा केल्या आणि २०० विकेट्स घेतल्या त्यामध्ये एका इनिंगमध्ये ४६ धावा देऊन ६ विकेट्स घेतल्या. तर ५० एकदिवसीय सामन्यांमध्ये ५५ विकेट्स घेतल्या. जेफ थॉमसन यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट सामने जास्त खेळले , त्यांनी १८७ सामन्यांमध्ये २०६५ धावा केल्या आणि ६७५ विकेट्स घेतल्या. एका इनिंगमध्ये २७ धावा देऊन ७ विकेट्स घेतल्या.
जेफ थॉमसन शेवटचा कसोटी सामना २० ऑगस्ट १९८५ रोजी इंग्लंविरुद्ध खेळले.
२७ जानेवारी २०१६ रोजी त्यांना ‘ ऑस्ट्रलियन हॉल ऑफ फेम ‘ ने सन्मानित करण्यात आले.
सुदैवाने मला त्यांना भेटण्याचा योग दोन वर्षांपूर्वी आला.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply