आपल्या जेवणामध्ये फोडणीला जीरे न वापरल्यास फोडणीची मजाच येत नाही.आपल्या विशिष्ट चवीने आणी सुगंधाने आपल्या भारतीय स्वयंपाकामध्ये मानाचे स्थान असणारा हा पदार्थ.वरण असो की भाज्या किंवा मग आपल्या जेवणात हमखास वापरले जाणारे मसाले जसे मालवणी मसाला,गरम मसाला,गोडा मसाला ह्या जीरे महाशयांच्या उपस्थिती शिवाय पुर्णत्वाला येणे अशक्यच आहे.
जिरे हा पदार्थ म्हणजे छोट्या क्षुपाला लागलेल्या बिया होय.जीरे चविला तिखट कडू अाणी थोडे उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात व कफ दोष कमी करते.
ब-याच मंडळींना माहीतीच असेल किंबहुना बरीच लोकं जा-याचा वापर घरगुती औषधांमध्ये जिरे वापरत देखील असतील.तरी देखील पुन्हा उजळणी करण्यात एक वेगळीच मजा असते नाही का?
१)पोटात सारखे गॅस होऊन पोट गच्च झाल्या सारखे वाटून भूक लागत नसल्यास जिरे तव्यावर भाजावे त्याची पूड करावी आणी ती मधा सोबत घ्यावी.
२)तोंडाला रूची नसल्यास १ चमचा जीरे चावून खावे.
३)अपचनामुळे एॅसीडीटी होऊन उल्टया होत असल्यास १/२ जिरेपूड +मध+ १ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण थोडयाथोडया वेळाने चाटावे.
४)हळकुंड उगाळून त्यात ४ चिमूट जिरेपूड घालावी व हा लेप चेह-यांवर लावल्यास
चेह-याचा तेलकटपणा व चेह-यावरील सूरकुत्या देखील कमी होतात.
५)बायकांना अंगावर पांढरे जात असल्यास जीरे व खडीसाखर हे मिश्रण तांदूळाच्या धुवणातून घ्यावे.
६)गुळ आणी जीरे पूड हे मिश्रण बाळंतीणीस दिल्यास अंगावरचे दूध वाढायला मदत होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply