नवीन लेखन...

क्रिकेटपटू टेड डेक्स्टर

एडवर्ड राल्फ ” टेड ” डेक्स्टर यांचा जन्म १५ मे १९३५ रोजी इटली मधील मिलान येथे झाला. ते ‘ लॉर्ड टेड ‘ या टोपणनावाने ओळखले जायचे. ते इंग्लंडकडून क्रिकेट खेळले. ते त्यांच्या शाळेत आणि कॉलेज मध्ये असल्यापासून क्रिकेट खेलत असत. ते कॉलगेकडून १९५० ते १९५३ पर्यंत ‘ फर्स्ट ११ ‘ टीमकडून यष्टीरक्षक म्हणून खेळत असत. १९५३ मध्ये ते त्यांच्या टीमचे कप्तान झाले. त्यांना स्वतःवर प्रचंड आत्मविश्वास होता आणि तो वेळोवेळी दिसूनही येत असे म्हणूनच त्यांना ‘ लॉर्ड टेड ‘ हे टोपणनाव मिळाले. ते जेव्हा ऑक्टोबर १९५५ मध्ये झिझस कॉलेज ऑक्सफर्ड येथे गेले तेव्हा ते गोल्फ आणि रग्बीदेखील खेळले. तसेच १९५६ आणि १९५७ मध्ये त्यांच्या कॉलेजच्या टीमचे कप्तानही झाले. १९५७ मध्ये ते गोलंदाज म्हणून लोकांना कळले १९५७ मध्ये ते जंटलमन साठी खेळताना त्यांनी ८ धावांमध्ये ५ विकेट्स घेतल्या तर दुसऱ्या इनिंगमध्ये ४७ धावा देऊन ३ विकेट्स घेतल्या.

टेड डेक्स्टर यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना खेळला तो २४ जुलै १९५८ रोजी न्यूझीलंडविरुद्ध त्यावेळी त्यांनी ५२ धावा केल्या. तेव्हा इ . डब्लू . स्वेटन जे समालोचक होते त्यांना वाटले की टेड डेक्स्टर यांना १९५८-५९ च्या पीटर मे यांच्या ऑस्ट्रेलिया टूरमध्ये स्थान मिळावे अशी इच्छा त्यांनी प्रकट केली होती. त्यांनतर पीटर मे यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्यांचा संघ संभ्रमात पडला की पाढे कसे होणार तेव्हा टेड डेक्स्टर यांची काही तयारी नसतानाही त्यांना त्या सीरिजच्या वेळी संघामध्ये स्थान मिळाले. त्यांनी काही सामने चांगले खेळले परंतु कसोटी सामन्यामध्ये जास्त प्रभाव पाडू शकले नाहीत. पुढे ती टूर तशीच चालू राहिली , इंग्लंडचा संघ न्यूझीलंडला गेला असताना टेड यांनी १४१ धावा करून शतक केले.

१९५९-६० साली वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेले असताना त्यांनी वेस हॉल आणि चार्ली ग्रिफिथ यांच्या गोलंदाजीवर त्यांनी अत्यंत प्रभावी फटके मारून नाबाद १३२ धावा पहिल्या कसोटी सामन्यामध्ये केल्या. तर त्यांनी चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ११० धावा केल्या. त्यांनी त्या टूरमध्ये ६५.७५ च्या सरासरीने ५२६ धावा केल्या. त्यावेळी १९६१ मध्ये त्यांचे नाव ‘ विझडेन ऑफ द इयर ‘ मध्ये नोंदले गेले.

१९६२-६३ मध्ये टेड डेक्स्टर इंग्लंडचे कप्तान म्हणून इंग्लंडचा संघ घेऊन ऑस्ट्रेलियामध्ये गेले तेव्हा त्यांनी ४८.१० च्या सरासरीने त्या सिरीजमध्ये ४८१ धावा केल्या. तो त्यावेळी रेकॉर्ड होता. त्या टूरमध्ये एम.सी.सी.चा संघ आणि ऑस्ट्रेलिया ११ च्या संघाचा जो सामना झाला त्यात टेड डेक्स्टर यांनी ११० मिनिटामध्ये १०२ धावा केल्या त्यामध्ये २ षटकार आणि १३ चौकार होते. यांनी अँडलेट ओव्हलवर एक षटकार असा मारला की तो स्टँडच्या छपरावर जाऊन पडला असा षटकार त्या स्टेडियमने कधी पूर्वी पाहिला नव्हता.

टेड डेक्स्टर यांनी लागोपाठ ६ वेळा अर्धशतके पुरी केली ८५ आणि १७२ पाकिस्तानविरुद्ध तर ७० ,९९,९३ आणि ५२ ऑस्ट्रलियाविरुद्ध . अशी अर्धशतके केन बॅरिंग्टन आणि आता अलेस्टर कुक यांनी केली . त्यांच्या ह्या खेळीमुळे इंग्लंडची स्थिती १-० अशी होती. चौथ्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने ८ बाद ६५६ धावा केल्या परंतु इंग्लंडच्या केन बॅरिंग्टनने २५६ धावा केल्या आणि टेड डेक्स्टरने १७४ धावा केल्या. ह्या दोघांच्या मदतीने इंग्लंडने ६११ धावा केल्या आणि पराभव टाळला.

१९६४-६५ च्या दक्षिण आफ्रिकेच्या टूरसाठी टेड डेक्स्टर जाऊ शकले नाहीत कारण ते एका पोलिटिकल पार्टीच्या निवडणुकीसाठी उभे होते. पुढे परत त्यांनी कप्तान म्हणून त्यांची करिअर सुरु केली. परंतु १९६५ मध्ये त्यांच्या कारला अपघात होऊन त्यांचा पाय मोडला . त्यानंतर त्यांनी काही काळ त्यांनी ससेक्सही सोडले . त्यातून बरे झाल्यावर त्यांनी इंटरनॅशनल कॅव्ह्येलिअर्स कडून खेळताना त्यांनी १०४ धावा केल्या त्यांच्या संघाने वेस्ट इंडिजला ७ विकेट्सने हरवले. तसेच त्यांनी केंटविरुद्ध खेळताना १९६८ मध्ये नाबाद २०३ धावा केल्या. परंतु १९६८ च्या अँशेसमध्ये मात्र ते त्यांचा प्रभाव दाखवू शकले नाहीत. पुढे संडे लीग मध्ये ससेक्सकडून ते १९७१ आणि १९७२ साली खेळले.

टेड डेक्स्टर ह्यांनी शेवटचा कसोटी सामना २२ ऑगस्ट १९६८ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला . त्यांनी ६२ कसोटी सामन्यामध्ये ४, ५०२ धावा केल्या त्यामध्ये त्यांची ७ शतके आणि २७ अर्धशतके होती. त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २०५ धावा. त्यांनी ६६ विकेट्सही घेतल्या आणि एका इनिंगमध्ये त्यांनी १० धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या तसेच २९ झेलही पकडले . त्यांनी ३२७ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये २१, १५० धावा केल्या त्यामध्ये त्यांनी ५१ शतके आणि १०५ अर्धशतके काढली. त्यांची फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या होती २०५ धावा. त्यांनी ४१९ विकेट्स घेतल्या आणि एका इनिंगमध्ये २४ धावा देऊन ७ विकेट्सही घेतल्या त्याचप्रमाणे २३१ झेलही पकडले.

निवृत्तिनंतर ते पत्रकार झाले , स्वतःची कंपनी काढली तसेच बॉब विलिस यांच्याबरोबर इंग्लंडच्या क्रिकेटसाठी जलद गोलंदाज शोधण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याचप्रमाणे त्यांनी १९८७ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये ‘ रँकिंग सिस्टीम ‘आपल्या आकडेतज्ञ मित्रांच्या सहाय्याने डेव्हलप केली आणि २००३ मध्ये ती प्रणाली आय. सी.सी. ने सुरु केली त्यालाच ‘ आय.सी.सी सी. प्लेयर्स रँकिंग ‘ असे म्हटले जाते.

मला त्यांना भेटण्याचा योग काही वर्षांपूर्वी मुंबईला सी सी आय म्हणजे ब्रेबोर्न स्टेडियम येथे आला होता तेव्हा त्यांची स्वाक्षरीहि घेतली हाती.

– सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..