नवीन लेखन...

क्रिकेटपटू सिडने बार्न्स

सिडने फ्रान्सिस बार्न्स यांचा जन्म 19 एप्रिल 1873 रोजी इंग्लंडमधील स्टॅफोर्डशायर येथे झाला. त्यांचे वडील रिचर्ड हे एका धातूच्या कंपनीत काम करत होते. त्यांचे वडील काही क्रिकेट खेळले नव्हते तर त्यांच्या तीन भावांपैकी एका भावाने फक्त क्रिकेटच्या बॅटला आणि चेंडूला स्पर्श केला होता.
त्यांची क्रिकेटची करिअर सुरु झाली ती 1888 मध्ये. त्यांच्या गावात एका हॉटेलच्या मागे मोकळी जागा होती तेथे ते एका लहान क्लबमध्ये ते क्रिकेट खेळत असत. ते पुढे पुढे स्मेथविक क्रिकेट क्लबमध्ये जाऊ लागले. त्या क्लबच्या तिसऱ्या क्रमांकाच्या क्रिकेट टीममधून ते खेळू लागले. त्यांना बिल बर्ड या त्यांच्या कोचने चेंडू ऑफ स्पिन कसा करायचा ते शिकवले. बिल बर्ड हे प्रोफेशनल कोच होते ते वॉर्वींर्कशायर कडून खेळलेले होते. 1891 च्या सीझनमध्ये सिडने बार्न्स बर्मिंगहॅम आणि डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगसाठी खेळले होते.  विस्मरणातील क्रिकेटपटू

सिडने बार्न्स वयाच्या 21 व्या वर्षी 1894 मध्ये जलद गोलंदाज म्हणून नावारूपास येत होते तेव्हा ते स्टॅफोर्डशायर काउंटी क्रिकेट क्लबमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून काम करू लागले. पुढे ते रिश्टन क्रिकेट कल्बमध्ये जाऊ लागले आणि 1899 मध्ये ते त्या क्लबमधून क्रिकेट खेळले. 1894 च्या सीझनमध्ये बार्न्स यांना वॉर्वीकशायर कडून खेळण्यासाठी बोलवणे आले. 1895 मध्ये ते काउंटी चॅम्पिअनशिप खेळले . एका छोट्या सामन्यात त्यांनी पहिला सामना खेळला त्यावेळी त्यांनी 8 षटके टाकून 27 धावा दिल्या परंतु त्यांना एकही विकेट मिळाली नाही , तो सामना अनिर्णित राहिला. त्याचवर्षी 23 ऑगस्टला बर्न्स यांनी त्यांचा पहिला फर्स्ट क्लास सामना ग्लुस्टरशायर विरुद्ध खेळला . पहिल्या इनिंगमध्ये 72 षटके टाकली गेली परंतु वाईट हवामानामुळे त्यांना मैदानावर उतरता आले नाही आणि तो सामना अनिर्णित राहिला. सिडने बार्न्स यांनी 1995 ते 1899 या कालखंडात 411 विकेट्स घेतल्या . त्यांचा उत्तम परफॉर्मन्स 1898 मध्ये झाला , त्या वर्षी त्यांनी 8.46 च्या सरासरीने 96 विकेट्स घेतल्या.

सिडने बार्न्स यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो 13 डिसेंबर 1901 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी नाबाद 26 धावा केल्या आणि 65 धावा देऊन 5 विकेट्स घेतल्या , तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 1 विकेट घेतली , हा सामना इंग्लंडने 1 इनिंग आणि 124 धावांनी जिंकला. त्यावेळी इंग्लन्डच्या संघात सिडने बार्न्स , कॉलिन ब्लाथे , लेन ब्रॉड हे तिघेही त्यांचा पहिला सामना खेळत होते आणि या तिघांनी दोन्ही इनिंग मिळून 20 विकेट्स म्हणजे त्या सामन्यातील सर्व विकेट्स घेतल्या.

सिडने बार्न्स यांनी त्यांचा शेवटचा कसोटी सामना 18 फेब्रुवारी 1914 रोजी दक्षिण आफ्रीकेविरुद्ध डर्बन येथे खेळला . शेवटच्या सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 56 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 88 धावा देऊन 7 विकेट्स घेतल्या होत्या. म्हणजे शेवटच्या सामन्यात त्यांनी एकूण 20 पैकी 14 विकेट्स घेतल्या. त्यानंतर पहिले महायुद्ध सुरु झाल्यामुळे फारसे सामने झालेच नाहीत. परंतु वयाच्या 55 व्या वर्षी वेल्स येथे त्यांनी 51 धावांमध्ये 7 विकेट्स घेतल्या तर 67 धावांमध्ये 5 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या सामन्यात वेल्स कडून खेळताना 28 धावांमध्ये 4 विकेट्स काढल्या तर 62 धावांमध्ये 8 विकेट्स काढल्या.

सिडने बार्न्स यांनी 37 कसोटी सामन्यात 242 धावा केल्या आणि 16.43च्या सरासरीने 189 विकेट्स घेतल्या . एका इनिंगमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट्स 24 वेळा घेतल्या त्याचप्रमाणे त्यांनी एका इनिंगमध्ये 103 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या. त्यांनी 133 फर्स्ट क्लास सामन्यात 1,573 धावा केल्या आणि 17.09 च्या सरासरीने 719 विकेट्स घेतल्या. त्यांनी एका इनिंगमध्ये 5 किंवा 5 पेक्षा जास्त विकेट्स 68 वेळा घेतल्या . त्याचप्रमाणे त्यांनी 103 धावा देऊन 9 विकेट्स घेतल्या. त्यांनी सर्व प्रकारच्या म्हणजे क्लब क्रिकेट , कसोटी क्रिकेट , फर्स्ट क्लास क्रिकेट आणि लीग क्रिकेटमध्ये एकूण 6,229 विकेट्स घेतल्या. सुप्रसिद्ध क्रिकेट तज्ञ सर नेव्हिल कार्ड्स यांनी 1963 च्या विझडेनमध्ये त्यांना आदरांजली वाहिली होती. वयाच्या 62 व्या वर्षी 1935 रोजी ते दोनदा स्टॅनफोर्डशायर कडून खेळले. तेव्हा त्यांनी 36 धावांमध्ये त्यांना एकही विकेट मिळाली नाही तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी 61 धावांत एक विकेट घेतली.

सिडने बार्न्स यांचे 26 डिसेंबर 1967 रोजी वयाच्या 94 व्या वर्षी स्टॅनफोर्डशायर येथी निधन झाले.
— सतीश चाफेकर
Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..