नवीन लेखन...

क्रिकेटपटू जॉन एड्रीच

जॉन एड्रीच यांचा जन्म २१ जून १९३७ रोजी इंग्लंडमध्ये झाला. त्यांच्या कुटूंबामध्ये त्यांचे चारही चुलत भाऊ इंग्लडसाठी फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहेत. शाळेत असताना जॉन वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळत असे. त्यांचे कोच होते माजी क्रिकेटपटू सी. एस. आर. बॉसवेल . बॉसवेल स्वतः ३० फर्स्ट क्लास क्रिकेट सामने खेळलेले होते. जॉन ‘ सरे ‘ आणि इंग्लडसाठी क्रिकेट खेळला .जॉन एड्रीच क्रिकेटमध्ये कट् , कव्हर ड्राइव्ह असे फटके मारण्यामध्ये तरबेज होते. १९५६ आणि १९५७ मध्ये ते फर्स्ट क्लास सामने कंम्बाईन्ड सर्व्हिसेस साठी खेळले. ते ‘ सरे ‘ साठी पहिला फर्स्ट क्लास सामना १९५८ च्या सेशनमध्ये खेळले. त्या वर्षी त्यांनी ५२.९१ च्या सरासरीने १,७९९ धावा केल्या.जॉन एड्रीच यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना ६ जून १९६३ रोजी इंग्लडविरुद्ध खेळला .

त्यांच्या खेळण्याच्या आकडेवारीवरून दिसून येते की त्या जनरेशनमध्ये ते उत्तम खेळाडू होते . १९६३ ते १९७६ या कालखंडामध्ये त्यांनी उत्तम प्रकारे धावा केल्या. १९६५ मध्ये त्यांनी त्रिशतक केले . त्यावेळी ते पाचवे सर्वात जास्त धावा करणारे इंग्लडचे खेळाडू होते. १९६४ मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील दुसऱ्या कसोटीच्या वेळी जेफ बॉयकॉट जखमी झाल्यामुळे जॉन एड्रीचना टीममध्ये घेण्यात आले , त्यांनी त्या सामन्यामध्ये १२० धावा केल्या परंतु तो सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. परंतु जॉन एड्रीच यांची १९६४-६५ च्या दक्षिण अफ़्रिएच्या टूरसाठी मात्र निवड झाली नाही. पुढे १९६५ मध्ये इंग्लंडचा एक खेळाडू जखमी झाल्यामुळे हेडिंग्ले येथे झालेल्या न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात परत जॉन एड्रीच यांना घेण्यात आले आणि यावेळी त्यांनी नाबाद ३१० धावा केल्या. जॉन एड्रीच यांनी त्यावेळी ८ तास फलंदाजी करून ५२ चौकार आणि ५ षटकार मारले म्हणजे ७७ टक्के धावा चौकार आणि षटकार यांच्या सहाय्याने २३८ धावा काढल्या. जर ते ९० मिनिटे खेळले असते तर त्यांनी ३६५ धावांचा रेकॉर्ड मोडला असता परंतु त्यावेळचा त्यांचा कप्तान माईक स्मिथ याने डाव घोषित केला. त्या त्रिशतकांमुळे त्या सीझनमध्ये जॉन एड्रीच यांनी ६२.६७ च्या सरासरीने २,३१९ धावा केल्या. त्यांनी ९ यशस्वी इनिंग्जमध्ये १३९ , नाबाद १२१ , नाबाद २०५ , ५५, ९६ , १८८ ,९२ , १०५ आणि नाबाद ३१० धावांमुळे ते ‘ बिग हिटर ‘ आहेत हे सिद्ध झाले कारण त्यांनी या सर्व धावा करताना ४९ षटकार मारले होते.

त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये जॉन एड्रीच यांना फलंदाजी करताना पीटर पोलॉकचा चेंडू डोक्यावर लागला, त्यावेळी कुणीही हेल्मेट घालत नव्हते म्हणून त्यांना डोक्याला दुखापत झाली आणि त्यांच्या नाबाद ७ धावा असतानाच त्यांना ‘ रिटायर हर्ट ‘ व्हावे लागले. ह्या सर्व शतकांमुळे , धावांमुळे जॉन एड्रीच यांना इंग्लडच्या कसोटी संघात स्थान दिले गेले , जर ते जखमी झालेले असतील तरच त्यांना त्यावेळी वगळले जाई . १९६५-६६ च्या अँशेस मध्ये ते तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यास येत असत परंतु पुढे ते सलामीला खेळण्यास येत.

१९७०-७१ च्या अँशेस सामन्यामध्ये त्यांनी ५२.८५ च्या सरासरीने ६८७ धावा केल्या. संपूर्ण सिरीजमध्ये त्यांनी ३३ तास आणि २६ मिनिटे फलंदाजी केली , हा एक रेकॉर्डच होता. पुढे हा रेकॉर्ड ग्लेन टर्नरने पुढल्याच वर्षी मोडला. जॉन एड्रीच यांनी १९७५ मध्ये २ ऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या १७५ धावा आजही चित्रफितीमध्ये पाहताना त्यांनी मारलेले फटके अक्षरशः दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून इतक्या जलद गतीने कसे जात होते ते आजही आपण बघू शकतो , ह्यावरून त्यांचे फटक्यांवरील नियंत्रण दिसून येते. माझे मित्र श्रीकांत राजे हे क्रिकेटचे अभ्यासक आणि आकडेतज्ञ आहेत ते म्हणाले जॉन एड्रीच यांनी पहिला एकदिवसीय सामना ५ जानेवारी १९७१ रोजी ऑस्ट्रलियाविरुद्ध खेळला . वास्तविक पहाता तो तिसरा कसोटी सामना होता परंतु पावसामुळे तीन दिवस वाया गेल्यामुळे तो सामना ४० षटकांचा करण्यात आला , दोन्ही संघाना ४० षटके खेळावी लागणार होती , आणि एक षटक ८ चेंडूचे होते. जॉन एड्रीचने त्यावेळी ८२ धावा केल्या म्हणजे त्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५० धावा करण्याचा मान जॉन एड्रीच यांना मिळाला. त्या सामन्यात त्यांना ‘ मॅन ऑफ द मॅच ‘ देण्यात आले. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यांना ‘ ‘ मॅन ऑफ द मॅच ‘ देण्यात आले हा एक वेगळा रेकॉर्ड होता.

जॉन एड्रीच ह्यांच्या फॉर्ममुळे इंग्लंडने १९६६ ते १९७१ ह्या कालावधीत एकूण ४० सामन्यांपैकी २७ सामने जिंकले त्यामध्ये एकच कसोटी सामना हरले. त्याचप्रमाणे त्यांनी १९७०-७१ च्या अँशेस मध्ये लागोपाठ १० कसोटी सामन्यांमध्ये ५० किंवा ५० पेक्षा जास्त धावा करणारे ते पहिले खेळाडू आहेत.

जॉन एड्रीच यांनी शेवटचा कसोटी सामना ८ जुलै १९७६ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . तर शेवटचा फर्स्ट क्लास सामना १९७७ साली खेळला . त्यांनी ७७ कसोटी सामन्यामध्ये ५,१३८ धावा ४३.५४ च्या सरासरीने केल्या. त्यामध्ये त्यांची १२ शतके आणि २४ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ३१० धावा. त्यांनी ७ एकदिवसीय सामन्यामध्ये २२३ धावा काढल्या. त्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती ९०. जॉन एड्रीच यांनी ५६४ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ४५.४७ च्या सरासरीने ३९,७९० धावा काढल्या त्यामध्ये त्यांनी १०३ शतके आणि १८८ अर्धशतके केली. त्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती नाबाद ३१० धावा. त्याचप्रमाणे त्यांनी ३१० झेलही पकडले. विझडेनने त्यांना १९६६ मध्ये ‘ क्रिकेटियर ऑफ द इअर ‘ देऊन त्यांचा सन्मान केला होता. जॉन एड्रीच यांना दोनदा ‘ मॅन ऑफ द मॅच ‘ मिळाले होते .

जॉन एड्रीच २००६ साली ‘ सरे काऊंटी क्रिकेट क्लबचे ‘ अध्यक्ष झाले. २००२ मध्ये त्यांना कॅन्सर आहे हे कळले . त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की मी ७ वर्षे जगेन परंतु २०१२ मध्ये त्यांच्या कॅन्सरने परत त्रास द्यायला सुरवात केली होती परंतु वेळीच औषध उपचार झाल्यामुळे ते वाचले. आजही ते फिट आणि कार्यरत आहेत.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..