वामन लक्ष्मण कुलकर्णी यांचा जन्म ७ एप्रिल १९११ रोजी खानदेश येथील चोपडे येथे झाला. त्यांचे इंटरमीजिएटपर्यंतचे शिक्षण नाशिक येथे झाले. पदवी आणि पदव्युत्तर परीक्षांचे शिक्षण मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात झाले. १९३३ मध्ये इंग्रजी घेऊन ते बी. ए. झाले तर १९३५ मध्ये मराठी घेऊन एम.ए . झाले. एम. ए . ला मराठी या विषयात प्रथम आल्यामुळे त्यांना ‘ चिपळूणकर मराठी पारितोषिक ‘ मिळाले.
ते मुंबईच्या छबिलदास हायस्कुलमध्ये शिक्षक होते. १९३६ पासून १९४४ पर्यंत त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये अध्यापन केले. ते विल्सन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते त्यानतर मराठवाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे पदावर आणि विभागप्रमुख काम करून १९७६ साली सेवानिवृत्त झाले.
१९४० साली ‘ समीक्षक ‘ चे संपादक असलेल्या कुलकर्णी यांनी अभिरुची , सत्यकथा , छंद यासारख्या नियतकालिकातून सातत्याने समीक्षा-लेखन केले. त्यांचे समीक्षा लेखनाचे ऐकून आठ संग्रह आहेत. याशिवाय श्री. कृ . कोल्हटकर , ह . ना. आपटे , न.चि . केळकर यांच्या वाङ्मयासबंधी स्वतंत्र लेखन केले. वाङ्मयातील वादस्थळे , वाङ्मयीन मते आणि मतभेद, वाङ्मयीन टिपा आणि टिप्पणी , वाङ्मयीन दृष्टी आणि दृष्टीकोन , साहित्य आणि समीक्षा , साहित्य : बोध आणि शोध , साहित्य : स्वरूप आणि समीक्षा , मराठी कविता : जुनी आणि नवी.अशा गंभीर लेखनातून त्यांच्या चिकित्सक आणि सखोल विचारांचा प्रत्यय येतो. वा.ल. कुलकर्णी हे पहिले तात्विक समीक्षेचे टीकाकार म्हणून ओळखले जातात. अध्यापन आणि समीक्षा ह्या दोन क्षेत्रांची सांगड घालणाऱ्या समीक्षेला त्यांनी एकत्र आणून एक वेगळी ज्ञानशाखा म्ह्णून निर्माण केली असे म्हणावे लागेल.
कुलकर्णी याना चित्रकला आणि मूर्तिकला यांची आवड होती. लेखकाप्रमाणेच समीक्षकालाही त्याच्या काळाची संवेदनशीलता लाभते. म्हणून तो नंतरच्या पिढीविषयी लिहू शकत नाही असे त्यांचे मत होते. भारतात त्यांचे हे म्हणणे खरे ठरत आहे आजचा २०१७ मधील समीक्षेचा विचार करताना असे जाणवते मागील पिढीतले जे समीक्षक आहेत ते त्या काळाबाहेर येऊ शकत नाहीत आणि त्यांचे मापदंड तेच रहातात , तीच तीच मागील उदाहरणे देऊन तेच कसे श्रेष्ठ आहे हे सांगत असतात. काळाबरोबर साहित्यातील निकष बदलत असतात याचे भान ठेवले पाहिजे.
त्यांनी वाचन करताना काढलेली टिपणे मुळात सुलेखन आणि सौदर्यदृष्टी यांचा एक अप्रतिम नमुना आहे. ३९ व्या मराठी साहित्य संमेलनात टीका शाखेचे अध्यक्ष १९५७ साली होते तसंच हैद्राबाद येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य म्ह्णून त्यांची निवड झाली होती. अमेरिकन सरकारच्या निमंत्रणावरून कुलकर्णी यांनी अमेरिकेतील व्हिएद्यापीठे , नाट्यसंस्था , कलाकेंद्रे याना भेटी देण्यासाठी प्रवास केला.
त्यांच्या उत्कृष्ट समीक्षा ग्रंथ म्ह्णून त्यांच्या वाङ्मयीन टिपा आणि टिप्पणी आणि श्रीपाद कृष्ण वाङ्मयदर्शन या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाची पारितोषेंके मिळाली आहेत.
त्यांनी लिहिलेल्या आणखी काही पुस्तकांची नावे अशी आहेत मन मल्हार: वाङ्मयदर्शन , मराठी ज्ञानप्रसारक इतिहास वाङमयविचार , तुकारामाची कविता , हरिभाऊंच्या सामाजिक कादंबऱ्या , साहित्य आणि समीक्षा , नाटककार खाडिलकर एक अभ्यास. न.चिं.केळकर वाङ्रमयदर्शन , वाङ्रमयीन दृष्टी आणि दृष्टीकोण अशी आहेत .
२५ डिसेंबर १९९१ रोजी वा. ल. कुलकर्णी यांचे मुबंईत निधन झाले.
— सतीश चाफेकर
Leave a Reply