मला आठवतंय , पृथ्वी ने जेंव्हा ५४६ धावा केल्या होत्या तेव्हा त्या मैदानावर गेलो , त्याच्या वडिलांना भेटलो कारण मला त्याची स्वाक्षरी बॅटवर हवी होती , इतक्यात तो आम्हाला रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल वर खाताना दिसला…त्याचे खाणे संपलेच होते , मी त्याला बॅट देऊन विनंती केली तसा तो अवघडला कारण बॅटवर त्याची मी मागितलेली पहिलीच स्वाक्षरी होती , त्यांच्या तसे मी लिहावयास सांगितले..त्याने बॅटवर लिहिले My first autograph on bat ” ..त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले होते आणि त्याने पण योग्यच साथ दिली आणि आज तो भारतीय संघाचा सलामीवीर म्हणून यशस्वी होत असताना पाहून आनंद होतो..मोठे यश फक्त काही पावलांवरच येऊन ठेपले होते…अजून बरेच बाकी आहे , गुड लक.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply