सुरज रघुनाथ याचा जन्म २२ मार्च १९६८ रोजी त्रिनिनाद आणि टोबॅको येथे झाला. अनेकांना हे नाव कदाचित माहीत नसेल कारण याची क्रिकेट कारकीर्द खूपच लहान आहे त्याने पहिला कसोटी सामना खेळला तो ५ मार्च १९९९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि शेवटचा सामना खेळला तो १३ मार्च १९९९ आणि तो पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध .
सुरज रघुनाथ अत्यंत आक्रमक फलंदाज होता. तो त्रिनिनाद आणि टोबॅको कडून खेळायचा. तो सलामीलाच खेळण्यास येत असे. त्याने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दोन शतके केली आणि दोन अर्धशतके केली त्यानंतर त्याचा फॉर्म गेला तो त्याच्या फिटनेसमुळे कारण त्याचा हात मोडला होता. त्यामुळे १९९९ मध्ये त्याला फक्त तीनच सामने खेळता आले. १९९९ च्या रिजनल बुस्टा कपच्या स्पर्धेत त्याने तरीपण चार इनिंगमध्ये दोन अर्धशतके केली.
खरे पाहिले तर रघुनाथ हा वयाच्या २७ व्या वर्षी पोलीस खात्यात नोकरीला होता. त्यावेळी त्याची फलंदाजीची सरासरी ३० होती. त्याची पद्धत वेगळी होती दुसरा अँग्रेसिव्ह व्हायच्या आधीच तो अँग्रेसिव्ह होत असे. पहिल्याच फर्स्ट क्लास सामन्यामध्ये त्याने आणि डेरेन गंगा याने ९९ धावांची भागीदारी केली होती. त्याच्या सामान्याच्या निवडीच्या वेळी देखील त्याने मॅग्राला अनेक वेळा हुक करून चेंडू सीमापार केला होता आणि त्यावेळी त्याने अर्धशतकही केले. खरे तर तर तो पोलीस खात्यामध्ये नोकरीला असल्यामुळे त्याला भीती ही कशाचीच वाटत नव्हती. त्याच्या हुक करण्याच्या आणि चेंडू कट करण्याच्या पद्धतीमध्येही खूप आक्रमकता होती.
सुरज रघुनाथ यांच्याकडे आक्रमकता होती परंतु त्याच्याकडे अनुभव नसल्यामुळे त्याच्यामध्ये धावा करण्याचे सातत्य नव्हते . कुठल्याही आक्रमक खेळाडूकडे जर अनुभव आले तर तो निश्चित खेळामध्ये बरेच काही करू शकतो. अर्थात त्याचे क्षेत्ररक्षण तर प्रभावी होतेच कारण त्याच्याकडे ज्याचा चेंडू झेल म्हणून गेला असेल किंवा धाव अडवण्यासाठी गेला असेल त्या खेळाडूला ‘ सेकंड चान्स ‘ कधीच नसे. हे उद्गार त्याच्याबद्दल कॉलिन क्राफ्ट याने १९९९ साली जाहीरपणे काढलेले आहेत.
सुरज रघुनाथ याने शेवटचा कसोटी सामना १३ मार्च १९९९ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला . त्याने २ कसोटी सामन्यामधील ४ इनिंग्समध्ये १३ धावा केल्या. त्याने ६६ फर्स्ट क्लास सामन्यामध्ये ३२६१ धावा केल्या त्यामध्ये त्याने २ शतके आणि २४ अर्धशतके केली. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती १२८ धावा. त्याची फर्स्ट क्लास क्रिकेटची कारकीर्द होती १९८८ – ८९ ते २००० – २००१ पर्यंत.
त्याला हाताला झालेल्या जखमेमुळे त्याची कसोटी क्रिकेट कारकीर्द संपुष्टात आली. निवृत्तीनंतर सुरज रघुनाथ याने वेस्ट इंडिज विद्यापीठात लेक्चर्स जवळ जवळ २ वर्षे ९ महिने दिली. त्याचप्रमाणे २००९ मध्ये सुमारे २ वर्षे तो क्रिकेट डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम बघत होता. तसेच एक मोठ्या कंपनीमध्ये मध्ये सेल्समध्येही काम करत होता.
क्रिकेट हे असे क्षेत्र आहे की एखादी दुखापत किंवा एखादी घटना माणसाचे आयुष्यच बदलून टाकते.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply