जॉन मायकेल ब्रेअर्ली याचा जन्म २८ एप्रिल १९४२ रोजी इंग्लंडमधील मिडलसेक्स मध्ये झाला. माईक ब्रेअर्ली याचे शिक्षण ‘ ऑफ लंडन स्कुल ‘ मध्ये झाले . त्याचे वडील तेथे शिक्षक होते आणि तेही फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले होते. केम्ब्रिजमध्ये असताना तो क्रिकेट उत्तम क्रिकेट खेळत असे नंतर तो यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून खेळू लागला. त्याने यष्टीरक्षक म्हणून फर्स्ट क्लास क्रिकेटचा सामना खेळताना ७६ धावा केल्या. १९६१ ते १९६८ पर्यंत तो केंब्रिज विद्यापीठासाठी क्रिकेट खेळत होता. १९६४ च्या पुढे तो त्यांचा कप्तान झाला. त्याने काऊंटी क्रिकेट १९६१ नंतर मिडलसेक्स काऊंटी क्रिकेट क्लब कडून खेळताना अनेक वेळा सलामीला मायकेल स्मिथ बरोबर खेळण्यास येत असे.
केंब्रिजमध्ये असतानाच तो मेलबॉर्न क्रिकेट क्लब साठी दक्षिण आफ्रिकेच्या टूरसाठी १९६४-६५ मध्ये त्याची निवड झाली.त्याचप्रमाणे एम . सी. सी.व्हा अंडर-२५ च्या टीमच्या कप्तानपदी निवड झाली पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासाठी त्यावेळी त्याने २२३ धावा पाकिस्तानविरुद्ध केल्या . तर नॉर्थ झोनसाठी नाबाद ३१२ धावा केल्या त्या त्याच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावा होत्या. त्या टूरमध्ये त्याने १३२ च्या सरासरीने ६ सामन्यामध्ये ७९३ धाव केल्या.१९६९ आणि १९७० मध्ये त्याला कमी सामने खेळावे लागले कारण तो युनिव्हर्सिटी ऑफ न्यूकॅसल -अपॉन-टाईप मध्ये तत्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणून करिअर करत होता.
माईक ब्रेअर्ली त्याचा पाहिलं कसोटी सामना खेळला ३ जून १९७६ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध आणि त्यावेळी तो ३४ वर्षाचा होता. त्याचा रेकॉर्ड बघाल तर त्याने ३९ कसोटी सामन्याच्या ६६ इनिंग्समध्ये २२.८८ च्या सरासरीने १४४२ धावा केल्या त्यामध्ये त्याचे एकही शतक नाही परंतु तो कप्तान म्हणून ‘ आउटस्टँडिंग ‘ होता असे म्हटले जाते. तो अत्यंत उत्तम क्षेत्ररक्षक होता, तो फाईन स्लिपला उत्तमपणे झेल घेत असे बहुतेक करून फर्स्ट स्लिपला . तो १९७७ पर्यंत इंग्लंडचा कप्तान होता. त्याच्याकडे मॅनेजमेन्ट स्किल जबरदस्त होते , त्याच्या खेळाडूंकडून तो बेस्ट परफॉर्मन्स करून घ्यायचा . त्यावेळी बॉब विलिस , डेव्हिड गावर आणि इयान बॉथम संपूर्ण फॉर्मात होते , टॉपवर होते. त्यावेळी १९७९ मध्ये ‘ अँल्यूमिनियम बॅट ‘ हे प्रकरण उदभवले होते. डेनिस लिलीला ‘ अँल्यूमिनियम बॅट ‘ वापरण्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याच टूरमध्ये त्याने एक वादग्रस्त प्रकार केला म्हणजे जेव्हा शेवटच्या चेंडूवर तीन धावा असताना सर्व क्षेत्रक्षकांना यष्टिरक्षकापासून सगळ्यांना ‘ बाउंड्री ‘ वर उभे केले होते परंतु त्यावेळी हा त्यावेळच्या कायद्याप्रमाणे त्याचा तो निर्णय कायदेशीर होता असे म्हटले गेले.
क्रिकेटमध्ये वापरात येणाऱ्या वस्तूंच्या बाबतीत बाबतीत तो खूप प्रयोगशील होता. भारतीय संघाच्या सुनील गावस्करने डोक्याला चेंडूंमुळे ‘ इजा ‘ होऊ नये म्हणून जी ‘ स्कल कॅप ‘ वापरली होती ती ‘ स्कल कॅंप ‘ त्यानेच १९७७ मध्ये बनवली होती . त्यावेळी हेल्मेट वापरात नसत . पहिल्यांदा हेल्मेट वापरले गेले ते डेनिस एमिस याच्याकडून १९७८ मध्ये ते वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये . परंतु कसोटी सामन्यामध्ये पहिल्यांदा हेल्मेट वापरले ते १७ मार्च १९७८ रोजी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ग्रॅहम यालप याने.
माईक ब्रेअर्ली याने ३९ कसोटी सामन्यामध्ये १४४२ धावा केल्या त्यामध्ये त्याची ९ अर्धशतके आहेत. त्याची कसोटी सामन्यामधील सर्वोच्च धावसंख्या आहे ९१ . त्याने ५२ झेलही पकडले. त्याचप्रमाणे त्याने २५ एकदिवसीय सामने खेळले त्यामध्ये त्याची ३ अर्धशतके असून त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे ७८. माईक ब्रेअर्लीने ४५५ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये २५,१८६ धावा केल्या त्या ३७.८१ या सरासरीने . त्यामध्ये त्याची ४५ शतके आणि १३४ अर्धशतके आहेत . त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे नाबाद ३१२ धावा. तसेच त्याने ४१८ झेल पडले असून १२ जणांना स्टंपिंग करून बाद केले आहे. माईक ब्रेअर्ली याने त्याच्या कसोटीमधील १४४२ धावांमध्ये एकही षटकार मारलेला नाही परंतु १३१ चौकार मात्र मारलेले आहेत.
माईक ब्रेअर्ली याने अनेक पुस्तकही लिहिली त्यामध्ये त्याचे ‘ द आर्ट ऑफ कँप्टन्सी ‘ हे विशेष गाजले. तसेच तो ऑक्टोबर २००७ मध्ये एम.सी.सी. चा प्रसिडेंट झाला आणि त्याने एक वर्षभर कारभार पहिला आणि त्यानंतर त्याने डेरेक अंडरववूडला त्या पदावर घेण्यास सांगितले.
माईक ब्रेअर्ली याला केंब्रिज कॉलेजने ऑनररी फेलोशिप दिली आहे त्याचप्रमाणे २००६ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाने ऑनररी डॉक्टरेट देऊन त्याचा सन्मान केला आहे.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply