मॉर्सी लेलँड यांचा जन्म २० जुलै १९०० रोजी इंग्लंडमधील यॉर्कशायर येथे झाला. त्यांच्या बर्थ सर्टिफिकेट वर त्यांचे नाव मॉरिस असे होते परंतु तेथे त्याचा उच्चार मॉर्सी ( Maurice ) असा केला जात असी. त्यांचे वडील लेन्सशायर मधील मूरसाइड कडून प्रोफेशनल क्रिकेट खेळत असत. त्यावेळी ते ग्रॉऊंड्समन म्ह्णून देखील काम करत. त्यांचा मुलगा मॉर्सी हा देखील १९१२ पासून मूरसाइड कडून क्रिकेट खेळू लागला. पहिल्या महायुद्धामध्ये सर्व्हिस केल्यानंतर मॉर्सी लेलँड तो १९१८ ते १९२० मध्ये हॅरोगेटकडून प्रोफेशनल क्रिकेट खेळू लागले . त्यानंतर ते यॉर्कशायर च्या सेकंड टीममध्ये त्याने प्रवेश केला. जेव्हा ते फर्स्ट टीमध्ये गेले ते मधूनमधून सेशन्समध्ये मधून मधून गोलंदाजी करत असत. त्यावेळेत ते हॅरोगेटकडून फ़ुटबाँलही खेळले.
१९२० च्या दरम्यान यॉर्कशायर कमिटी नवीन खेळाडूंचा शोध घेत होती कारण पहिल्या महायुद्धामुळे अनेक जुन्या खेळाडूंची करिअर संपली होती. मॉर्सी लेलँड यांनी १९२० च्या सीझनमध्ये यॉर्कशायर कडून पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना खेळला , त्यानंतर ते सेकंड टीममध्ये अनेकवेळा खेळले. मॉर्सी लेलँड त्या वर्षी ५ फर्स्ट क्लास सामने खेळले, त्यांनी लेसेसस्टर शायर विरुद्ध खेळताना नाबाद ५२ धावा केल्या , त्या सीझनमध्ये त्याची सरासरी होती १९ .
पुढे १९२२ च्या दरम्यान ते अनेक काऊंटी चॅम्पिअनशिप खेळले. ते नॉर्मन किलनेर याला रिप्लेसमेंट म्हणून. परंतु त्यांची फलंदाजीची सरासरी काही चांगली नव्हती त्यामुळे त्यांना अनेक वेळा टीकेचाही धनी व्हावे लागले आणि क्रिकेटमध्ये तेच असते , जरा माणूस आऊट ऑफ फॉर्म झाला की त्याच्यावर भडीमार होतोच होतो हे हल्लीही धोनीच्या बाबतीत होताना आढळते म्हणून तो स्वतःला सतत प्रूव्ह करतच असतो हे सर्वाना माहित आहेच.
खरे तर १९२३ नंतर ते खऱ्या अर्थाने एस्टॅब्लिश झाले वर्षी फर्स्ट क्लास क्रिकेटमधील १००० धावा पुऱ्या केल्या. १९२३ मध्ये त्यांनी २७.८९ च्या सरासरीने ७ अर्धशतके केली. त्यावेळी त्यांनी स्वतःला प्रूव्ह केले ते म्हणजे लिडिंग लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हणून. १९२४ च्या सीझनमध्ये त्यांनी ३०.७० च्या सरासरीने १, २५९ धावा केल्या. ऑगस्टच्या महिन्यात त्यांनी पहिले फर्स्ट क्लास क्रिकेटमधील शतक काढले त्यांनी नाबाद १३३ धावा केल्या.
मॉर्सी लेलँड यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो ११ ऑगस्ट १९२८ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध. त्याआधी १९२८ मध्ये मॉर्सी लेलँड यांनी ५०० षटकांमध्ये ३४.२० या सरासरीने ३५ विकेट्स घेतल्या होत्या तशी ती कामगिरी समाधानकाराक नव्हती. परंतु त्यांनी त्यावेळी ५४.०३ च्या सरासरीने १७८३ धावा केल्या होत्या हे महत्वाचे होते. खरे तर त्यांची निवड झाली त्यामुळे वाद-विवाद निर्माण झाला विशेषतः केंट क्रिकेट क्लब च्या दृष्टीने , कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचा सिनियर खेळाडू फ्रॅंक वुली याची निवड व्हायला हवी होती असे केंट क्लबला वाटले होते.
१९३२ – ३३ मध्ये इंग्लंडने अँशेस ४ -१ ने जिंकली परंतु ती सिरीज बॉडीलाईन गोलंदाजीने गाजली . मॉर्सी लेलँड यांनी त्या पाच कसोटी सामन्यामध्ये ३४ च्या सरासरीने ३०६ धावा केल्या. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात त्यांनी ८३ आणि ८६ धावा केल्या परंतु शेवटच्या सामन्यात ते शून्यावर बाद झाले.
मॉर्सी लेलँड यांचा १९३३ चा सीझन हा त्यांच्या खेळाच्या दृष्टीने ‘ पीक पॉइंट ‘ होता. त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २,३१७ धावा ५०.३६ या सरासरीने केल्या त्यामध्ये त्यांची ७ शतके होती. अनेक वेळा त्यांना खेळताना जखमाही झाल्या दोनदा बोटे फ्रँक्चर झाली तर कधी खांदा दुखावला ह्या अशा जखमांमुळे त्यांचे कसोटी सामने हुकले फर्स्ट क्लास क्रिकेट सामन्यात त्यांचा परफॉर्मन्स चांगला होत होता अगदी १९३७ पर्यंत. १९३८ मध्ये त्यांनी ३९.९३ च्या सरासरीने १,२३८धावा केल्या आणि २३ विकेट्स घेतल्या.
दुसऱ्या महायुद्धात त्यांनी आर्मी मध्ये प्रवेश केला आणि तेथे इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. त्यांनी त्यांचे फर्स्ट क्लास क्रिकेट करिअर १९४८ साली संपवले . तर त्यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना २० ऑगस्ट १९४८ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला . त्यांनी ४१ कसोटी सामन्यात २,७६४ धावा केल्या त्या ४६.०६ या सरासरीने त्यामध्ये त्यांनी ९ शतके आणि १० अर्धशतके केली. त्यांची कसोटी सामन्यामधील सर्वोच्च धावसंख्या होती १८७ धावा आणि त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये ६ विकेट्स घेतल्या. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील कामगिरी बघाल तर निश्चित चांगली आहे. त्यांनी ६८६ सामन्यामध्ये ४०.५० च्या सरासरीने ३३,६६० धावा केल्या. त्यामध्ये त्यांची ८० शतके आणि १५४ अर्धशतके होती. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या होती २६३ धावा तसेच त्यांनी २९.३१ च्या सरासरीने ४६६ विकेट्स घेतल्या. त्याचप्रमाणे एका इनिंगमध्ये ६३ धावा देऊन ८ विकेट्स घेतल्या. तसेच ऐकून २४६ झेलही पकडले.
निवृत्तीनंतर ते हॅरोगेट कडून १९५० पर्यंत खेळत होते तसेच भावी क्रिकेटपटूंना कोचिंगही करत असत. त्यांनी पेपर तयार करणाऱ्या कंपनीत कामही केले. १९६३ पर्यंत ते यॉर्कशायरचे कोच होते परंतु त्यांना पार्किन्सनमुळे ते कोचिंग सोडावे लागले. तरी पण ते क्रिकेट सामन्यात आपली हजेरी लावत असत. हॅरोगेट मैदानावरील एका प्रवेशद्वाराला त्यांचे नावही दिले आहे.
मॉर्सी लेलँड यांचे १ जानेवारी १९६७ रोजी नॉर्थ यॉर्कशायर येथील एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply