“नरीमन जमशेदजीं ‘ नरी ‘ कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म ७ मार्च १९३४ मध्ये सुरत मधील गोध्रा इथे झाला. मुबंईत त्यावेळी सी. सी. आय. येथे क्रिकेट खेळत असत त्यांना एकदा तेथे एका तेथील व्यक्तीने विचारले तू गुजराथकडून खेळातील का ? ती व्यक्ती म्हणजे फिरोझ खंबाटा होती. खरे तर त्यांचे नाव गुजराथच्या संघाच्या लिस्टमध्ये नव्हते परंतु फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नरीभाईचा प्रवेश अचानक झाला. त्यावेळी गुजराथचा कॅप्टन म्हणजेच खंबाटा सामन्याच्याच दिवशी जखमी झाले आणि नरीभाईचा समावेश संघात झाला. नरीभाईनी मला बोलता बोलता मला सांगितले खरे तर ते जखमी झाले नव्हते कदाचित त्यांना कळले होते की माझा त्या संघात समावेश झालेला नाही आणि त्यांना मला त्या संघात घ्यायचे होते म्ह्णून कदाचित ते जखमी झाले आहेत असे त्यांनी सांगितले होते असे नरीभाईचे म्हणणे होते. परंतु नरीभाईनी त्या पहिल्याच सामन्यात दोन्ही इनींगमध्ये शतके झळकावली. कसोटी सामन्यात त्यांनी २ डिसेंबर १९५५ ह्या दिवशी पदार्पण केले ते न्यूझीलंड विरुद्ध. ते २६ व्या वर्षी भारतीय संघाचे कपाटं झाले, त्यावेळी ते सर्वात तारून कप्तान म्ह्णून ओळखले गेले. लॉर्ड्सला १९५९ मध्ये ब्रायन स्टेथमचे गोलंदाजी खेळात असताना त्यांच्या काही बरगड्या फ्रॅकचर झाल्या तरी त्यांनी ८१ धावा केल्या. त्याच वर्षी कानपूरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या सामन्यात अत्यंत महत्वाच्या सामन्यात त्यांनी ७४ धावा केल्या.
नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी १९६१-६२ मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध आणि वेस्ट इंडिजच्या विरुद्ध भारतीय नेतृत्व केले होते. त्यामध्ये भारताने दोन सामने जिंकले होते आणि बाकीचे तीन सामने बरोबरीत सुटले होते. पुढे आपला संघ त्याचवेळी वेस्ट इंडिजला गेला. बार्बाडोस येथे सामना चालू होता, चार्ली ग्रिफीथचा एक उसळता चेंडू नरी कॉन्ट्रॅक्टर याच्या डोक्यावर आदळला आणि त्याच्या नाकातून आणि कानातून रक्त येऊ लागले. ताबडतोब त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. जवळजवळ सहा दिवस ते बेशुद्ध होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेल्यावर वेस्ट इंडिजचे कप्तान सर फ्रॅंक वॉरेल हे देखील हॉस्पिटलमध्ये गेले, डॉक्टर्सनी रक्ताची गरज लागेल असे सांगताच सर फ्रॅंक वॉरेल यांनी सर्वप्रथम त्यांना रक्त दिले मग भारतीय संघातील पॉली उम्रीगर, बापू नाडकर्णी, चंदू बोर्डे यांनीही त्यांना रक्त दिले. हळूहळू त्यांची तब्येत सुधारू लागली. परंतु त्यांना कसोटी क्रिकेट सोडावे लागले. तो धक्का सगळ्यांनाच अनपेक्षित होता परंतु बाउंसरबद्दल विचार करण्यास लावणारा होता कारण त्यावेळी हेल्मेट घालत नसत. पुढे नरी कॉन्ट्रॅक्टर यानी प्रथम श्रेणीतले काही सामने खेळले परंतु त्यांना कसोटी सामने खेळता आले नाहीत. नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी आपला शेवटचा कसोटी सामना ७ मार्च १९६२ या दिवशी खेळले अर्थात त्याच सामन्यात त्यांना दुखापत झाली होती.
नरी कॉन्टॅक्टर यांनी प्रथम श्रेणीतील १३८ क्रिकेट सामन्यात त्यांनी ८६११ धावा केल्या होत्या. त्यामध्ये त्याची २२ शतके होती आणि त्याच्या सर्वाधिक १७६ धावा होत्या. तर ३१ कसोटी सामन्यात १६११ धावा केल्या त्यामध्ये एक शतक आणि ११ अर्धशतके होती. त्यामध्ये सर्वोच धाव होत्या १०८. पुढे १९८१ साली बंगाल क्रिकेट असोसिएशनने ग्रेट सर फ्रॅंक वॉरेल याना आदरांजली वाहताना कोलकता यथे सर फ्रॅंक वॉरेल यांच्या जन्मदिवशी ब्लड डोनेशनचा कार्यक्रम केला होता तेव्हा नरी कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या पत्नी डॉली हे दोघेही कोलकता येथे गेले आणि नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी तिथे आपले ब्लड डोनेट केले. आज नरी कॉन्ट्रॅक्टर यांनी अनेक पदे भूषवली आहेत. हल्ली वयोमानामुळे ते जास्त भर जात नाही परंतु नेहमी ते तरुण क्रिकेटपटूंना अत्यंत परखडपणे मार्गदर्शन आपल्या भाषणामधून करतात.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply