जोसेफ डार्लिंग यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1870 रोजी ऑस्ट्रेलिया मधील न्यू साऊथ वेल्स येथे झाला. त्यांचे वडील जॉन डार्लिंग हे धान्याचे व्यापारी होते. जो डार्लिंग यांचे शिक्षण प्रिन्स आल्फ्रेड कॉलेज येथे झाले. तेथे असताना त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली. वयाच्या 15 व्या वर्षी आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत त्यांनी 252 धावांचा रेकॉर्ड केला होता. पुढे त्यांचा हा रेकॉर्ड त्यांचे पुढे कसोटी सामन्यामधील सहकारी क्लिम हिल होते त्यांनी 360 धावा करून मोडला. 1986 मध्ये ते ऑस्ट्रेलिया 11 च्या संघाकडून खेळले. त्यांनी त्यावेळी फक्त 16 धावा केल्या परंतु त्यांना मोठ्या खेळाडूंचा खेळ खूप जवळून बघता आला.
त्यांच्या वडिलांना मात्र त्यांचे क्रिकेट खेळणे आवडत नव्हते म्हणून त्यांनी त्यांना क्रिकेट आणि फ़ुटबाँल पासून दूर केले आणि दुसऱ्या शाळेत टाकले तेथे ते 12 महिने होते. त्यानंतर ते एका बँकेत काम करू लागले. त्यानंतर ते फार्मवर मॅनेजर म्हणून काम करू लागले . वयाच्या 19 व्या वर्षी त्यांची निवड दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी झाली परंतु त्यांचा वडिलांनी त्यांना परवानगी दिली नाही. पुढे दोन वर्षानंतर ते अँडलेटला आले आणि क्रिकेटमध्येही परत आले. त्यांनी अँडलेटमध्ये रुंडेल स्ट्रीटवर स्पोर्स्टचे दुकान उघडले. त्यानंतर त्यांचे दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी निवडले गेले . त्यावेळी त्यांनी न्यू साऊथ वेल्स विरुद्ध खेळताना 5 आणि 32 धावा केल्या तो त्यांचा पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना होता. तो सामना दक्षिण ऑस्ट्रेलियाने 237 धावांनी जिंकला. तर पुढल्याच सीझनमध्ये इंगलंडच्या टूरवर आलेल्या टीमबरोबर अँड्रू स्टोडार्ट ह्याच्या कप्तानीखाली त्यांनी ११५ धावा केल्या ते त्यांचे फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पहिले शतक होते.
जो डार्लिंग यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना इंग्लंडविरुद्ध सिडने येथे 14 डिसेंबर 1894 मध्ये खेळला . पहिल्या इनिंगमध्ये ते टॉम रिचर्डसन कडून त्याच्या पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाले तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 53 धावा केल्या हा सामना इंग्लंडने 10 धावांनी जिंकला खरे तर इंग्लंडला फॉलो ऑन मिळालेला होता आणि ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 586 धावा केल्या होत्या. परंतु इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला शेवटच्या इनिंगमध्ये 166 धावांमध्ये गुंडाळले .
1899 मध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियाची टीम इंग्लंडच्या दौऱ्यावर गेली होती तेव्हा जो डार्लिंग ऑस्ट्रेलियाचे कप्तान होते. त्यांनी स्वतःला उत्तम कप्तान म्हणून तेथे शाबीत केले कारण ऑस्ट्रेलियाने त्या टूरमध्ये ३५ सामन्यांपैकी तीन सामने गमावले आणि तर 16 सामने जिंकले तर 16 सामने अनिर्णित राहिले. त्या टूरमध्ये जो डार्लिंग यांनी 41.29 च्या सरासरीने 1941 धावा केल्या. त्यामुळे त्यांना ‘ विझडेन क्रिकेटिअर ऑफ द इअर ‘ म्हणून सन्मानित केले.
परत त्यांच्या वडिलांनी त्यांना वर्षभर क्रिकेटपासून दूर ठेवले कारण त्यांनी टास्मानियामध्ये मोठी जमीन मेंढी व्यवसायासाठी घेतली म्हणून त्यांना तेथे जावे लागले परंतु ते परत 1901 मध्ये मेलबोर्न क्रिकेट क्लबमध्ये परत आले. ते इंग्लडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्याचे कप्तान होते. परत ते 1905 मध्ये इंग्लंडच्या टूरवर आले ती त्यांची शेवटची टूर होती. त्यानंतर ते फर्स्ट क्लास क्रिकेटकडे वळले. जो डार्लिंग यांनी फर्स्ट क्लास क्रिकेट 1893 ते 1908 पर्यंत खेळले . त्यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 14 ऑगस्ट 1905 रोजी इंग्लंडविरुद्ध ओव्हल वर खेळला . शेवटच्या सामन्यात त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 57 धावा काढल्या त्यावेळी ते टीमचे कप्तान होते तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांना फलंदाजी मिळाली नाही कारण त्याच्या संघाने 4 बाद 124 धावा केल्या हा सामना अनिर्णित राहिला होता.
जो डार्लिंग यांनी 34 कसोटी सामन्यात 28.56 च्या सरासरीने 1657 धावा केल्या तर 27 झेल पकडले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 3 शतके आणि 8 अर्धशतके काढली. त्यांनी 202 फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात 34.52 च्या सरासरीने 10,635 धावा केल्या त्यामंध्ये त्यांनी 19 शतके आणि 55 अर्धशतके केली. त्यामध्ये त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती 210 धावा तसेच त्यांनी 148 झेलही पकडले
जो डार्लिंग यांनी निवृत्तीनंतर परत टास्मानिया येथील त्यांच्या मेंढी व्यवसायायाकडे वळले आणि त्यांनी हरितक्रांतीकडे वळून खूप काम केले. त्याचप्रमाणे टास्मानिया येथील स्टॉक होल्डर्स आणि रॉयल ऍग्रीकल्चर सोसायटी , टास्मानिया साठी काम केले. त्यांना खूप सन्मान त्यांच्या कामाबद्दल मिळाले. जो डार्लिंग यांचे 2 जानेवारी 1946 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी ऑस्ट्रियामधील होबार्ट येथे झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply